जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / खरंच माणसं Zombie बनणार? आपल्यापासून फक्त तीन पावलांवर; तज्ज्ञांनी दिला खतरनाक Alert

खरंच माणसं Zombie बनणार? आपल्यापासून फक्त तीन पावलांवर; तज्ज्ञांनी दिला खतरनाक Alert

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

रिलमध्ये दिसणारा झोम्बी रिअल लाइफमध्ये येण्याचा धोका.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

वॉशिंग्टन, 15 फेब्रुवारी : झोम्बी तुम्हाला माहितीच असतील. फिल्ममध्ये तुम्ही झोम्बींना पाहिलं असेल. झोम्बी बनलेली माणसं दुसऱ्या माणसांवर तुटून पडतात. त्यानंतर त्या माणसांचा आपला जीव वाचवण्यासाठी संघर्ष सुरू होते. ज्यांच्यावर झोम्बीने हल्ला केला ती  माणसंही झोम्बी बनतात. पण प्रत्यक्षात असं होऊ शकतं का? धरतीवर खरंच असा झोम्बी व्हायरस आहे का? याबाबत तज्ज्ञांनी धक्कादायक खुलासा केला आहे.

HBO ची ‘द लास्ट ऑफ अस’ ही झोम्बीवर आधारित एक प्रसिद्ध सीरिज आहे. तज्ज्ञांच्या मते, या सीरिजमध्ये जे दाखवण्यात आलं आहे ते प्रत्यक्षात घडू शकतं.  कॉर्डीसेप्स फंगस माणसांना जिवंत मृतदेह बनवू शकतं.  रिअल लाइफमध्ये झोम्बी फंगस माणसांना संक्रमित करण्यापासून फक्त तीन पावलं दूर आहे. कॉर्डीसेप्स फंगसने तापमानात तग धरला तर तो माणसांवर हल्ला करू शकतो. डेली मेलच्या रिपोर्टनुसार ज न्यूयॉर्क बॉटनिकल गार्डनमधील माइकोलॉजीचे असिस्टंट क्युरेट जोआओ अरौजे म्हणाले, कॉर्डिसेप्समध्ये मुंग्यांना झोम्बीमध्ये बदलण्याची शक्यता आहे. आमच्या अंदाजानुसार सुमारे साडेचार कोटी वर्षांपूर्वी या फंगसने पहिल्या मुंगीला संक्रमित केलं होतं. धरतीवर असे 35 फंगस आहेत, ज्यांना किड्यांना झोम्बीमध्ये बदलण्याची क्षमता आहे. अमेरिका, ब्राझील, जपान आणि आफ्रिकेच्या काही भागात हे आढलून येतात. हे वाचा -  कोरोनापेक्षाही भयंकर! 88% मृत्यू निश्चित; 9 बळी घेतलेल्या मारबर्ग व्हायरसचा WHO नेही घेतला धसका तज्ज्ञ म्हणाले, सध्या कॉर्डीसेप्स मुंग्यांसारख्या थंड रक्ताच्या प्रजातींवर हल्ला करत आहे. जर कॉर्डिसेप्स तापमानात स्वतःला अॅडजस्ट करू शकले तर चिंतेचा विषय आहे. दरम्यान मॅनचेस्टर युनिव्हर्सिटीतील फंगल इन्फेक्शन ग्रुपचे रिसर्च असोसिएच नॉर्मन व्हॅन रिजन म्हणाले, असं कधीच होऊ शकत नाही, पण त्यांनी काहीच अशक्यही नाही, असंही म्हटलं आहे.

News18लोकमत
News18लोकमत

हरणांनाही झोम्बी व्हायरसची लागण याआधी कॅनडातील हरणांना झोम्बी व्हायरसची लागण झाल्याची बातमी समोर आली होती. कॅनडात हा आजार सर्वात आधी 1996 सालीसुद्धा आढळला होता. एका फार्ममध्ये हा व्हायरस पसरला. त्यानंतर इतर प्राण्यांमध्ये हा व्हायरस पसरत गेला. त्यानंतर या सर्व प्राण्यांना मारण्यात आलं. जेणेकरून इन्फेक्शनवर नियंत्रण मिळवता येईल. युनिव्हर्सिटी ऑफ अल्बर्टाचे वाइल्डलाइफ स्पेस्लिस्ट मार्गो पिबस यांनी सांगितलं की ही महासाथ हरणांमध्ये वेगाने पसरली. कॅनडातील काही भागात याला क्रोनिक वेस्टिंग डिसीज म्हणून घोषित करण्यात आलं होतं. हे वाचा -  अरे बापरे! हे काय? अशा अवयवासह जन्माला आली चिमुकली, डॉक्टरही शॉक CWD ने हरणांमधील हा व्हायरस इतर प्राणी किंवा इतर माणसांमध्येही पसरू शकतो, अशी चिंता व्यक्त केली आहे. माणसांना या व्हायरसची लागण फक्त प्राण्याचं मांस खाल्ल्याने नाही तर प्राण्याची लघवी, लाळ, थूंक याच्या संपर्कात आल्यानेही होऊ शकतो.  या व्हायरसची लागण झाल्यास माणसांमध्ये डायरिया, डिप्रेशन आणि लकवा मारल्यासारखी लक्षणं दिसू शकतात. सुदैवाने अद्याप माणसांमध्ये या व्हायरसची लागण झाल्याचं एकही प्रकरण समोर आलेलं नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात