मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Eyes Health Care Tips: डोळे निरोगी ठेवण्यासाठी आहारापासून या गोष्टींचीही घ्या काळजी, फॉलो करा 4 टिप्स

Eyes Health Care Tips: डोळे निरोगी ठेवण्यासाठी आहारापासून या गोष्टींचीही घ्या काळजी, फॉलो करा 4 टिप्स

अनेकवेळा चुकीची जीवनशैली, पौष्टिक आहार नसणं, सतत गॅजेट्सवर डोळे खिळून राहिल्याने पाहण्याची क्षमता क्षीण होऊ लागते. वाढत्या वयासोबत व्हिजन लॉस होऊ नये याकरता काही गोष्टी करण्यास तुम्ही सुरूवात करा.

अनेकवेळा चुकीची जीवनशैली, पौष्टिक आहार नसणं, सतत गॅजेट्सवर डोळे खिळून राहिल्याने पाहण्याची क्षमता क्षीण होऊ लागते. वाढत्या वयासोबत व्हिजन लॉस होऊ नये याकरता काही गोष्टी करण्यास तुम्ही सुरूवात करा.

अनेकवेळा चुकीची जीवनशैली, पौष्टिक आहार नसणं, सतत गॅजेट्सवर डोळे खिळून राहिल्याने पाहण्याची क्षमता क्षीण होऊ लागते. वाढत्या वयासोबत व्हिजन लॉस होऊ नये याकरता काही गोष्टी करण्यास तुम्ही सुरूवात करा.

नवी दिल्ली 08 मार्च : सतत लॅपटॉप आणि डेस्कटॉपवर काम करून अनेकांना डोळ्यांशी निगडीत समस्या (Eye Related Problems) जाणवू लागतात. वाढत्या वयासोबत दृष्टी दोषाचा त्रास सुरू होतो. अनेकवेळा चुकीची जीवनशैली, पौष्टिक आहार नसणं, सतत गॅजेट्सवर डोळे खिळून राहिल्याने पाहण्याची क्षमता क्षीण होऊ लागते. कमी दिसणं, धूसर दिसणं, कोरडे डोळे, डोळ्यांची जळजळ होणं, डोळ्यात पाणी येणं, डोळे दुखणं, डोळ्यांच्या आसपास सूज येणं यामुळे लोकं त्रासून जातात.

खरं तर वाढत्या वयासोबत दिसण्याची क्षमता किंवा व्हिजन लॉस (Vision loss) ही सामान्य बाब आहे. पण कमी वयातच या समस्या होणं ही गोष्ट योग्य नाही. आजकाल लोकांच्या हातात रात्री उशिरापर्यंत आणि सकाळी झोपून उठताच मोबाईल असतो. मग ते ऑफिसच्या कामासाठी पुन्हा लॅपटॉपसमोर बसतात. अशावेळी डोळ्यांची नीट काळजी न घेतल्यास डोळ्यांच्या समस्या (How to keep eyes healthy) जाणवणं साहजिक आहे. वाढत्या वयासोबत व्हिजन लॉस होऊ नये याकरता काही गोष्टी करण्यास तुम्ही सुरूवात करा.

तुम्ही रोज किती वेळा अंघोळ करता? जाणून घ्या, आंघोळीविषयी माहिती

डोळे निरोगी ठेवण्यासाठी खालील 4 उपाय करा -

पौष्टिक आहार घेणं आहे गरजेचं

पिंकव्हिला वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टनुसार, डोळे निरोगी राहण्यासाठी पौष्टिक आहार घेण्यास सुरूवात करा. यामध्ये हिरव्यागार भाज्या आणि मासे यासारखे अँटिऑक्सिडंट्सयुक्त खाद्यपदार्थ आहारात सामील करा. सोबतच व्हिटॅमीन ए आणि सी युक्त पदार्थ, विशेषतः चरबीयुक्त मासे जसं सालोमन खा. यामध्ये डोळ्यांसाठी आवश्यक असलेलं ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड असतं जे डोळ्यातील मॅक्युलाच्या (Macula) आरोग्यासाठी महत्त्वाचं असतं. मॅक्युला हा डोळ्यातील तो भाग आहे, जो सेंट्रल व्हिजनसाठी (Central Vision) जबाबदार असतो.

भरपूर झोप घ्या

जेव्हा तुम्ही पुरेशी झोप घेता तेव्हा तुम्हाला आपोआपच डोळ्यांच्या आरोग्यात फरक दिसून येईल. तुम्ही निरोगी दिसाल. घरी आणि ऑफिसच्या ठिकाणी चांगलं परफॉर्म कराल. चांगल्या झोपेने डोळ्यांचं आरोग्य अबाधित राहतं. डोळ्यांचा थकवा, सूज, डोळ्यांच्या आसपास डार्क सर्कलसारख्या समस्या होणार नाहीत. पुरेशा प्रमाणात रात्रीची झोप घेण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे आपली प्रतिकारशक्तीही मजबूत होते.

Diet करत होता शेन वॉर्न, वजन कमी करताना तुम्हीही घ्या ही काळजी!

डोळ्यांसाठी सनग्लासेस आवश्यक

डोळ्यांना निरोगी ठेवण्याचा सर्वांत चांगला उपाय म्हणजे चांगल्या क्वालिटीचे सनग्लासेस म्हणजे गॉगल वापरणं. यामुळे डोळ्याचं सूर्याच्या अतिनील किरणांपासून रक्षण होतं. तुम्ही खूप वेळ उन्हात राहिल्यास डोळ्यांना अधिक यूव्ही एक्सपोजर मिळतं. ज्यामुळे मोतीबिंदू होण्याची शक्यता वाढते. 99 ते 100 टक्के यूव्हीए आणि यूव्हीबी सुरक्षा देणारे सनग्लासेस खरेदी करा.

डोळ्यांना वारंवार स्पर्श करणं टाळा

काही जणांना वारंवार डोळ्यांना हात लावणं किंवा डोळे चोळण्याची सवय असते. जेव्हाजेव्हा डोळ्यांना हात लावायचा असेल तेव्हा ते स्वच्छ धुतलेले असावेत. कारण बोटं आणि हातावर अनेक प्रकारचे जीवजंतू लपलेले असतात. जे डोळ्यांपर्यंतही पोहचू शकतात. ज्यामुळे इंफेक्शन, बॅक्टेरियल कंन्जंक्टिव्हाइटीस होऊ शकतो.

डोळ्यांसाठी वरील चांगल्या सवयी आपल्याशा करून तुम्ही दृष्टी दोष किंवा कोणत्याही प्रकारच्या डोळ्यांशी निगडीत समस्या टाळू शकता. त्यामुळे आजपासूनच वरील सवयी अंगवळणी पाडून घ्या.

First published:

Tags: Eyes damage, Health Tips