नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी: भारत (India) आणि चीनमध्ये (China) मागील काही काळापासून सीमावाद (India china Border Dispute) सुरू आहे. चीनच्या सैन्याने मोठ्या प्रमाणात भारतीय जमिनीवर कब्जा केल्याचा आरोप करण्यात येत आहे. खरं तर भारत आणि चीनमध्ये हा सीमावाद 1962 पासून सुरू आहे. मागच्या वर्षी चीनने लडाखमधील प्रत्यक्ष ताबा रेषेवर (LAC) असलेल्या गलवान खोऱ्यामध्ये (Galwan) प्रवेश केल्यानं तर हे प्रकरण मोठ्या प्रमाणात उजेडात आलं. त्यानंतर भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये झटापट झाल्याचं देखील समोर आलं होतं. त्यानंतर दोन्ही देशांच्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये चीनने आपलं सैन्य मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु मागील काही वर्षांपासून वास्तविक नियंत्रण रेषेच्या जवळ आपल्या भागात चीन गावं तयार करत आहे. या वाढत्या गावांची संख्या भारतासाठी खरंतर चिंतेची बाब आहे. एक सुनियोजित कार्यक्रम 1962 च्या युद्धात जिंकलेल्या भारताच्या ताब्यातील भागावर आपला दावा मजबूत करण्यासाठी चीन एका सुनियोजित कार्यक्रमाअंतर्गत हे काम करत आहे. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या जियाओकांग सीमा ग्राम कार्यक्रमांअंतर्गत ही घरं बांधण्यात येत आहेत. विकास कार्यक्रम आणण्याचे आश्वासन मागील वर्षी आपल्या पक्षाच्या 19 व्या बैठकीत हा कार्यक्रम राबवण्याची घोषणा झाली होती. भारत आणि चीनमध्ये डोकलाम वाद संपुष्टात आल्यानंतर त्यांनी बैठकीत या भागाला अल्पसंख्याक आणि सीमा क्षेत्र म्हटलं होतं. यामुळं या भागात सुरक्षा वाढवण्यासाठी आणि वेगाने विकास करण्याचं त्यांनी आश्वासन दिले होते. या कार्यक्रमात किती गावं अलीकडच्या काळात स्थानिक चीन कम्युनिस्ट पक्षाच्या सीसीपीअंतर्गत तिबेटमध्ये जिओकांग व्हिलेज कार्यक्रम सुरू करण्यात आला असून त्याअंतर्गत 628 गावांचा विकास करण्यात येणार होता. ही सर्व गावे भारत-तिबेटसीमेवर आहेत. तयार करण्यात येणारी ही गावे उत्तराखंडच्या नागरी सीमेवर आणि हिमाचलपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत आहेत. या भागात 62 हजारांहून अधिक घरे असून यामध्ये २१ गावेही हिमालयाच्या सीमा भागात आहेत. या गावांमध्ये एकूण दोन लाख चाळीस हजार लोक राहतात.
सीसीपीचा उद्देश स्पष्ट या गावांमध्ये सिसीपीशी प्रामाणीक असणाऱ्या नागरिकांना वसवलं जात आहे. या भागात बीजिंगचं नियंत्रण राहण्यासाठी प्रयत्न केला जात आहे\. यामध्ये अतिशय खुलेपणाने या गावांचे निर्माण केलं जात असून कोणत्याही पद्धतीची गुप्तता यामध्ये ठेवण्यात आलेली नाही.
अवश्य वाचा - …तरच चिनी कंपन्यांसाठी भारताचे दरवाजे उघडणार; FDI च्या प्रस्तावांना मंजुरी मिळण्याची शक्यता
उपक्रमाचा असाही हेतू चीन आताच याठिकाणी घरांची उभारणी करत आहे असं नाही. मागील दीर्घकाळापासून चीन याठिकाणी घरांची निर्मिती करत आहे. 2018 मध्ये तिबेटच्या पक्षाच्या समितीचे उपसचिव जुआंग यान यांनी सीमा भाग आणि सीमा सुरक्षा मजबूत करण्याचा पुनरुच्चार केला. गरज पडल्यास या घरांचा वापर बचावासाठी पोस्ट म्हणून करण्याच्या उद्देशाने देखील यांची बांधणी केली जात आहे.
या कामासाठी देखील उपयोगी भारत आणि चीन दोघेही दावा करत असलेल्या या जागेवर चीन ही गावे तयार करत आहे. या गावांना चीन आपले डोळे आणि कान समजतो. अवश्य वाचा - लडाखमधून अखेर चीनची वेगाने माघार; रणगाडे फिरले मागे पाहा EXCLUSIVE PHOTO वादग्रस्त असलेल्या या भागाचा वाद शांत करण्याऐवजी चीन मागील काही वर्षांपासून या ठिकाणी गावे उभे करून आणखी अडचण निर्माण करत आहे. याठिकाणी नागरिकांनी राहायला येण्यासाठी चीन त्यांना विविध आश्वासने आणि विकासाचं आश्वासन देखील देत आहे. या भागात खरंतर नागरिकांच्या नावाखाली चीन सैन्यासाठी व्यवस्था उभी करत आहे. सॅटेलाईट फोटोंमध्ये हे स्पष्टपणे दिसून येत असून मोठ्या प्रमाणात चीन यामध्ये काम करत आहे. परंतु भारतासाठी चिंतेची बाब म्हणजे चीन या ठिकाणी घरे तयार करत असून भारतीय हद्दीतील अनेक गावं खाली होताना दिसून येत आहेत.