बीजिंग 23 एप्रिल : भारताविरोधात वेगवेगळे कट रचणारा चीन (China) आता भारताची मदत करण्यााची गोष्ट करत आहे. चीनचं असं म्हणणं आहे, की कोरोना (Coronavirus) महामारीच्या काळात ते भारताची शक्य ती मदत करण्यासाठी तयार आहेत. नवी दिल्लीबाबत एका प्रश्नाचं उत्तर देताना चीनी विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन म्हणाले, की कोरोना महामारी ही संपूर्ण मानवतेसाठी शत्रू आहे. या महामारीसोबत लढण्यासाठी आंतराराष्ट्रीय एकजुटता आणि मदतीची गरज आहे. ते पुढे म्हणाले, की या कठीण काळात भारताला मदत करण्यासाठी आम्ही तयार आहोत. वांग वेनबिन म्हणाले, की भारतातील या भयंकर परिस्थितीचं कारण आरोग्य सुविधांमधील कमी असल्याचं आम्हाला समजलं आहे. अशात कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी चीन भारताला प्रत्येक प्रकारची मदत करायला तयार आहे. वेनबिन पुढे म्हणाले, की आपल्या सर्वांचं लक्ष्य कोरोनाला हरवणं आहे आणि यासाठी शेजारी देशांना मदत करण्याची आमची तयारी आहे. सलग दुसऱ्या दिवशी देशात 3 लाखांपेक्षा जास्त रुग्ण; 10 दिवसांत 15000+ मृत्यू भारतात वाढतोय कोरोनाचा प्रसार - भारतात कोरोनाचा प्रसार झपाट्यानं वाढत आहे. मागील चोवीस तासात देशात 3 लाख 32 हजार 320 नवीन रुग्ण आढळले आहेत. याआधी गुरुवारी देशात 3 लाख 15 हजार 552 रुग्ण आढळले होते. याशिवाय गुरुवारी मृतांच्या आकड्यामध्येही मोठी वाढ झाली आहे. गुरुवारी 2,556 रुग्णांचा कोरोनानं मृत्यू झाला आहे. यानंतर भारत एका दिवसात आढळणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येच्या बाबतीत जगात पहिल्या स्थानी आला आहे. चीनमधून झाला होता प्रसार - कोरोनाचा प्रसार 2019 च्या शेवटी चीनच्या वुहान शहरातून झाला होता. यानंतर संपूर्ण जगभरात या विषाणूचा प्रसार झाला. अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आधीपासूनच यासाठी चीनच कारणीभूत असल्याचं मानतात. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, या सर्वात जागतिक आरोग्य संघटनादेखील चीनसोबत मिळालेली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







