मुंबई, 11 ऑक्टोबर : कुणाचं उष्ट खाऊ नये, पिऊ नये असं लहानपणापासूनच आपल्याला शिकवलं जातं. कारण यामुळे आजारांचा धोका असतो. म्हणून आपण पाणी पितानाही ते वरूनच पितो जेणेकरून ते उष्ट होणार नाही. काही लोक घरात बाटली, ग्लासला तोंड लावून पाणी पितात पण जेव्हा ते चारचौघात असतात तेव्हा मात्र असं करत नाही. पण जसं उष्ट पाणी पिणं हानिकारक तसंच ते वरून पिणंही हानिकारकच आहे. पाणी पिण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींबद्दल आणि नियमांबद्दल अनेकदा बोलले जाते. त्यापैकीच एक म्हणजे वरून पाणी पिणे. पाणी उष्ट होऊ नये म्हणून आपण वरून पाणी पितो. मात्र ही सवय आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. BAMS डॉक्टर क्षितिजा बोधले यांनी याबद्दल माहिती दिली आहे. डॉ. क्षितिजा बोधले यांनी आपल्या यूट्युब चॅनेल वर दिलेल्या माहितीनुसार वरून किंवा पूर्ण तोंड उघडं ठेऊन पाणी प्यायल्याने पाण्याबरोबर हवासुद्धा तुमच्या पोटात जाते. यामुळे तुम्हाला पोट फुगणे, ब्लॉटिंग, ऍसिडिटी, पोटदुखी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. जर आपण व्यवस्थित ग्लासला किंवा बॉटलला तोंड लावून पाणी पिले तर आपल्या पोटात केवळ पाणीच जाईल. आपल्या तोंडातील लाळ पाण्यामध्ये मिसळेल आणि त्यामुळे अन्नाचे पचन नीट होईल. म्हणूनच पाणी पिण्याची योग्य पद्धत फार महत्त्वाची आहे.
Coffee And Apple : कॉफी की सफरचंद; दिवसाची सुरुवात करण्यासाठी काय आहे फायदेशीर?पाणी पिण्यासंबंधित इतर नियम - आयुर्वेदानुसार खूप वेगाने किंवा एकदम ग्लासभर पाणी पिऊ नका. पाणी घोट घोट करत आणि हळू प्या. जेणेकरून ते तोंडातील लाळेसकट पोटात जाईल.
- जेवण्यापूर्वी किंवा नंतर जास्त पाणी पिऊ नका. त्यामुळे गॅस्ट्रिक वाढते. अन्न पचायला जड जाते. त्यामुळे जेवणाच्या अर्धा तास आधी तुम्ही पाणी पिऊ शकता. जेवण करण्यापूर्वी 10 मिनिटे पाणी पिऊ नका. जेवणानंतर 30 मिनिटे प्या. - जेवताना तहान लागल्यास 1-2 घोट पाणी प्या, त्यापेक्षा जास्त नाही आणि एक ग्लास पाणी एकत्र प्या. त्यामुळे आरोग्याच्या अधिक समस्या निर्माण होतात. - अन्न चांगले पचण्यासाठी कोमट पाणी पिण्याची सवय लावावी. एक ग्लास थंड पाण्यापेक्षा गरम पाणी जास्त हायड्रेटिंग आणि आरोग्यदायी आहे. - पोषक तत्वांचे शोषण करण्यासाठी अन्नाचे योग्य पचन आवश्यक आहे. जेवणादरम्यान पाणी पचनाची आग शांत करते. जेवण करताना नियमित पाणी प्यायल्यानेही वजन वाढते. दररोज सकाळी चहाबरोबर ब्रेड खाताय? आताच थांबवा, कारण… - जेव्हा तुम्ही उभे राहून पाणी पिता तेव्हा ते थेट गशरच्या सहाय्याने सिस्टीममधून जाते. ते तुमच्या शरीरातून सहज जाते आणि कोलनपर्यंत पोहोचते. हळूहळू प्यायल्याने द्रव शरीराच्या सर्व भागांमध्ये पोहोचू शकतो.