मराठी बातम्या /बातम्या /india-china /India China: गलवान खोऱ्यात सैनिकांच्या मृत्यूवर प्रश्न विचारले तर 3 पत्रकारांना चीनने केली अटक

India China: गलवान खोऱ्यात सैनिकांच्या मृत्यूवर प्रश्न विचारले तर 3 पत्रकारांना चीनने केली अटक

Galwan valley attack : गलवान खोऱ्यातल्या चकमकीनंतर 8 महिन्यांनी चीनने तिथे आपले 4 जवान मारले गेल्याचं कबूर केलं. पण या आकड्यावर 3 चिनी पत्रकारांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. आता त्यांनाच अटक करण्यात आली आहे.

Galwan valley attack : गलवान खोऱ्यातल्या चकमकीनंतर 8 महिन्यांनी चीनने तिथे आपले 4 जवान मारले गेल्याचं कबूर केलं. पण या आकड्यावर 3 चिनी पत्रकारांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. आता त्यांनाच अटक करण्यात आली आहे.

Galwan valley attack : गलवान खोऱ्यातल्या चकमकीनंतर 8 महिन्यांनी चीनने तिथे आपले 4 जवान मारले गेल्याचं कबूर केलं. पण या आकड्यावर 3 चिनी पत्रकारांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. आता त्यांनाच अटक करण्यात आली आहे.

बीजिंग, 22 फेब्रुवारी: गेल्या वर्षी भारत (India) आणि चिनी (China) सैन्यांत गलवान खोऱ्यात चकमक (Galwan valley attack) झाली होती. या हल्ल्यात भारताचे 20 जवान शहिद (20 Indian soldiers death) झाले होते. यावेळी चीनचे किती सैनिक मारले गेले होते, याची माहिती स्पष्ट होऊ शकली नाही. पण घटनेच्या 8 महिन्यांनतर गलवान चकमकीत 4 जवान (4 Chinese soldiers death) मारले असल्याची कबुली चीनने दिली होती.  चीनने 4 जवान मारले गेल्याचं कबुल केल्यानंतर काही चिनी पत्रकारांनी या आकड्याबाबत शंका उपस्थित केली आहे. आकडा कमी सांगितल्याचा आरोप केला आहे. यामुळे आता चीनने स्वत: च्या देशातील तीन पत्रकारांना अटक केली आहे. या पत्रकारांनी संबंधित आकडेवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

चिनी अधिकाऱ्यांनी सांगितलं की, संबंधित पत्रकारांना चौकशीसाठी अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या पत्रकारांमध्ये 38 वर्षीय किउ जिमिंगचाही समावेश आहे. त्यांनी इकॉनॉमिक ऑब्जर्व्हरसोबत काम केलं आहे. चीनने सैनिकांच्या मृत्यूबाबत आकडेवारी जाहीर केल्यानंतर या तिन पत्रकारांना शनिवारी अटक केली आली. आकडेवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून सैन्यांच्या वीरगतीचा अपमान केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.यापूर्वी शुक्रवारी, चिनी सैन्याने गलवान खोऱ्यातील चकमकीत त्यांचे 4 सैनिक मरण पावले आणि त्यानंतर आणखी एका सैनिकाचा मृत्यू झाला होता, अशी अधिकृत माहिती दिली होती.

हे ही वाचा -India-China Talks: भारत- चीन यांच्यात तब्बल 12 तास ‘या’ नाजूक मुद्द्यावर चर्चा!

गेल्यावर्षी 15 जून रोजी पूर्व लडाखमध्ये गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैन्यांमध्ये चकमक झाली होती. यात भारतीय लष्कराचे 20 जवान शहीद झाले होते. त्यावेळी चिनी सैन्याने कोणताही अधिकृत डेटा जाहीर केला नव्हता, परंतु बर्‍याच मीडिया वृत्तामध्ये 40 ते 50 सैनिक ठार झाल्याची शक्यता वर्तवली होती. आता चीनने 8 महिन्यांनंतर सैनिकांच्या मृत्यूची बाब मान्य केली आहे, परंतु केवळ चारचं सैनिक मारले गेल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे चिनी सरकारच्या या आकडेवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत किउ यांनी चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वीबोवर भाष्य केलं होतं. हा आकडा अधिक असू शकतो असं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर त्यांच्यासहित आणखी दोघांना चिनी सरकारने अटक केली आहे.

हे ही वाचा -India China Dispute: पँगाँग सरोवरापासून सैन्य माघारीनंतर आज चर्चेची दहावी फेरी

डेटा जाहीर करण्यावरही प्रश्न उपस्थित केला

चिनी सरकारने 8 महिन्यांनंतर आकडा जाहीर केल्यावरूनही काउ यांनी प्रश्न उपस्थित केला होता. काउने लिहिलं की, "भारताच्या नजरेतून पाहिलं तर ते जिंकले आहेत आणि त्यांचं नुकसानही कमी झालं आहे." शनिवारी त्यांच्या अटकेनंतर नानजिंगच्या पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, काउ यांनी शहीद झालेल्या चार सैनिकांचा अपमान केला आहे. तसेच खोटी माहिती प्रसारीत करण्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली आहे.

हे ही वाचा -Explained : या कारणामुळे एक-दोन नव्हे सीमेवर हजारो गावं निर्माण करत आहे चीन

ग्लोबल टाईम्सच्या वृत्तानुसार, समाजामध्ये चुकीचा संदेश देणारी माहिती प्रसारीत करण्याच्या आरोपाखाली त्यांना अटक केली आहे. यांच्याशिवाय रविवारी बीजिंगमधून आणखी एका ब्लॉगरला अटक करण्यात आली आहे. तर 25 वर्षीय यांग नावाच्या ब्लॉगरलाही नैऋत्येकडील सिचुआन प्रांतातून अटक केली आहे.

First published:

Tags: India china, Indian army, Ladakh