जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / कोरोनापेक्षाही भयंकर! 88% मृत्यू निश्चित; 9 बळी घेतलेल्या मारबर्ग व्हायरसचा WHO नेही घेतला धसका

कोरोनापेक्षाही भयंकर! 88% मृत्यू निश्चित; 9 बळी घेतलेल्या मारबर्ग व्हायरसचा WHO नेही घेतला धसका

प्रतीकात्मक फोटो (Credit- Shutterstock)

प्रतीकात्मक फोटो (Credit- Shutterstock)

कोरोनानंतर आता नव्या व्हायरसने सर्वांमध्ये दहशत निर्माण केली आहे.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

जिनिव्हा, 15 फेब्रुवारी : आता कुठे कोव्हिडमधून मोकळा श्वास मिळतो आहे. तोच आता नव्या व्हायरस ने दहशत निर्माण केली आहे. हा व्हायरस कोरोना पेक्षाही  यंकर असल्याचं सांगितलं जातं आहे. आतापर्यंत या व्हायरसने 9 बळी घेतले आहेत आणि या व्हायरसच्या विळख्यात कुणी आलं तर 88 टक्के मृत्यूचा धोका आहे, असं WHO ने सांगितलं आहे. या व्हायरसचा धसका घेत जागतिक आरोग्य संघटनेनेही अलर्ट केलं आहे.

जाहिरात

आफ्रिकेच्या गिनीमध्ये हा विषाणू आढळून आला आहे. ज्याचं नाव आहे मारबर्ग व्हायरस. गिनीमध्ये या व्हायरसची लागण झालेल्या 9 जणांचा मृत्यू झाला आहे. WHO च्या मते, पूर्वी मारबर्ग हेमोरेजिक ताप म्हणून ओळखला जात होता, हा एक गंभीर, अनेकदा प्राणघातक रक्तस्रावी ताप आहे. हा इबोलासारखा फिलोव्हायरस आहे. याची लक्षणे इबोला व्हायरससाऱखीच आहे आणि उत्पत्तीही वटवाघळांमधूनच झाली आहे. राउसेटस फ्रूट-बॅट हे मारबर्ग व्हायरसचे होस्ट मानले जाते. जर्मनीतील मारबर्ग आणि फ्रँकफर्ट, बेलग्रेड आणि सर्बिया येथे एकाच वेळी उद्रेक झाल्यानंतर 1967 मध्ये याची ओळख झाली. हे वाचा -  तयार राहा! कोरोनानंतर आणखी एका महासाथीचं संकट, WHO चा Alert; ‘हा’ आहे बचावाचा उपाय जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार मारबर्ग हा विषाणू वटवाघळांद्वारे मनुष्यात पसरतो. मारबर्गची लागण झालेल्या व्यक्तीच्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या द्रव पदार्थांमार्फत याचा प्रसार होतो. यात मग शिंकताना किंवा खोकताना बाहेर पडणाऱ्या कणांचाही समावेश आहे. यामार्फत हा विषाणू थेट दुसऱ्या व्यक्तीपर्यंत जाऊ शकतो. किंवा एखाद्या वस्तूच्या पृष्ठभागावर राहून, ती वस्तू हाताळणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात हा विषाणू जाऊ शकतो. एकंदरीतच कोरोनाप्रमाणेच या विषाणूचाही प्रसार होतो. आतापर्यंत या विषाणूवर कोणताही उपचार किंवा कोणतीही लस सापडलेली नाही. त्याची लक्षणे 2 ते 21 दिवसांच्या दरम्यान कधीही सुरू होऊ शकतात. यानंतर तुम्हाला खूप ताप, स्नायू दुखणे आणि तीव्र डोकेदुखी यांसारखी लक्षणे जाणवू शकतात. तिसर्‍या दिवशी, रुग्णाला ओटीपोटात दुखणे, उलट्या होणे, तीव्र पातळ जुलाब आणि आकुंचन यांची तक्रार होऊ शकते. 5 ते 7 दिवसांदरम्यान रुग्णाला नाकातून रक्त येणे, हिरड्यांमधून रक्त येणे, उलट्या होणे आणि मलमध्ये रक्त येणे अशी तक्रार असू शकते. लक्षणे दिसू लागल्यानंतर 8 ते 9 दिवसांच्या दरम्यान रक्तस्त्राव होऊन रुग्णांचा मृत्यू होतो. हे वाचा -  फुफ्फुसाच्या आजाराने अभिनेते Javed Khan Amrohi यांचा मृत्यू; तुमच्यात तर नाहीत ना अशी लक्षणं? अशा स्थितीत आफ्रिकेतून बाहेर पडून इतर देशांमध्ये पोहोचल्यास त्याचे परिणाम कोरोनासारखे भयानक होऊ शकतात. इबोला विषाणूचे भयावह रूप आफ्रिका आणि युरोपीय देशांमध्ये यापूर्वीच दिसून आले असल्याने डब्ल्यूएचओची भीतीही रास्त आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात