जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / तयार राहा! कोरोनानंतर आणखी एका महासाथीचं संकट, WHO चा Alert; 'हा' आहे बचावाचा उपाय

तयार राहा! कोरोनानंतर आणखी एका महासाथीचं संकट, WHO चा Alert; 'हा' आहे बचावाचा उपाय

who

who

सस्तन प्राण्यांमध्ये हा आजार दिसून आल्याने आता माणसांमध्ये पसरण्याचीही भीती व्यक्त केली जाते आहे.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

मुंबई, 12 फेब्रुवारी : कोरोनाच्या महासाथीतून आता कुठे मोकळा श्वास मिळतो आहे. त्यात आता आणखी एका महासाथीचं संकट आहे. जागतिक आरोग्य संघटनेनंच या महासाथीबाबत अलर्ट केलं आहे आणि त्यासाठी तयार राहण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता नवीन भीती, चिंता निर्माण झाली आहे. तसं या आजारापासून बचाव करणं शक्य आहे, ते कसं आणि हा आजार नेमका काय आहे ते पाहुयात. WHO ने ज्या आजाराबाबत इशारा दिला आहे, तो आजार दुसरा तिसरा कोणता नाही तर बर्ड फ्ल्लू आहे. सस्तन प्राण्यांमध्ये बर्ड फ्लू दिसून आल्याने माणसांनाही या आजाराचा धोका निर्माण झाला आहे आणि माणसांमध्ये हा आजार पसरला तर जगाला कोरोनासारख्या आणखी एका महासाथीचा सामना करावा लागू शकतो, असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. बर्ड फ्लू किंवा एव्हीयन इन्फ्लूएंझा हा पक्ष्यांमधील एक रोग आहे जो इन्फ्लूएंझा विषाणूच्या अनेक प्रकारच्या संसर्गामुळे होतो. परंतु अलीकडे H5N1 या विषाणूच्या धोकादायक स्वरूपामुळे सस्तन प्राण्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. हे वाचा -  मेडिकल टेस्ट करताना एक चूक, व्यक्तीचा धक्कादायक मृत्यू; तुम्हीही असं करत नाहीत ना? डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस टेड्रोस अधानोम घेब्रेयसस यांनी सांगितलं की, गेल्या 25 वर्षांपासून H5N1 विषाणू पक्ष्यांना लक्ष्य करत आहे, परंतु आता तो पक्ष्यांमधून सस्तन प्राण्यांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे या विषयाचा सखोल अभ्यास करण्याची गरज आहे. सस्तन प्राण्यांमध्ये बर्ड फ्लू हे साथीच्या रोगाचे नवीन लक्षण आहे. ब्रिटनचे सल्लागार वैज्ञानिक प्रोफेसर इयान ब्राउन यांनी सांगितलं की, परिस्थिती गंभीर होत आहे. बर्ड फ्लू सस्तन प्राण्यांमध्ये झपाट्याने पसरत आहे. कोरोना नियंत्रणासाठी जे काही केलं ते नव्या साथीच्या आजारासाठी महत्त्वाचं ठरू शकतं. दरम्यान कोरोनानंतरही जगाने यातून धडा घेतला नाही, असं दोन शास्त्रज्ञ म्हणालेत. लॅन्सेट मायक्रोबमध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखात ते म्हणाले, कोविडने जगातील जागतिक पुरवठा आणि उत्पादन नेटवर्कच्या मोठ्या उणिवा उघड केल्या आहेत. यामुळे कोरोना महासाथीच्याकाळात बचावात्मक पावले उचलण्याच्या गरजेला मोठा धक्का बसला. त्यामुळे नवीन साथीची भीती लक्षात घेता त्यांनी सर्वंकष पाळत ठेवण्यावर भर द्यायला हवा. हे वाचा -  ऐन तारुण्यात असं काही घडलं की कायमची उडाली झोप; 80 वर्षांचे आजोबा गेली 60 वर्षे जागेच, तरी ठणठणीत बर्ड फ्लूचा माणसांना असलेला धोका लक्षात घेता काय काळजी घ्यायला हवी पाहूयात. कुठेही मृत पक्षी दिसला तर शक्यतो त्याला स्पर्श करू नका. पोल्ट्री फार्ममध्ये काम करणाऱ्यांनी तोंडावर मास्क आणि हातात हातमोजे वापरावेत. हात स्वच्छ ठेवण्यासाठी नेहमी साबण किंवा सॅनिटायझर वापरावा. पोल्ट्री फार्ममध्ये वापरलेले कपडे पूर्णपणे स्वच्छ करा. पक्ष्यांच्या संपर्कात आल्यानंतर एकदा चांगली आंघोळ करावी.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: health , lifestyle , who
  • First Published :
जाहिरात
जाहिरात