चीनच्या मुसक्या आवळण्यासाठी भारत आणि अमेरिका एकत्र येणार, अशी आहे योजना!

चीनच्या मुसक्या आवळण्यासाठी भारत आणि अमेरिका एकत्र येणार, अशी आहे योजना!

जगभर प्रभाव वाढविण्यासाठी होणारे चीनचे प्रयत्न रोखण्यासाठी भारत आणि अमेरिका आता एकत्रित प्रयत्न करणार आहे. भारतासोबत चीनचा सीमेवरून तणाव सुरू आहे तर अमेरिकेसोबत चीनचं व्यापार युद्ध सुरू आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 19 ऑक्टोबर: जगभर प्रभाव वाढविण्यासाठी होणारे चीनचे प्रयत्न रोखण्यासाठी भारत आणि अमेरिका आता एकत्रित प्रयत्न करणार आहे. भारतासोबत चीनचा सीमेवरून तणाव सुरू आहे तर अमेरिकेसोबत चीनचं व्यापार युद्ध सुरू आहे. जगभर चीन आपला प्रभाव वाढविण्यासाठी वेगाने प्रयत्न करत आहे. मात्र कोरोना संकटामुळे त्याला खिळ बसली आहे. नवी समिकरणं पाहता अमेरिका आणि भारताना सहकार्य वाढविण्याचा निर्णय घेतला असून दोन्ही देशांदरम्यान BECA (Basic exchange and cooperation agreement ) हा करार होणार आहे.

या महिन्याच्या शेवटी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ आणि संरक्षणमंत्री मार्क इस्पर भारत भेटीवर होणार आहे. त्यावेळी परराष्ट्रमंत्री जयशंकर आणि संरक्षणंत्री राजनाथ सिंग यांच्या सोबत त्यांची चर्चा होणार असून BECA या करारावर स्वाक्षऱ्या होणार आहेत.

भारत आणि अमेरिकेतला अशा प्रकारचा हा तिसरा करार आहे. या आधी पायाभूत सुविधा आणि दळणवळण या क्षेत्रात सहकार्य वाढविण्यासाठी करार झाले होते. लष्करी आणि व्हुरचनात्मक दुष्ट्याही हे करार महत्त्वाचे असल्याचं सांगितलं जात आहे.

कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर अमेरिका आणि चीनचे संबंध जास्त ताणले गेले आहेत. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तर कोरोना जगभर पसरण्यास चीन हाच जबाबदार असल्याचा आरोप जाहीरपणे केला होता. चीन आणि अमेरिकेने एकमेकांच्या कंपन्यांवर आर्थिक निर्बंध लादले आहेत.

तर दक्षिण चीन समुद्रात आपले वर्चस्व वाढवण्याचा चीन प्रयत्न करत आहे. हे सगळे प्रयत्न रोखण्यासाठी अमेरिका प्रयत्न करत असून चीन विरोधात आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध देशांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहे.

भारत-चीन (India-China Conflict) यांच्यात लडाखमध्ये उद्भवलेल्या सीमा प्रश्नामुळे तणाव आहे. दोन्ही देशांच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या अनेक बैठका झाल्यानंतरही या प्रश्नावर तोडगा निघालेला नाही.

चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी एका लष्करी तळाला भेट देऊन सैनिकांना युद्धाची तयारी करण्याचे आदेश दिल्याची बामती ग्लोबल टाइम्सने दिली आहे. पण फक्त भारताशीच नाही तर तैवान, जपान, व्हिएतनाम अशा तब्बल 21 देशांशी चीनचा सीमा वाद सुरू आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 19, 2020, 4:58 PM IST

ताज्या बातम्या