मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

दररोज सकाळी चहाबरोबर ब्रेड खाताय? आताच थांबवा, कारण...

दररोज सकाळी चहाबरोबर ब्रेड खाताय? आताच थांबवा, कारण...


अनेक कुटुंबांत दिवसाची सुरूवातच चहा-ब्रेडपासून होते. नाश्ता म्हणून याला अधिक प्राधान्य दिलं जातं. पण

अनेक कुटुंबांत दिवसाची सुरूवातच चहा-ब्रेडपासून होते. नाश्ता म्हणून याला अधिक प्राधान्य दिलं जातं. पण

अनेक कुटुंबांत दिवसाची सुरूवातच चहा-ब्रेडपासून होते. नाश्ता म्हणून याला अधिक प्राधान्य दिलं जातं. पण

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

निरोगी जीवनासाठी संतुलित आहार आणि व्यायाम फार महत्त्वाचा आहे. दिवभरात कुठला आहार कधी घ्यावा या विषयीचे ठोकताळेही ठरलेले आहेत. पण याकडे दुर्लक्ष करत बहुतांशवेळा कुटुंबात पूर्वापार चालत आलेल्या पद्धतीनुसार आपण आहार घेत असतो. बऱ्याचदा याचा आरोग्यावर परिणाम होत असला तरी याचा फारसा विचार केला जात नाही. उदा. आजही अनेकांना सकाळी चहासोबत ब्रेड, बिस्किट, नमकीन आदी खाण्याची सवय असते. परंतु, चहासोबत ब्रेड खाण्यानं अनेक गंभीर आजारांना निमंत्रण दिलं जातंय.

अनेक कुटुंबांत दिवसाची सुरूवातच चहा-ब्रेडपासून होते. नाश्ता म्हणून याला अधिक प्राधान्य दिलं जातं. पण यामुळे शरीरावर होणारे परिणामही लक्षात घेणं गरजेचं आहे. सातत्यानं चहासोबत ब्रेड खाण्यानं वजन वाढण्याचा धोका असतो. कारण मैद्यापासून ब्रेड तयार करतात. शिवाय ब्रेड तयार करताना शरीराला अपाय पोहोचवणाऱ्या केमिकलचा वापर यात होत असतो. या केमिकलना पचवणंही मुश्किल असतं. पोटदुखीसह इतर आजार होण्याची शक्यता अधिक बळावते. वजन वाढवण्यासाठी या बाबी कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे चहाबरोबर ब्रेड खाण्याची तुम्हाला सवय असेल तर यात तत्काळ बदल करायला हवा.

उच्च रक्तदाबाची समस्या उदभवू शकते

दररोज चहा-ब्रेड खाल्ल्यानं उच्च रक्तदाबाची म्हणजेच हाय ब्लड प्रेशरची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे आधीच ब्लड प्रेशर असणाऱ्यांनी चुकूनही चहा-ब्रेड खाण्याची सवय लावून घेऊ नये. याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात.

अॅसिडीटी वाढून आतड्यांना होऊ शकते इजा

दररोज सकाळी चहा-ब्रेड खाण्याची सवय असेल तर पोटांचे विकार होण्याची शक्यता अधिक असते. आतड्यांना याचा अधिक त्रास होऊ शकतो. चहा पिण्याचं प्रमाण अधिक असेल तर अॅसिडिटीची समस्या वाढू शकते. त्यात सोबत ब्रेड खात असाल तर स्थिती आणखी बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ब्लड शूगर वाढवण्यासाठी कारणीभूत

डायबेटिसच्या रुग्णांसाठी चहा-ब्रेडचं सेवन करणं अधिक नुकसान करणारं ठरू शकतं. कारण दोन्ही गोष्टी एकत्रित खाल्ल्यानं रक्तातील साखरेची पातळी वाढते. त्यामुळे डायबेटिस असलेल्या रुग्णांची स्थिती आणखी बिघडू शकते. त्यामुळे डायबेटिसच्या रुग्णांनी चुकूनही चहा-ब्रेड खाऊ नये.

दरम्यान, दैनंदिन आयुष्यात आपल्या आहारात ज्या पदार्थांचा समावेश आहे त्याचा शरीरावर नेमका काय परिणाम होतोय याचा विचार केला जाणं आता महत्त्वाचं झालं आहे. नाश्ता तयार करण्यासाठी उशीर होतो म्हणून चहा-ब्रेडवर सकाळची भूक भागवणारे अनेक जण आहेत. पण मैद्यापासून बनलेल्या ब्रेडसारखा पदार्थ खाऊन आपलं आरोग्य बिघडणार असेल, तर ते न खाल्लेलं बरं. याउलट मटकी, पोहे अगदी एखाद्या चपातीचं सेवन केलं तरी उत्तम ठरू शकतं, असं आहारतज्ज्ञ सांगतात. तसंच चहा-चपाती हे पण खाता येऊ शकतं.

First published:

Tags: Marathi news