मराठी बातम्या /बातम्या /heatlh /Winter Tips : हिवाळ्यात तुम्ही सर्रास करत आहात ही चूक; किडनी कामातून गेलीच समजा

Winter Tips : हिवाळ्यात तुम्ही सर्रास करत आहात ही चूक; किडनी कामातून गेलीच समजा

बदलत्या जीवनशैलीसोबत आपल्या काही सवयीदेखील किडनीसाठी घातक ठरू शकतात. म्हणूनच किडनीचे आरोग्य राखण्यासाठी आपल्याला अगदी सध्या वाटणाऱ्या या चुकीच्या सवयी बदलालने अत्यंतर आवश्यक आहे.

बदलत्या जीवनशैलीसोबत आपल्या काही सवयीदेखील किडनीसाठी घातक ठरू शकतात. म्हणूनच किडनीचे आरोग्य राखण्यासाठी आपल्याला अगदी सध्या वाटणाऱ्या या चुकीच्या सवयी बदलालने अत्यंतर आवश्यक आहे.

बदलत्या जीवनशैलीसोबत आपल्या काही सवयीदेखील किडनीसाठी घातक ठरू शकतात. म्हणूनच किडनीचे आरोग्य राखण्यासाठी आपल्याला अगदी सध्या वाटणाऱ्या या चुकीच्या सवयी बदलालने अत्यंतर आवश्यक आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 14 नोव्हेंबर : बदललेल्या जीवनशैलीमुळे अनेक आजारांचा धोकाही वाढतोय. आता तर मधुमेह, रक्तदाब या आजारांचा उल्लेखही सामान्य झालाय. त्याचसोबत हल्ली किडनीच्या आजारांचे प्रमाणही वाढत आहे. बदलत्या जीवनशैलीसोबत आपल्या काही सवयीदेखील किडनीसाठी घातक ठरू शकतात. म्हणूनच किडनीचे आरोग्य राखण्यासाठी आपल्याला अगदी सध्या वाटणाऱ्या या चुकीच्या सवयी बदलालने अत्यंतर आवश्यक आहे.

किडनी हा एक असा अवयव आहे, ज्यामध्ये काही दोष असेल तर त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो. किडनी कार्य करत नसल्यामुळे हळूहळू सर्व अवयव तुमची साथ सोडू लागतात. जर एखाद्याला किडनीशी संबंधित कोणताही आजार असेल आणि तो 3 महिन्यांहून अधिक काळ जुना झाला असेल. असा आजार बरा करणे खूप अवघड होऊ शकते. म्हणून आधीच किडनीची काळजी घेणे आवश्यक आहे.

करीना कपूरलाही आहे ही वाईट सवय; या गोष्टी आरोग्यासाठी ठरू शकतात धोकादायक

किडनीसाठी या सवयी आहेत घातक

मिठाचा जास्त वापर : आपल्याला बऱ्याचदा चवीच्या नादात जास्त मीठ खाण्याची सवय असते. परंतु मिठाचा वापर मर्यादितच असावा. कारण यामुळे किडनीचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. तसेच जेवण तयार झाल्यानंतर त्यावरून मीठ घेऊन खाणेही सुरक्षित नाही.

धूम्रपान : नकळत लोकांना काही सवयी अशा लागतात, ज्या केवळ किडनीसाठीच नाही तर संपूर्ण आरोग्यासाठी हानिकारक असतात. त्यातीलच एक सवय म्हणजे धूम्रपान. धूम्रपानाचा किडनीवर खूप वाईट परिणाम होतो.

पाणी कमी पिणे : हल्ली लोक इतके व्यस्त झाले आहेत की, बऱ्याचदा पाणी पिण्यासाठीही त्यांना वेळ मिळत नाही. हिवाळ्यात तर तहान लागत नाही म्हणून पाणी पिणं होतंच नाही. परंतु हे अत्यंत चुकीचे आहे. कारण कमी पाणी प्यायल्याने लोकांना किडनीचे आजार होण्याची शक्यता असते.

पेनकिलर घेणे : हल्ली लोकांना औषधी खूप स्वस्त आणि सहज उपलब्ध झाल्यात. बर्यादा छोट्या छोट्या वेदनांवर कोणते औषध घ्यावे हे लोकांना पाठ झालेले असते. त्यामुळे ते सर्रास वेदनाशामक औषधांचा वापर करतात. परंतु अशाप्रकारे पेनकिलरचा जास्त वापर केल्यास मूत्रपिंडावर वाईट परिणाम होतो. लोक डॉक्टरांचा सल्ला न घेता पेनकिलर घेतात, ज्यामुळे किडनीवर नकळत परिणाम होत असतो.

'या' सहा सवयी व्यक्तिमत्त्वासाठी ठरू शकतात घातक

युरीन इन्फेक्शन : युरीन इन्फेक्शनचा त्रास कोणलाही होऊ शकतो. विशेषतः महिलांना वारंवार युरिन इन्फेक्शनच्या तक्रारी येत असतील तर त्यांना किडनी निकामी होण्याची शक्यता असते. म्हणून कोणताही आजार अंगावर न काढता, डॉक्टरांच्या सल्ला घेणे अवस्श्यक आहे.

(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:
top videos

    Tags: Health, Health Tips, Lifestyle, Winter