मराठी बातम्या /बातम्या /देश /

HUNGER INDEX: भारतातील भूक आणि कुपोषणात वाढ, पाकिस्तानपेक्षाही वाईट अवस्था; वाचा सविस्तर

HUNGER INDEX: भारतातील भूक आणि कुपोषणात वाढ, पाकिस्तानपेक्षाही वाईट अवस्था; वाचा सविस्तर

भारतातील भूक आणि कुपोषणाची स्थिती भीषण (India slips to 101 position in global hunger index) असून पाकिस्तान आणि नेपाळपेक्षाही बिकट अवस्था भारताची असल्याचं सिद्ध झालं आहे.

    नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर : भारतातील भूक आणि कुपोषणाची स्थिती भीषण (India slips to 101 position in global hunger index) असून पाकिस्तान आणि नेपाळपेक्षाही बिकट अवस्था भारताची असल्याचं सिद्ध झालं आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या हंगर इंडेक्स रिपोर्टमध्ये ही बाब स्पष्ट करण्यात आली असून भारतासाठी (India slips to 101 position from 94 last year) ही चिंतेची बाब असल्याचं दिसून आलं आहे. काय आहे रिपोर्टमध्ये? या रिपोर्टमध्ये एकूण 116 देशांतील भूक आणि कुपोषणाच यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात भारताचा नंबर 101 वा आहे. याचाच अर्थ 116 पैकी 100 देशांमध्ये भारतापेक्षा भूक आणि कुपोषण कमी असल्याचं दिसून आलं आहे. यामध्ये पाकिस्तान 92 व्या तर नेपाळ आणि बांग्लादेश 76 व्या स्थानी आहेत. गेल्या वर्षी भारत 94 व्या स्थानी होत्या. त्यात घसरण होऊन भारत या वर्षी 101 व्या स्थानावर फेकला गेला आहे. चीन, कुवैत आणि ब्राझील हे देश टॉप 18 मध्ये असून त्यांनी पाचपेक्षा कमी स्कोअर टिकवून ठेवला आहे. जगातील वेगवेगळ्या देशांतील नागरिकांचं पोषण, खाण्यापिण्याच्या सुविधा आणि पोषणमूल्यं किती मिळतात, याच्या आधारावर हा हंगर इंडेक्स ठरवला जातो. आयर्लंड आणि जर्मनीतील कंपन्यांनी मिळून याचा सर्व्हे केला असून रिपोर्ट सादर केला आहे. हे वाचा - निर्दय! पती आणि पत्नी झाले कोरोना पॉझिटीव्ह, सरकारने मारले 12 पाळीव कुत्रे या निकषांचा होतो विचार हंगर इंडेक्स ठरवण्यासाठी मुख्यत्वे चार निकषांचा विचार केला जातो. त्यामध्ये मुलांचं होणारं अल्पपोषण, पाच वर्षांच्या आतील मुले ज्यांचं वजन उंचीच्या तुलनेत कमी आहे, पाच वर्षांआतील मुले ज्यांची उंची वयाच्या तुलनेत कमी आहे आणि बालमृत्यूचा दर या तपशीलांच्या आधारे भूक निर्देशांक निश्चित करण्यात येतो. जीएचआय स्कोअर जास्त असणं याचा अर्थ देशात भूक आणि कुपोषण यांचं प्रमाण अधिक असणं. भारतातील हे प्रमाण चिंताजनक असून कोरोना काळातील निर्बंध आणि घसरलेला आर्थिक गाडा यांमुळेदेखील देशातील कुपोषणात वाढ झाल्याचं निरीक्षण या रिपोर्टमध्ये नोंदवण्यात आलं आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Health, India

    पुढील बातम्या