जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / World Rivers Day 2022: नद्यांचे संवर्धन, काळाची गरज; आज जागतिक नदी दिवस

World Rivers Day 2022: नद्यांचे संवर्धन, काळाची गरज; आज जागतिक नदी दिवस

नदीचे छायाचित्र

नदीचे छायाचित्र

या वर्षीच्या जागतिक नद्या दिनाची थीम ही ‘जैवविविधतेसाठी नद्यांचे महत्त्व’ आहे. कोणतीही परिसंस्था, संस्कृती चालू ठेवण्यासाठी नद्यांची नितांत गरज हा, या वर्षीच्या थीमचा केंद्रबिंदू आहे.

  • -MIN READ Lanja,Ratnagiri,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 25 सप्टेंबर : जलस्रोतांबाबत जनजागृती करण्यासाठी आणि त्यांचे संवर्धन करण्यासाठी जागतिक नदी दिन साजरा केला जातो. हा दिवस दरवर्षी सप्टेंबरच्या चौथ्या रविवारी साजरा केला जातो आणि या वर्षी तो 25 सप्टेंबर रोजी आला आहे. जागतिक नदी दिन हा जगाच्या जलमार्गांचा जणू उत्सव म्हणून साजरा करण्याची आवश्यकता आहे. या दिवसाचे औचित्य साधून नद्यांच्या नैसर्गिक मूल्यांवर प्रकाश टाकला जातो आणि नंद्यांविषयी सार्वजनिक जागरूकता वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. जगभरातील नद्यांवर आलेल्या संकटाकडे लक्ष वेधण्यासाठी हा दिवस साजरा होतो. जागतिक नदी दिवस 2022: थीम या वर्षीच्या जागतिक नद्या दिनाची थीम ही ‘जैवविविधतेसाठी नद्यांचे महत्त्व’ आहे. कोणतीही परिसंस्था, संस्कृती चालू ठेवण्यासाठी नद्यांची नितांत गरज हा, या वर्षीच्या थीमचा केंद्रबिंदू आहे. केवळ मानवच नाही, तर नद्या अनेक प्राण्यांना जगवतात आणि नैसर्गिक परिसंस्था जिवंत ठेवण्यात मोलाचा हातभार लावतात. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे नदी कार्यकर्ता, मार्क अँजेलो यांनी सप्टेंबर 1980 मध्ये ब्रिटिश कोलंबियातील थॉम्पसन नदीच्या स्वच्छतेचा एक मोठा कार्यक्रम सुरू केला. 2005 मध्ये त्याला यश मिळाल्यानंतर, तो दिवस नदी दिवस म्हणून ओळखला जाऊ लागला. त्याच्या यशानंतर, अँजेलोने जागतिक नद्या दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव दिला. मार्क अँजेलो यांनी 2005 मध्ये युनायटेड नेशन्सला त्यांच्या वॉटर फॉर लाइफ मोहिमेदरम्यान संबोधित केले, त्यांनी जगभरातील असुरक्षित पाणीपुरवठ्याबद्दल जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अँजेलोच्या प्रस्तावाला प्रतिसाद म्हणून, UN ने जागतिक नदी दिन साजरा करण्यास सुरुवात केली. हा दिवस दरवर्षी सप्टेंबरच्या चौथ्या रविवारी साजरा केला जातो. हे वाचा -  तुमच्या हातच्या खाद्यपदार्थांनाही येईल हॉटेलस्टाईल फूडची चव; हे आहे सिम्पल मॅजिक 2005 मधील पहिला राबवलेला कार्यक्रम मोठ्या प्रमाणात यशस्वी झाला होता. कारण लाखो लोकांनी जगभरातील नद्यांचे संरक्षण करण्यासाठी हातात-हात दिले. दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या चौथ्या रविवारी नद्यांचा उत्सव साजरा करण्यासाठी जग एकत्र येते.

News18लोकमत
News18लोकमत

जागतिक नद्या दिनाचे महत्त्व : नद्या कोणत्याही परिसंस्थेचा आधारस्तंभ असतात. आज, जवळजवळ प्रत्येक देशातील नद्यांना मोठ्या धोक्यांचा सामना करावा लागत आहे. वाढते प्रदूषण आणि पाण्याची पातळी खालावणे यासह अनेक प्रश्न आहेत. जागतिक नद्या दिन जगभरातील लोकांना त्यांच्या सभोवतालच्या नद्यांच्या सुरक्षेसाठी पुढे येण्यास आमंत्रित करतो आणि त्यांच्या संवर्धनासाठी प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रोत्साहित केलं जातं. यानिमित्ताने UN देखील जगातील नद्यांना पाठिंबा देण्यासाठी प्रायोजक संस्थांना आमंत्रित करते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात