जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / World Diabetes Day : मधुमेह साखरेचा आजार हा गोड गैरसमज! पाहा काय आहे खरं कारण, Video

World Diabetes Day : मधुमेह साखरेचा आजार हा गोड गैरसमज! पाहा काय आहे खरं कारण, Video

World Diabetes Day : मधुमेह साखरेचा आजार हा गोड गैरसमज! पाहा काय आहे खरं कारण, Video

World Diabetes Day : मधुमेह हा साखरेचा आजार असल्याचा सर्वात गोड गैरसमज आहे. त्याचबरोबर गोळी घेतल्यानं या आजाराला फक्त अल्पविराम मिळू शकतो.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

    पुणे, 14 नोव्हेंबर :  बदलत्या जीवनशैलीमुळे पूर्वीच्या काळी वयाच्या साठीनंतर होणारे डायबिटीससारखे आजार हे ऐन तारुण्यात होत आहेत. 25 ते 35 वयोगटातील तरुणाई देखील मधुमेहाची रुग्ण होत असल्याचं प्रमाण सातत्यानं वाढतंय. मधुमेहाबाबत अनेक गैरसमज आणि भीती सर्वांमध्ये असते. मधुमेह हा साखरेचा आजार असल्याचा सर्वात गोड गैरसमज असल्याचं मत  हृदयरोग आणि मधुमेह रोग तज्ज्ञ डॉक्टर ऋतुपर्ण शिंदे यांनी व्यक्त केलंय. मधुमेह होऊ नये तसंच तो झाला तर नियंत्रणात कसा ठेवावा याबाबत महत्त्वाच्या टिप्स त्यांनी दिल्या आहेत. गोड गैरसमज डॉक्टर शिंदे सांगतात की,  ‘गेल्या काही वर्षांमध्ये तरुणाईमध्ये मोठ्या प्रमाणावर मधुमेह आणि हृदयरोगाचे प्रमाण वाढले आहे. या विषयावर केलेल्या संशोधनानुसार, आहार आणि जीवनशैलीच्या बदलामुळेच अनेकांना मधुमेहाची लागण होत आहे. मधुमेह होऊ नये आणि तो झालाच तर त्याचा सामना करण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे,’ असे त्यांनी स्पष्ट केले. मधुमेह हा साखरेचा आजार असल्याचा गोड गैरसमज असल्याचं शिंदे यांनी यावेळी सांगितलं.  ‘पूर्वीच्या काळी वेळेवर झोपणे, वेळेवर लवकर उठणे घरचे बनवलेले पदार्थ खाणे तसेच कमी मानसिक तणाव यामुळे डायबेटीसचे प्रमाण कमी होते. सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे नाईट लाईफ मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. कामाचा तसंच अन्य सर्व बाबतीमध्ये ताणतणाव वाढला आहे. आणि त्या ताणतणावाचे रूपांतर भरमसाठ बाहेरचे जंक फूड खाणे त्यामुळे वाढणारे वजन व्यायामाचा अभाव यामुळे सध्या मोठ्या प्रमाणात मधुमेहात वाढ झाली आहे.

    News18लोकमत
    News18लोकमत

    फक्त औषधं नको तर… मधुमेह झाल्यानंतर अनेक जण फक्त औषधावर अवलंबून राहातात.  औषधांवर अवलंबून न राहता आपल्या जीवनशैलीमध्ये बदल केले तर मोठ्या प्रमाणावर मधुमेहाला अटकाव करणे शक्य होते. मधुमेहाची गोळी घेणे हा तात्पुरता उपाय आहे. जीवनशैलीतील बदल हा कायमचा उपाय आहे. त्यासाठी योग्य आहार आवश्यक असून चुकीच्या दैनंदीन सवयी बदलल्या तरच मधुमेहाला अटकाव करता येईस. औषधांनी आजाराला केवळ स्वल्पविराम मिळतो.  तुम्ही वजन कमी केलं, मानसिक आरोग्य चांगलं ठेवलं, डाएट कंट्रोलमध्ये ठेवला तर त्याला पूर्णविराम मिळेल,’ असं डॉ. शिंदे यांनी सांगितलं.  या सगळ्यावर उपाय योग्य मार्गदर्शन आणि उपायांसाठी डॉ. ऋतुपर्ण शिंदे यांनी भारतात पहिल्यांदाच मेडिकल जिम सुरू केली आहे. रोजच्या लाईफमधील या चुकांमुळे डायबिटीस होण्याचा धोका, आधीच घ्या काळजी मेडिकल जिमच का! नॉर्मल जिममध्ये दहावी ते बारावी कुठल्याही स्वरूपाचे ट्रेनर असतात. बॉडी बनवणे, वेगवेगळ्या पावडर देणे, इंजेक्शन देणे या गोष्टी होतात, तसे आमच्याकडे नाही. आमच्याकडे क्वालिफाईड डॉक्टर आहेत. मी कार्डिऑलॉजी प्रॅक्टिसनंतर बारा वर्षे या क्षेत्रात आहे. थंडी सुरू झाली! मधुमेहाचा त्रास असणाऱ्यांनी आहारात या 5 गोष्टी नक्की घ्या सध्या लोकांना शॉर्टकट हवा असतो त्यामुळे त्यांना व्यायाम करा हे सांगणं पटवून देणं हे अवघड आहे. त्यांना क्विक रिझल्ट हवा असतो. एक इंजेक्शन द्या आणि मला बरे करा असा त्यांचा अ‍ॅप्रोच असतो. परंतु तसं प्रत्यक्षात घडत नाही. तहान लागल्यावर विहीर खोदण्यापेक्षा आधीच सावध राहणे आवश्यक आहे, या जिममध्ये तुम्हाला या सर्व गोष्टींसाठी डॉक्टरांचे मार्गदर्शन मिळते,’ अशी माहिती शिंदे यांनी दिली.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात