मराठी बातम्या /बातम्या /heatlh /World Sleep Day: जोडीदारासोबत झोपण्याची सवय तुम्हाला ठेवेल निरोगी, जाणून घ्या 5 फायदे

World Sleep Day: जोडीदारासोबत झोपण्याची सवय तुम्हाला ठेवेल निरोगी, जाणून घ्या 5 फायदे

जर तुम्ही जोडीदारासोबत झोपलात तर त्याच्या स्पर्शामुळे तुमचं शरीर रिलॅक्स (Relaxation) होतं. त्यामुळे ताण आणि भीती दोन्हीही कमी होते.

जर तुम्ही जोडीदारासोबत झोपलात तर त्याच्या स्पर्शामुळे तुमचं शरीर रिलॅक्स (Relaxation) होतं. त्यामुळे ताण आणि भीती दोन्हीही कमी होते.

जर तुम्ही जोडीदारासोबत झोपलात तर त्याच्या स्पर्शामुळे तुमचं शरीर रिलॅक्स (Relaxation) होतं. त्यामुळे ताण आणि भीती दोन्हीही कमी होते.

मुंबई 19 मार्च : चांगल्या आरोग्यासाठी जसा चांगला आहार घेणं आवश्यक आहे, व्यायाम करणं आवश्यक आहे तसंच विश्रांतीही तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळेच रात्रीच्या झोपेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जगभरात दरवर्षी 21 मार्चपूर्वी येणाऱ्या शुक्रवारी (World Sleep Day) म्हणजेच आंतरराष्ट्रीय निद्रा दिवस साजरा केला जातो. जगभरात सुमारे 10 कोटी लोकांना झोपेसंबंधी स्लीप एप्निआ या आजाराने ग्रासलं आहे. त्यामुळे त्यांना चांगली झोप लागत नाही. झोपेला तर सजीवांच्या जीवनात महत्त्व आहेच पण चांगल्या झोपेबरोबरच तुमच्या जोडीदारासोबत झोपण्यालाही महत्त्व आणि त्याचे फायदे आहेत. आज आम्ही तुम्हाला जोडीदारासोबत झोपण्याचे 5 फायदे सांगणार आहोत.

​सुरक्षित असल्याची भावना - 

माणूस जेव्हा एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतो तेव्हा त्याच्या सहवासात त्याला सुरक्षित वाटतं. आपल्या जोडीदारासोबत झोपतानाही त्याच्या मनात हीच सुरक्षिततेची भावना (Feeling of Security) असते. सोबत झोपल्यामुळे जोडप्यांमध्ये चांगलं नातं कायम राहतं आणि त्यांना रिलॅक्स वाटतं. एखादी व्यक्ती मानसिकदृष्ट्या उत्तम असण्यामध्ये ती व्यक्ती जोडीदारासोबत झोपत असल्याचं पण मोठं योगदान असतं.

रोगप्रतिकारशक्ती वाढते -

जोडीदारासोबत झोपल्यामुळे तुमच्या प्रतिकारशक्तीतही (Immune System) वाढ होते. जोडीदारासोबत झोपल्यामुळे माणसाच्या मेंदूत काही रसायना स्रवतात त्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते.

लवकर झोप लागते

तुम्ही जर ताणाखाली असाल तर कदाचित एकटे असताना तुम्हाला झोपच येणार नाही पण जर जोडीदारासोबत झोपलात तर तुम्हाला लवकर उत्तम झोप लागते.

चिडचिड कमी होते

चिडचिड झाल्यावर अस्वस्थपणामुळे अनेकांना रात्र-रात्र झोपच येत नाही. पण जर तुम्ही जोडीदारासोबत झोपलात तर त्याच्या स्पर्शामुळे तुमचं शरीर रिलॅक्स (Relaxation) होतं. त्यामुळे ताण आणि भीती दोन्हीही कमी होते. जर्मनीतील सेंटर फॉर इंटिग्रेटिव्ह सायकॅट्रीमधील डॉ. हेनिंग यांच्या म्हणण्यानुसार एका जोडीदारासोबत झोपण्यामुळे तुमचं आरोग्य, स्मरणशक्ती आणि प्रश्न सोडवण्याच्या क्षमतेला चालना मिळते.

नैसर्गिक दुखणं कमी होतं

जोडीदारासोबत झोपल्यामुळे मेंदूत अनेक रसायनं स्रवतात आणि त्यामुळे जुनी दुखणीही बरी होऊ शकतात. या प्रक्रियेमुळे तुम्हाला तातडीने आराम मिळतो.

First published:

Tags: Health, Immun, Lifestyle, Sleep benefits, Wellness