जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / बॉडी बनवण्यासाठी घेतलं 3 लाखांचं इंजेक्शन; तरुणाच्या Private part ची लागली वाट

बॉडी बनवण्यासाठी घेतलं 3 लाखांचं इंजेक्शन; तरुणाच्या Private part ची लागली वाट

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

बॉडी बनवण्यासाठी जिम ट्रेनरने तरुणाला एक इंजेक्शन दिलं आणि त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये समस्या उद्भवली.

  • -MIN READ
  • Last Updated :

भोपाळ, 16 मार्च : आपली फिल्मी हीरोसारखी जबरदस्त बॉडी असावी, डोलेशोले, सिक्स पॅक अॅब्ज असावेत असं बहुतेक पुरुषांना वाटतं. त्यासाठी काही पुरुष बरीच मेहनतही घेतात. जीममध्ये जाऊन एक्सरसाइझ करतात. पण सोबतच लवकरात लवकर बॉडीबिल्डर होण्यासाठी इतर उपायही करतात. असाच उपाय करणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं. त्याने बॉडी बनवण्यासाठी एक इंजेक्शन घेतलं आणि त्यानंतर त्याच्या प्रायव्हेट पार्टची वाट लागली (Injection for body stamina cause problem in private part). मध्य प्रदेशच्या (Madhya pradesh) इंदौरमधील हे धक्कादायक प्रकरण आहे. इथल्या एका तरुणाला जिम ट्रेनरने चांगली बॉडी बनवण्याचं आमिष देत एक इंजेक्शन दिलं. हे इंजेक्शन घेतल्यानंतर तरुणाच्या प्रायव्हेट पार्टमध्ये समस्या उद्भवू लागली. त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये संसर्ग झाला. तरुणाने जिम ट्रेनरविरोधात तक्रार दिली आहे. चंपाबाग सियागंज गावात राहणारा एजाज मजीद अनुप नगरमधील ‘वन लाइफ फिटनेस जिम’मध्ये तो एक्सरसाइझसाठी जायचा. तिथं जीम ट्रेनर सफीक उर्फ सोनू खान, रईस खान यांनी त्याला वजन वाढवण्याचं आणि चांगली बॉडी बनवण्याचं आमिष दिलं. त्याच्याकडून अडीच ते तीन लाख रुपये घेतले आणि त्याला इंजेक्शन दिलं. हे वाचा -  …तर कुणीही सहजपणे तुमच्या प्रेमात पडेल; तज्ज्ञांनी सांगितली सोपी जादुई ट्रिक रविवारी सोनू खानने त्याला इंजेक्शन दिलं त्यानंतर तो औषधाची बाटली बॅगेत ठेवत होता तेव्हा त्याच्या बॅगेतून एक कागद पडला. जो वाचताच एजाजला समजलं की त्याला प्रतिबंधित स्टेरॉईड औषधाचं इंजेक्शन देण्यात आलं. हे इंजेक्शन घेताच एजाजच्या प्रायव्हेट पार्टमध्ये इन्फेक्शन झालं आणि त्याला त्रास होऊ लागला. प्रायव्हेट पार्टमध्ये जळजळ होई लागली. काही तासांनंतर लघवी करताना तीव्र वेदना होऊ लागल्या. त्यानंतर एजाजने जिम ट्रेनविरोधात इंदौरच्या एमआयजी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. हे वाचा -  तुम्हाला माहीत आहे का? वयानुसार महिला आणि पुरुषांमध्ये Blood Pressure किती असावं झी न्यूज हिंदी ने मीडिया रिपोर्टचा हवाला देत दिलेल्या वृत्तानुसार  पोलिसांनी सांगितलं की, आरोपी एजाजला 2019 पासून बंदी असलेलं इंजेक्शन देत होते. त्याला आठवड्यातून दोन-तीन वेळा इंजेक्शन दिलं जात होतं. पोलिसांनी सोनू खान आणि रईस खानविरोधात गुन्हा दाखल केला आहे आणि प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.सोनू खानला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून हे इंजेक्शन जप्त करण्यात आलं आहे. त्याचा भाऊ रईस खान फरार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात