मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

गरम पाण्याचे फायदे सर्वांनाच माहिताहेत; त्यात या गोष्टी घालून पिणं ठरेल अधिक गुणकारी 

गरम पाण्याचे फायदे सर्वांनाच माहिताहेत; त्यात या गोष्टी घालून पिणं ठरेल अधिक गुणकारी 

काही घरगुती वस्तू गरम पाण्यात मिसळून त्यांचं सेवन केलं तर ते अधिक फायदेशीर आणि आरोग्यदायी बनतं (Home Remedies With Hot Water). जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या वस्तू..

काही घरगुती वस्तू गरम पाण्यात मिसळून त्यांचं सेवन केलं तर ते अधिक फायदेशीर आणि आरोग्यदायी बनतं (Home Remedies With Hot Water). जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या वस्तू..

काही घरगुती वस्तू गरम पाण्यात मिसळून त्यांचं सेवन केलं तर ते अधिक फायदेशीर आणि आरोग्यदायी बनतं (Home Remedies With Hot Water). जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या वस्तू..

    नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर : गरम पाण्याचं (Hot Water) सेवन केल्यानं शरीराच्या अनेक प्रकारच्या समस्या दूर होतात. हे प्यायल्यानं शरीरातून अपायकारक घटक बाहेर टाकले जातात. यामुळं अनेक गंभीर आजारांचे धोके टाळता येतात. गरम पाणी पोटाच्या समस्या (Stomach Problems) दूर करण्यासाठी उपयुक्त आहे. तसंच, वजन घटवण्यासाठीदेखील (Weight Loss) उपयुक्त आहे. काही घरगुती वस्तू गरम पाण्यात मिसळून त्यांचं सेवन केलं तर ते अधिक फायदेशीर आणि आरोग्यदायी बनतं (Home Remedies With Hot Water). जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या वस्तू.. गरम पाण्यात हळद मिसळा हळदीमध्ये कर्क्युमिन तत्त्व असतं. यामुळं कर्करोगाचा धोका कमी होतो. हळदीच्या सेवनाने शरीराची रोगप्रतिकारक शक्तीही मजबूत होते. गरम पाण्यात हळद टाकून आणि रोज घेतल्याने शरीराचे पचन सुधारते. याशिवाय, कफाची समस्याही दूर होते. हळद शरीरातील अंतर्गत जखमदेखील बरी करते. हळदीमुळं रक्त शुद्ध होतं आणि शरीर निरोगी बनतं. लसणीचं दररोज करा गरम पाण्यासह सेवन लसूण जेवणाची चव वाढवतो. तो शरीरासाठीदेखील फायदेशीर आहे. त्यात असे अनेक पौष्टिक पोषक घटक आहेत, जे अनेक प्रकारच्या रोगांशी लढण्यासाठी उपयुक्त आहेत. लसणाचं सेवन हृदयासाठी फायदेशीर आहे. उच्च कोलेस्टेरॉलच्या रुग्णांनी दररोज गरम पाण्यातून लसणाचं सेवन करावं. यानं कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होईल. बद्धकोष्ठतेच्या समस्येत कच्च्या लसणाची कळी गरम पाण्यातून घेतल्यानं पचन सुधारतं. लसणीमध्ये अनेक अँटी-ऑक्सिडंट घटक असतात. याव्यतिरिक्त, उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठीदेखील हे प्रभावी आहे. कोमट पाण्यातून लिंबू आणि मध घ्या कोमट पाण्याबरोबर लिंबू आणि मध घेतल्यानं वजन कमी होण्यास मदत होते. मधामध्ये अनेक बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म असतात. ते शरीराला संसर्गापासून वाचवण्यासाठी उपयुक्त असतात. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असतं. याच्यामुळं शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत बनते. नियमितपणे गरम पाण्यातून लिंबू आणि मध घेतल्यामुळं वातावरणात बदल झाल्यानं होणारे अनेक प्रकारचे आजार टाळण्यास मदत होते. पोटाशी संबंधित समस्यांमध्येही हे खूप फायदेशीर आहे. याच्यामुळं गॅस समस्या आणि बद्धकोष्ठताही बरी होऊ शकते. सकाळी नियमितपणे रिकाम्या पोटी याचं सेवन करणं अधिक फायदेशीर आहे. हे वाचा - Success Story : MBA चं काय जमेना म्हणून चहाचा स्टॉल चालू केला; 22 वर्षीय तरुण आहे आता करोडपती गुळासह गरम पाण्याचे फायदे गुळ पोषणमूल्यांनी समृद्ध आहे. रोज गुळ खाऊन त्यानंतर गरम पाणी प्यायल्यास शरीराची पाचन प्रणाली मजबूत होते. तसंच, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. (सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य  माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Drink water, Health Tips

    पुढील बातम्या