मराठी बातम्या /बातम्या /india-china /LAC वर चीनच्या कुरबुरींकडे लक्ष ठेवेल हे नामी हत्यार! Indian Army कडे येणार खास रडार

LAC वर चीनच्या कुरबुरींकडे लक्ष ठेवेल हे नामी हत्यार! Indian Army कडे येणार खास रडार

भारत-चीन सीमेवर (India China border Disput) तणाव पुन्हा वाढत असल्याने भारतीय लष्कराने लो लेव्हल लाइटवेट रडारची (LLLWR) मागणी केली आहे. काय आहे या Made in India RADAR चं वैशिष्ट्य?

भारत-चीन सीमेवर (India China border Disput) तणाव पुन्हा वाढत असल्याने भारतीय लष्कराने लो लेव्हल लाइटवेट रडारची (LLLWR) मागणी केली आहे. काय आहे या Made in India RADAR चं वैशिष्ट्य?

भारत-चीन सीमेवर (India China border Disput) तणाव पुन्हा वाढत असल्याने भारतीय लष्कराने लो लेव्हल लाइटवेट रडारची (LLLWR) मागणी केली आहे. काय आहे या Made in India RADAR चं वैशिष्ट्य?

    नवी दिल्ली, 9 नोव्हेंबर: संरक्षण क्षेत्रातली (Defence Sector) आत्मनिर्भरता (Self Dependence in Defence) अनेक अर्थांनी महत्त्वाची असल्याने ती वाढवण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. सरकारने संरक्षणविषयक 209 वस्तू/साधनांच्या दोन याद्या अधिसूचित केल्या आहेत. त्या यादीतल्या संरक्षणविषयक साधनांच्या आयातीवर 2021 ते 2025 या कालावधीसाठी बंदी घालण्यात आली आहे. त्यात लो लेव्हल लाइटवेट रडारचाही (LLLWR) समावेश असून, चीनशी असलेल्या तणावाच्या (India China Tension on LAC) पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराने या रडारची मागणी केली आहे. हा रडार मेक इन इंडिया प्रोजेक्ट लिस्टमध्ये समाविष्ट असून, लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे (Gen Manoj Naravane) यांनी सोमवारी (8 नोव्हेंबर) याबाबत माहिती दिली.

    भारतीय लष्कराने (Indian Army to get RADAR) भारतीय संरक्षणविषयक उद्योगांसह भागीदारी करून पुढे जाण्याचं ठरवलं आहे. त्याअंतर्गत सर्व्हेलन्स अँड आर्म्ड ड्रोन स्वार्म, काउंटर ड्रोन सिस्टीम, इन्फंट्री वेपन्स ट्रेनिंग सिम्युलेटर, रोबॉटिक्स सर्व्हेलन्स प्लॅटफॉर्म, पोर्टेबल हेलिपॅड्स यांसह अनेक प्रकारच्या शस्त्रास्त्रांची निर्मिती केली जाणार आहे. थ्रीडी अॅक्टिव्ह इलेक्ट्रॉनिक स्कॅन एरे रडार भारतीय सैन्याला हवा आहे. त्यात एअर डिफेन्स शस्त्रांच्या सामरिक नियंत्रणासह 50 किलोमीटर रेंजची क्षमता असेल. 'टीव्ही नाइन हिंदी'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

    अरुणाचल प्रदेशचा भाग चीननं बळकावल्याचा अमेरिकेचा दावा; भारताने फेटाळला रिपोर्ट

     गेल्या 18 महिन्यांपासून भारत आणि चीन यांच्यात सीमाप्रश्न (LAC) धगधगतो आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी आतापर्यंत दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये अनेक बैठका झाल्या; मात्र त्यातून काहीही निष्पन्न झालेलं नाही. चीनसोबत असलेल्या उत्तरेकडच्या आणि पूर्वेकडच्या अशा दोन्ही सीमांवर चिनी सैन्याने आपल्या हालचाली वाढवल्या आहेत. हे सीमाक्षेत्र डोंगराळ असल्यामुळे या भागावर लक्ष ठेवणं अत्यंत कठीण आहे. त्यामुळे शत्रूची कमी उंचीवरून उडणारी विमानं, हेलिकॉप्टर्स आणि मनुष्यरहित हवाई वाहनांसाठी ते क्षेत्र अनुकूल ठरतं. अशा क्षेत्रावर नजर ठेवून शत्रूच्या हालचाली टिपण्यासाठी भारतीय लष्कराला लो लेव्हल लाइटवेट रडारची तातडीने आवश्यकता आहे.

    संरक्षण संशोधन आणि विकास संघटना अर्थात डीआरडीओने (DRDO) हवाई लक्ष्याचा शोध घेण्यासाठी आणि ते ट्रॅक करण्यासाठी उंचावरच्या क्षेत्रातल्या मैदानांवर आणि डोंगरांवर लक्ष ठेवण्यासाठी आश्लेषा एम के आय (Ashlesh Mk I) या नावाचा एक LLLWR तयार केला आहे. भारतीय हवाई दलाने हा रडार आपल्या ताफ्यात सामील केला आहे; मात्र लष्कराने या रडारची ऑर्डर दिली नाही. कारण लष्कराच्या गरजा वेगळ्या होत्या. त्या गरजांचा विचार करून वेगळ्या LLLWR ची मागणी लष्कराने केली आहे.

    'काही मंत्र्यांना इंग्रजी येत नाही तर काहींना हिंदी, मुख्य सचिवांची करावी बदली', CM नी केली अमित शाहांकडे मागणी

     अलीकडेच भारतीय सैन्याने सुधारित L-70 एअरक्राफ्ट गन आपल्या ताफ्यात समाविष्ट केली आहे. हवाई धोक्यांशी दोन हात करण्यासाठी त्याचा उपयोग केला जाणार असून, उंचावरच्या ठिकाणी प्रथमच ती तैनात करण्यात आली आहे. साडेतीन किलोमीटरवरचं लक्ष्य भेदण्याची क्षमता या तोफेत असून, शत्रूची विमानं, सशस्त्र हेलिकॉप्टर्स आणि यूएव्ही हवेतच नष्ट करण्याची क्षमता त्या तोफेत आहे.

    भारत आणि चीनने लडाखमध्ये आपलं सैन्य वाढवलं आहे. तसंच, दोन्ही बाजूंना सैन्याचा पायाभूत विकास आणि युद्धाभ्यास या गोष्टीही सोबत सुरू आहेत.

    First published:
    top videos

      Tags: India china, Indian army