Home /News /india-china /

आता Twitter वर जम्मू-काश्मीर दाखवलं चीनमध्ये; चुकीच्या GeoTag मुळे सोशल मीडियावर खळबळ

आता Twitter वर जम्मू-काश्मीर दाखवलं चीनमध्ये; चुकीच्या GeoTag मुळे सोशल मीडियावर खळबळ

या भागातल्या उचं टेकड्यांवर तर तापमान हे -40 पर्यंतही जात असतं. यावेळी तणावामुळे भारताने जास्तीचे सैनिक तैनात केले आहेत. या भागात तब्बल 50 हजार सैनिक तैनात असल्याची माहितीही देण्यात आलीय. नोव्हेंबर नंतर या भागात तब्बल 40 फुटांपर्यंत बर्फ जमा होत असतो.

या भागातल्या उचं टेकड्यांवर तर तापमान हे -40 पर्यंतही जात असतं. यावेळी तणावामुळे भारताने जास्तीचे सैनिक तैनात केले आहेत. या भागात तब्बल 50 हजार सैनिक तैनात असल्याची माहितीही देण्यात आलीय. नोव्हेंबर नंतर या भागात तब्बल 40 फुटांपर्यंत बर्फ जमा होत असतो.

एका live broadcast मध्ये ट्विटरने जम्मू काश्मीरचा लोकेशन टॅग चीनमध्ये दाखवला. हा चिनी षडयंत्राचा भाग असून Twitter India च्या संबंधित अधिकाऱ्यांना त्यात सामील झाल्याबद्दल अटक करा, अशी मागणी जोर धरत आहे.

    नवी दिल्ली, 19 ऑक्टोबर : ट्विटर इंडिया (Twitter India) ने जम्‍मू-कश्‍मीर (Jammu Kashmir) ला चीनचा (China) भाग असल्याचं दाखवलं आहे.  एका ट्विटर यूजरने लोकेशन टॅग केल्यावर (Geo Tag) जम्मू काश्मीर, रिपब्लिक ऑफ चायना, असं आलं. यावरून इंटरनेटवर यूजर्स प्रचंड भडकले आहेत. तातडीने हे उद्योग करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी जोर धरत आहे. एवढंच नाही तर Twitter वर बंदी (Twitter Ban) आणा, अशीही मागणी होत आहे. Twitter India च्या अधिकाऱ्यांना अटक करता, अशी मोहिम हॅशटॅगसह Twitter वरच सुरू करण्यात आली आहे. अशा प्रकारे जम्मू काश्मीरला चीनमध्ये दाखवत असल्याचं प्रथम लक्षात आलं ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशनच्या कांचन गुप्ता यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर. कांचन गुप्ता यांनी Tweet करून याबद्दल नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं. 'ट्विटरने आता भूगोल बदलण्याचा निर्णय घेतलेला दिसतो. जम्मू काश्मीरला त्यांनी चीनचा भाग म्हणून घोषित केलं आहे. हे भारतीय कायद्याचं उल्लंघन नाही तर काय आहे? अमेरिकन कंपनी कायद्यापेक्षा मोठी आहे काय?' या त्यांच्या Tweet ने खळबळ उडाली. नितीन गोखले या ट्विटर यूजरने काश्मीरमधून लोकेशन टॅग केलं तर तो चीनचा भाग असल्याचं Geo Tagging दिसलं. गोखले यांनी ही गोष्ट तातडीने लक्षात आणून दिली. त्यानंतर कांचन गुप्ता यांनी आपल्या ट्वीटमध्ये केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसार यांनाही टॅग केलं.  'भारत या गोष्टीत आता शांत बसणार नाही. Twitter वर प्रतिबंध लावा. या उद्योगात अडकलेल्यांवर कारवाई करा', अशा अर्थाच्या Tweets ने त्यानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली होती. Twitter India ने या गोष्टीची दखल घेतली. ट्विटरचे प्रवक्त्यानं ही चूक दुरुस्त करण्यासाठी आमच्या टीमने काम सुरू केलं आहे, या अर्थाच ट्वीट केला. 'जम्मू काश्मीर चीनचा भाग असल्याचा जिओटॅग एका लाईव्ह ब्रॉडकास्टमध्ये आला. रविवारच्या या प्रकरणाची आम्हाला माहिती आहे. या विषयाभोवती असणाऱ्या संवेदनशील भावनांचाही आम्ही आदर करतो. आमच्या टीम या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि लवकरच हा जिओ टॅगिंचा गोंधळ सोडवला जाईल', असं ट्विटरच्या वतीने सांगण्यात आलं. हा चिनी गुप्तहेरांचा प्रचार आहे. यामागे सुप्त हेतू आहेत. भारताने यावर शांत बसू नये. ट्विटर इंडियाच्या अधिकाऱ्यांना अटक करा, ट्विटर बंद करा, अशा अर्थाचे ट्वीट्ससुद्धा करण्यात आले.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: China, India china

    पुढील बातम्या