Home /News /india-china /

भारताविरोधात लढ्याची तयारी! चीननं Tibetan साठी जारी केला अजब आदेश, ही आहेत कारणं

भारताविरोधात लढ्याची तयारी! चीननं Tibetan साठी जारी केला अजब आदेश, ही आहेत कारणं

चीनने अनेक गोष्टी लक्षात घेऊन तिबेटीयनला आर्मीत (PLA) सामील करण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी पहिले कारण म्हणजे हिमालयातील अत्यंत थंड आणि कठोर हवामान

    बीजिंग 31 जुलै : गेल्या वर्षी गलवानमध्ये भारताच्या (India) हातून वाईटरित्या पराभूत झालेला चीन (China) आता थेट सामना टाळत आहे. अशात चीनने आता तिबेटीयन (Tibetan) लोकांना भारताशी युद्ध करण्यासाठी सशस्त्र करण्याचा निर्णय घेतला आहे. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, इंडिया टुडेच्या अहवालानुसार, चीनने तिबेटमध्ये राहणाऱ्या सर्व कुटुंबांना असा आदेश दिला आहे, की प्रत्येक घरातील एका तरी व्यक्तीला सक्तीने पीपल्स लिबरेशन आर्मीमध्ये (PLA) पाठवा. या तिबेटींना लष्करी प्रशिक्षण दिल्यानंतर ते लडाख, उत्तराखंड आणि अरुणाचल प्रदेश समोर तिबेट सीमेवर तैनात असतील. अहवालानुसार, सैन्यात भरती होण्यापूर्वी तिबेटी (Tibetan) लोकांची निष्ठा चाचणी अनेक स्तरांवर घेतली जाईल. या अंतर्गत तिबेटींना चीनची (China) मंदारिन भाषा शिकावी लागेल. त्यांना तिबेट पूर्णपणे चीनचा भाग मानावा लागेल. त्याचसोबत, चिनी कम्युनिस्ट पार्टीला (सीसीपी) सर्वोच्च मानावे लागेल. वाढत्या R-Value मुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती वाढली; काय आहे हा R फॅक्टर? सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनने अनेक गोष्टी लक्षात घेऊन तिबेटीयनला आर्मीत (PLA) सामील करण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी पहिले कारण म्हणजे हिमालयातील अत्यंत थंड आणि कठोर हवामान. जे PLA चे सैनिक सहन करू शकत नाहीत. तर तिबेटी, या भागातील रहिवासी असल्याने या हवामानाची त्यांना सवय आहे आणि ते सहजपणे कुठेही चढतात. घटस्फोटासाठी तारुण्य घालवलं वाया; 21 वर्षांनंतर कोर्टाच्या निर्णयाने शॉक दुसरं कारण म्हणजे चीनवरील वाढता आंतरराष्ट्रीय दबाव कमी करणं. तिबेटींना त्यांच्या सैन्यात समाविष्ट करून भारताविरूद्ध विशेष ऑपरेशन करण्याचीही योजना आहे. जर या योजनेत तिबेटी सैनिक मारले गेले, तर चीन सहजपणे जगाला सांगू शकेल की तिबेटी लोक त्यांच्या जन्मभूमी चीनला वाचवण्यासाठी शहीद झाले आहेत.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: China, India china

    पुढील बातम्या