Home /News /lifestyle /

शिंकताना डोळे बंद का होतात? जाणून घ्या यामागचं कारण

शिंकताना डोळे बंद का होतात? जाणून घ्या यामागचं कारण

शिंका येणं ही खूप स्वाभाविक गोष्ट आहे; मात्र शिंकताना नेहमी आपले डोळे बंद (Why Eyes Get Closed During Sneezing) होतात. असं का होतं, याचा कधी विचार केलाय? त्यामागे शरीरातलं एक रहस्य आहे.

    मुंबई, 17 जून : शिंका येणं ही खूप स्वाभाविक गोष्ट आहे; मात्र शिंकताना नेहमी आपले डोळे बंद (Why Eyes Get Closed During Sneezing) होतात. असं का होतं, याचा कधी विचार केलाय? त्यामागे शरीरातलं एक रहस्य आहे. शिंकणं ही शरीराची संरक्षणात्मक प्रक्रिया आहे. तसं करून नाक आणि फुप्फुसातली हवा बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातो. नाकात एखादा जिवाणू, विषाणू किंवा एखादा बारीक कण गेला, तरी तो बाहेर काढण्यासाठी शिंक येते. पाइपराइन, कॅप्सिसिन या रसायनांना नाकातून बाहेर काढण्यासाठीही शिंका येतात. ही रसायनं मिरी किंवा मिरचीमध्ये असतात. काही जणांना उन्हामुळे शिंका येतात, तर काहींना भावनिक झाल्यावरही शिंका येतात. डोळे बंद होणं ही प्रतिक्षिप्त क्रिया प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीनुसार कमी-जास्त प्रमाणात शिंका (Sneezing) येतात; मात्र शिंका येताना डोळे हमखास मिटले जातात. याबाबत असा एक समज होता, की शिंकताना डोळे उघडे ठेवायचा प्रयत्न केल्यास डोळ्यातली बुबुळं बाहेर येऊ शकतात; मात्र तसं काहीही होत नाही. खरं तर शिंकताना आपलं शरीर प्रतिक्षिप्त क्रिया (Autonomic Reflex) करून डोळे बंद करून घेतं. प्रत्यक्षात आपण त्याचा विचारही करत नाही, तेवढ्यात डोळे बंद झालेले असतात. (अपंग 'कोच'च्या जिद्दीला सलाम! दोन्ही पाय गमावले; तरीही एक पैसा न घेता घडवलेत शेकडो खेळाडू, पहा VIDEO) शिंकताना आवाज का येतो? शिंकताना तोंडावाटे निघणारे जिवाणू डोळ्यांमध्ये जाऊ नयेत, यासाठी आपोआप डोळे मिटले जातात, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. ही प्रतिक्षिप्त क्रिया असल्यानं त्यात काही चुकीचं नसतं. तुम्हाला हवं तर तुम्ही शिंकताना डोळे उघडेही ठेवू शकता; मात्र शास्त्रज्ञांच्या मतानुसार जिवाणू डोळ्यात जाऊ द्यायचे नसतील, तर डोळे बंद ठेवणंच चांगलं. दुसरी गोष्ट म्हणजे शिंकताना डोळे उघडे ठेवणं शक्यच नाही. काही जण खूप मोठ्यानं (Noise During Sneezing) शिंकतात, तर काहींना शिंक आलेली कळतही नाही. शिंकताना आवाज होण्यामागे बाहेर पडणारी हवा हेच कारण आहे. नाकातली किंवा फुप्फुसातली हवा एकदम बाहेर येताना त्याचा आवाज येतो. जितकी जास्त हवा बाहेर येते, तितका तिचा आवाज मोठा असतो. काही जणांना अ‍ॅलर्जीमुळे शिंका येतात, काहींना हवामानबदलामुळे शिंका येतात. सर्दी झाल्यावरही शिंका येतात. शिंका कशाहीमुळे आल्या, तरी डोळे मात्र बंद होतातच. कोरोना महामारीच्या काळात शिंक म्हणजे भीतीचं कारण झालं होतं. शास्त्रज्ञांच्या मतानुसार शिंकेतून बाहेर पडणारा द्रव संसर्गाला कारणीभूत ठरण्याची शक्यता असल्याने ते चिंतेचं कारण होतं; पण एरव्ही शिंक येणं ही शरीराची प्रतिक्षिप्त क्रिया असल्यानं त्यात भीतीचं काहीच कारण नसतं.
    First published:

    Tags: Lifestyle

    पुढील बातम्या