मुंबई, 18 मार्च : कोणत्याही प्रकारचं व्यसन (Addiction) हे आरोग्यासाठी घातक असतं. धूम्रपानदेखील (Smoking side effect) त्याला अपवाद नाही. काही युवक-युवती फॅशन आणि पॅशन म्हणून धूम्रपान करतात. हे ठराविक वयातलं आकर्षण असलं तरी नंतरच्या काळात त्याचे आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होतात. धूम्रपानाचा फुफ्फुसावर परिणाम होतो हे माहिती आहे पण त्याचा आता बोटांवरही भयावह परिणाम झाल्याचा दिसून आला आहे (Side effects of smoking on fingers). धूम्रपानाच्या आहारी गेलेल्या दक्षिण आफ्रिकेतल्या (South Africa) 48 वर्षांची मेलिंडा जॅन्सेन व्हॅन वुरेनची बोटं अति धूम्रपानामुळे झडू लागली आहेत. तिला दुर्मिळ आणि विचित्र आजार (Rare Disease) झाला आहे. या आजारावर कोणताच इलाज नसल्याने मेलिंडा चिंतेत आहे. सुरुवातीच्या टप्प्यात मेलिंडा यांच्या बोटांचा रंग जांभळा होता तो आता काळा झाला. बोटाच्या वरील भाग सडून आता झडण्याच्या मार्गावर आहे. मिरर यूके च्या रिपोर्टनुसार मेलिंडाने सांगितलं, “मी वयाच्या 13 व्या वर्षापासून धूम्रपान करत होते. एका दिवसात मी 15 सिगारेट ओढत होते ऑक्टोबर 2021 मध्ये माझ्या हातात मला काहीसा बदल जाणवू लागला. सुरुवातीला माझ्या हाताला तापमानातील बदल सहन होत नव्हता आणि त्यानंतर तो प्रमाणापेक्षा अधिक मऊ होत गेला. मेलिंडाच्या हातांची बोटं काळी पडत असल्याने डॉक्टरांनी याबाबत तपासणी केली. बोटांमधला हा बदल केवळ धूम्रपानामुळेच आहे, असं तपासणीअंती दिसून आलं. हा समस्या खूप दुर्मिळ मानली जाते. यामध्ये लहान आणि मध्यम आकाराच्या रक्तवाहिन्यांमध्ये (Blood vessels) रक्ताची गुठळी तयार होऊ लागते आणि त्या फुगतात. हे वाचा - बॉडी बनवण्यासाठी घेतलं 3 लाखाचं इंजेक्शन; तरुणाच्या प्रायव्हेट पार्टची लागली वाट मेलिंडा म्हणाली, “मी आता माझ्या हातांचा वापर करु शकत नाही. मला जेवण तयार करणं, साफ-सफाई करणं, केस विंचरणं, अंघोळ करणं आदी कामं करणं अशक्य झालं आहे. हाताच्या वेदना मला अस्वस्थ करतात. मी पर्सनल असिस्टंट आणि एक प्रशिक्षित नेल टेक्निशियन आहे. मी नखांच्या सौंदर्याविषयक कामांसाठी ओळखली जात होते. पण तेही आता करु शकत नाही. गेल्या ऑक्टोबरपासून मला लिहितादेखील आलेले नाही. या आजारावर इलाज नाही हे मला माहीत आहे” “या महिलेला आजारापासून दिलासा देण्यासाठी आम्ही काहीही करू शकत नाही. यासाठी आम्हाला एक-एक बोट निखळून पडण्याची वाट पाहावी लागत आहे. पण बोटं आपोआप निखळून पडण्यासाठी आम्ही एका पद्धतीचा अवलंब केला आहे, असं डॉक्टर म्हणाले. हे वाचा - चालण्याचा व्यायाम करताना अनेकांकडून ही चूक होते; फायदा होण्याऐवजी नुकसानच अधिक “हा माझ्या आयुष्यातला एक आव्हानात्मक टप्पा आहे. या आजाराशी लढत, अश्रू आणि धैर्याच्या मदतीनं मी इथपर्यंत पोहोचले आहे. सिगारेट सोडतानाही मला अनेक अडचणींचा सामना करावा लागला”, असं मेलिंडाने सांगितलं. मेलिंडाचा या विचित्र आजाराशी संघर्ष सुरू असून, असा आजार अन्य कोणाला होऊ नये, यासाठी ती लोकांना धूम्रपान सोडण्याचा तसंच या व्यसनाच्या आहारी न जाण्याचा सल्ला देत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.