मुंबई, 2 नोव्हेंबर : हिवाळा आता सुरु झालाय. हिवाळयात मुळा खाण्याचे विशेष फायदे असतात. यामध्ये जीवनसत्त्वे ए, बी आणि सी, प्रोटिन्स, कॅल्शियम आणि लोह सारखी अनेक खनिजे असतात. मुळ्याचे वेगवेगळे पदार्थ तयार करून खाल्ले जातात. मुळ्याची भाजी, मुळा पराठा, मुळा करी, भुर्जी इत्यादी. मुळ्याचे विविध पदार्थ खायला चविष्ट असतात आणि पचनासाठीही खूप चांगले असतात. मुळ्यामध्ये अनेक अँटी-ऑक्सिडेंट असतात, त्याचा आरोग्याला फायदा होतो. यासोबतच या भाजीमध्ये व्हिटॅमिन सी देखील असते. त्यामुळे आरोग्याला आजारांपासून वाचवण्यासाठी आणि आपली प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी फायदेशीर आहे. मात्र पांढरा मुळा हा पौष्टिक असला तरी यासोबत काही पदार्थ आणि पेये टाळली पाहिजेत. तसे न केल्यास शरीराला फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते.
थंडीच्या हंगामात मुळा खायला विसरू नका, आरोग्याला मिळतात हे सर्व पोषक घटकदूध : मुळा खाल्ल्यानंतर दूध प्यायल्याने पचनक्रिया बिघडते. कारण मुळा शरीराला गरम करतो. त्यामध्ये दूध मिसळल्याने छातीत जळजळ, ऍसिड रिफ्लक्स आणि पोटदुखी होऊ शकते. त्यामुळे या दोन पदार्थांमध्ये काही तासांचे अंतर ठेवणे चांगले.
काकडी : बरेच लोक मुळा आणि काकडी एकत्र खातात. हे दोन्ही पदार्थ खाणे चांगले आहे यात शंका नाही. पण त्यामुळे शरीराचे गंभीर नुकसान होऊ शकते. काकडीमध्ये एस्कॉर्बेट असते, जे व्हिटॅमिन सी शोषण्यास मदत करते. त्यामुळे काकडी आणि मुळा एकत्र खाऊ नये. संत्री : मुळ्यासोबत संत्री खाल्ल्यानेही गंभीर नुकसान होऊ शकते. या दोघांच्या मिश्रणाचा शरीरावर विषारी परिणाम होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यामुळे पोट खराब होऊ शकते आणि इतर आरोग्य समस्या देखील होऊ शकतात. कारले : मुळा आणि कारले एकत्र कधीही खाऊ नयेत. हे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. या दोन्हीमधील नैसर्गिक घटक आरोग्यावर एकत्र आल्यास शरीरावर विपरीत परिणाम करू शकतात. मुळा आणि कारले एकत्र केल्याने श्वासोच्छवासाचा त्रास होतो, अगदी हृदयासाठी ते घातक आहे. चहा : चहा आणि मुळा धोकादायक आहेत, कारण ते एकनानंतर एक लगेच खाल्यास बद्धकोष्ठता आणि ऍसिडिटी होऊ शकते. मुळा नैसर्गिकरित्या थंड आहे. आणि चहा उष्ण. म्हणजेच दोघे एकमेकांच्या पूर्णपणे विरुद्ध आहेत. त्यामुळे चहा आणि मुळा एकत्र खाण्यास मनाई आहे. जास्त मुळा खाऊ नका : मुळ्याचे अनेक फायदे आहेत. पण मुळा जास्त खाल्ल्याने डिहायड्रेशनसारख्या आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. वारंवार लघवी होऊ शकते. त्यामुळे जास्त पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. कंबर स्लीम बनवायची असेल तर नाश्त्यात करा हे 5 बदल, लगेच फरक दिसू लागेल मुळा कोणी खाऊ नये : मुळा रक्तातील साखर कमी करतो. त्यामुळे जर तुम्हाला कमी रक्तदाबाची समस्या असेल त्यांनी मुळा खाऊ नये. जर एखाद्याला तरीही मुळा खूप आवडत असेल आणि खायचा असेल तर त्यांनी एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.