'भारतानं मिळालं त्यातच समाधानी राहावं'; हॉट स्प्रिंग आणि गोगरामधून सैन्य माघारीस चीनचा नकार

'भारतानं मिळालं त्यातच समाधानी राहावं'; हॉट स्प्रिंग आणि गोगरामधून सैन्य माघारीस चीनचा नकार

चीनने गोगरा पोस्ट (Gogra Post) आणि हॉट स्प्रिंग्जमधून (Hot Springs) आपले सैन्य माघारी घेण्यास नकार दिला आहे. सोबतच, देपसांगच्या बाबतीतही भारताला मोठं यश मिळालेलं नाही.

  • Share this:

नवी दिल्ली 18 एप्रिल : नियंत्रण रेषेवरील (LAC) भारत आणि चीनमधील झालेल्या झडपेला आता एक वर्ष पूर्ण होत आलं आहे, परंतु आतापर्यंत दोन्ही देशांमधील परिस्थिती सामान्य झाली नाही. अहवालात असं म्हटलं आहे, की 9 एप्रिल रोजी झालेल्या कमांडर स्तराच्या बैठकीतही कोणताही विशेष तोडगा निघालेला नाही. असं म्हटलं जात आहे, की चीनने गोगरा पोस्ट (Gogra Post) आणि हॉट स्प्रिंग्जमधून (Hot Springs) आपले सैन्य माघारी घेण्यास नकार दिला आहे. सोबतच, देपसांगच्या बाबतीतही भारताला मोठं यश मिळालेलं नाही. आतापर्यंत दोन्ही देशांमध्ये 11 बैठका झाल्या आहेत.

द इंडियन एक्सप्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, चीनने गोगरा पोस्ट आणि हॉट स्प्रिंगमधून आपलं सैन्य माघारी घेण्यास नकार दिला आहे. चीननं देपसांगबाबतही हीच भूमिका घेतली आहे. रिपोर्टनुसार, हॉट स्प्रिंग आणि गोगरा पोस्टवरील पेट्रोलिंग पॉइंट १५ आणि PP 17 A वरुन सैन्य माघारी घेण्याच्या प्रस्तावावर सुरुवातीला चीन तयार झाला होता. मात्र, नंतर चीननं यासाठी नकार दिला. वृत्तपत्रात आलेल्या वृत्तानुसार,चीननं भारताला म्हटलं, की जे मिळालं आहे, त्यातचं समाधानी राहायला हवं.

'दबाव टाकला जातोय', ऑक्सिजन खरेदीवरुन शिवराज सिंह चौहानांचा ठाकरे सरकारवर आरोप

रिपोर्टनुसार, देपसांगचा मुद्दा सध्या कमांडर स्तरावरील पुढच्या बैठकीत बातचीतीसाठी ठेवण्यात आला आहे. देपसांग क्षेत्रात भारतीय लष्कराच्या गस्तीही चीननं रोखल्या आहेत. चीनी तुकड्या रोज गाडीनं याठिकाणी येतात आणि रस्ता अडवतात. मिळालेल्या माहितीनुसार, 2013च्या नंतर भारतीय दल पैट्रोलिंग सीमेपर्यंत जाऊ शकलेले नाहीत. भारतीय सैन्याला 2013 पासून आतापर्यंत देपसांगमध्ये ब्लॉक केलं गेलं आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्या गस्तीच्या सीमेपर्यंतही भारतीय सैन्याला जाता येत नाही. चीननं सर्व रस्ते रोखले आहेत. चिनी सैन्य गोगरा, हॉट स्प्रिंग आणि कोंगकाला क्षेत्रातून तैनात आपल्या सैनिकांसाठी मोठ्या प्रमाणावर रसद पोहोचवतो आहे.

Published by: Kiran Pharate
First published: April 18, 2021, 9:02 AM IST

ताज्या बातम्या