जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / थंडीच्या हंगामात मुळा खायला विसरू नका, आरोग्याला मिळतात हे सर्व पोषक घटक

थंडीच्या हंगामात मुळा खायला विसरू नका, आरोग्याला मिळतात हे सर्व पोषक घटक

थंडीच्या हंगामात मुळा खायला विसरू नका, आरोग्याला मिळतात हे सर्व पोषक घटक

Radish Benefits : मुळ्याचे विविध पदार्थ खायला चविष्ट असतात आणि पचनासाठीही खूप चांगले असतात. मुळ्यामध्ये अनेक अँटी-ऑक्सिडेंट असतात, त्याचा आरोग्याला फायदा होतो.

  • -MIN READ Kolhapur,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर : संपूर्ण भारतात हिवाळ्यात मुळा मोठ्या प्रमाणात वापरला जातो. मुळ्याचे वेगवेगळे पदार्थ तयार करून खाल्ले जातात. मुळ्याची भाजी, मुळा पराठा, मुळा करी, भुर्जी इत्यादी. मुळ्याचे विविध पदार्थ खायला चविष्ट असतात आणि पचनासाठीही खूप चांगले असतात. मुळ्यामध्ये अनेक अँटी-ऑक्सिडेंट असतात, त्याचा आरोग्याला फायदा होतो. यासोबतच या भाजीमध्ये व्हिटॅमिन सी देखील असते. त्यामुळे आरोग्याला आजारांपासून वाचवण्यासाठी आणि आपली प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी फायदेशीर आहे. पेशी रिकव्ह होण्यासाठी मुळा खाल्ल्याने फायदा होतो. जाणून घेऊया मुळ्याचे आरोग्यदायी फायदे. मधुमेहाचा धोका कमी होतो: WebMD च्या माहितीनुसार, जर कोणाला शुगरचा त्रास असेल किंवा प्री-डायबेटिक स्टेजमध्ये असाल, तर मुळा खाणे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. मुळ्यामध्ये रक्तातील साखर नियंत्रित करणारे घटक आहेत. यकृताच्या कार्यासाठी उत्तम: मुळ्यामध्ये संयुगे असतात जे यकृत डिटॉक्स करण्यास मदत करतात. हे किडनीला विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास देखील मदत करते.

News18लोकमत
News18लोकमत

हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर: मुळ्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स तसेच कॅल्शियम आणि पोटॅशियम सारखे पौष्टिक घटक असतात, जे उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी आणि हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी उपयुक्त मानले जातात. अशाप्रकारे मुळा हृदयाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. हे वाचा -  कंबर स्लीम बनवायची असेल तर नाश्त्यात करा हे 5 बदल, लगेच फरक दिसू लागेल रक्त प्रवाह सुधारण्यास उपयुक्त: मुळ्यामध्ये असे अनेक पौष्टिक घटक असतात जे शरीरातील रक्त प्रवाह पूर्वीपेक्षा सुधारण्यास मदत करतात. हे सर्व फायदे मिळवण्यासाठी मुळ्याचे सेवन हिवाळ्यात जरूर करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात