वॉशिंग्टन, 15 फेब्रुवारी : कुणाला चार हात, कुणाला चार पाय, कुणाचं पोट किंवा डोकं एकमेकांना जोडलेलं अशी काही विचित्र बाळांची प्रकरणं तुम्हाला माहिती असतील. असंच एक विचित्र बाळ जन्माला आलं, ज्याला असा अवयव होता की पाहून डॉक्टरही शॉक झाले. माणसं वेगवेगळी दिसत असतील तरी त्यांची शरीराची रचना सारखीच असते. म्हणजे दोन डोळे, दोन कान, दोन हात, दोन पाय, एक नाक… माणसं अशीच असतात. पण हे बाळ मात्र थोडं वेगळं होतं. या अवयवांशिवाय या बाळाला आणखी एक अवयव होता. मेक्सिकोतील हे विचित्र प्रकरण आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार उत्तर-पूर्व मेक्सिकोतील न्यूवो लिओनमधील एका रुग्णालयात या मुलीचा जन्म झाला. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण या चिमुकलीला शेपटी होती. आदिमानवाला शेपटी होती हे तुम्हाला माहिती असेल. हळूहळू शेपटीचा वापर कमी झाला आणि शेपटी गळून पडली. त्यानंतर माणसांना शेपटी आलीच नाही. आता फक्त प्राण्यांना शेपटी असते माणसांना नाही. त्यामुळे शेपटीसह जन्माला आलेल्या या चिमुकलीला पाहून डॉक्टरही हैराण झाले. हे वाचा - बापरे बाप! हे असं बाळ; प्रेग्नंट महिलेच्या डिलीव्हरीनंतर डॉक्टरांनाही बसला धक्का जर्नल ऑफ पीडियाट्रिक सर्जरीत या केसबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. ही मुलगी पोटात असताना प्रेग्नन्सीवेळी तिच्या आईला कोणतीच समस्या आली नाही. तिला याआधी कोणता आजारही नव्हता. बाळालाही कोणता आजार नाही. जवळपास 6 सेंटीमीटर लांब आणि 3 ते 5 मिमी व्यासाची ही शेपटी. या शेपटीवर थोडे केस होते. शेपटीचं शेवटचं टोक गोलाकार होतं. त्यावर त्वचा आणि थोडे केस होते. शेपटी नरम होती. त्यात मांस आणि नसा होत्या. सुईने टोचताच ते जाणवल्याने बाळ रडतही होतं. मुलीचा एक्स-रे करण्यात आला तेव्हा शेपटीच्या आत कोणतं हाड नव्हतं. म्हणजे शेपटी तिच्या अवयवांना जोडलेली नव्हतं. त्यामुळे डॉक्टरांच्या मते, शरीरातील हा नको असलेला अवयव होता. हे वाचा - मुलीला अशा ठिकाणी आले केस की आई हादरली; डॉक्टरही म्हणाले, हा खतरनाक आजाराचा संकेत मुलीच्या जन्मानंतर दोन महिन्यांनी पुन्हा तपासणी करण्यात आली. त्यात शेपटीचा आकार वाढत असल्याचं समजलं. त्यामुळे सर्जरी करून डॉक्टरांनी ही शेपटी काढून टाकली आणि तिला डिस्चार्ज देण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.