Home /News /heatlh /

Health News: Stress आणि anxiety मध्ये काय आहे फरक? जाणून घ्या कारणं आणि लक्षणं

Health News: Stress आणि anxiety मध्ये काय आहे फरक? जाणून घ्या कारणं आणि लक्षणं

प्रातिनिधिक फोटो (Photo : Shutterstock)

प्रातिनिधिक फोटो (Photo : Shutterstock)

प्रत्येक व्यक्तीमध्ये तणाव आणि अस्वस्थतेची कारणं वेगळी-वेगळी असतात. केवळ डॉक्टरच त्यातील फरक अचूकपणे ओळखू शकतात.

    नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर : आपल्यापैकी प्रत्येकजणाने कधीनाकधी स्ट्रेस (stress) आणि एन्झायटीचा (anxiety) त्रास अनुभवला असेल. बहुतेक लोकांना तर हेही माहीत नसतं की त्यांना मानसिक तणाव आला आहे की, चिंतेची समस्या जाणवत आहे. ताणतणाव आणि अस्वस्थता यांच्यात अतिशय थोडा फरक आहे. तणाव आणि अस्वस्थता या दोन्ही गंभीर मानसिक (mental) आणि शारीरिक (physical) समस्या आहेत. दोन्ही समस्यांमध्ये भावनिक गुंतागुंतीचा सामना करावा लागतो. तसं पाहिलं तर दोन्हींमध्ये विशेष फरक जाणवत नाही. केवळ डॉक्टरच त्यातील फरक अचूकपणे ओळखू शकतात. आपण केवळ काही बाह्य लक्षणांच्या आधारे अंदाज लावू शकतो की, एखादी व्यक्ती अस्वस्थतेचा सामना करत आहे की तणावाचा. वेगवेगळ्या लोकांमध्ये तणाव आणि अस्वस्थतेची लक्षणं भिन्न असतात. हेल्थ लाइननं दिलेल्या वृत्तानुसार तणाव आणि अस्वस्थतेची लक्षणं खालीलप्रमाणे आहेत. तणाव आणि अस्वस्थतेची लक्षणं पोटामध्ये दुखणं स्नायूंवर ताण येणं श्वासोच्छवासाची गती वाढणं हृदयाच्या ठोक्यांची गती वाढणं घाम येणं शरीराचा थरकाप उडणं चक्कर येणं वारंवार लघवीला येणं भूकेचं स्वरुप आणि वेळेत बदल होणं झोप न येणं अतिसार (डायरिया) होणं थकवा येणं वाचा : हा सोप्या ट्रिक्सचा करा वापर, अन् बघा कशी लागेल रात्री शांत झोप तणाव आणि अस्वस्थतेची कारणं प्रत्येक व्यक्तीमध्ये तणाव आणि अस्वस्थतेची कारणं वेगळी-वेगळी असतात. मात्र, वरकरणी पाहता प्रत्येकामध्ये काही सामान्य कारणही दिसतात. भविष्याबद्दल निराशेची भावना तयार होणं. खूप जास्त भीती वाटणं आणि त्याचं सावटाखाली जगणं लक्ष केंद्रित करण्यास अडचणी येणं चिडचिड होणं अस्वस्थ होऊन वागण्यात उथळपणा येणं वाचा : या वेळेला खाल तर घटेल वजन; स्लीम ट्रिम होण्याचा सोपा फंडा गंभीर प्रकरणात डिसऑर्डरची समस्या उद्भवण्याची शक्यता सामान्य कारणांव्यतिरिक्त, जेव्हा प्रकरण गंभीर होतं तेव्हा तणाव किंवा अस्वस्थतेशी संबंधित एखादा डिसऑर्डर होण्याची शक्यता असते. असे डिसऑर्डर (Disorder) असलेले रुग्ण अनावश्यक काळजीत अडकतात आणि इतरांसमोर जाण्यासही घाबरतात. दुसऱ्यांशी संवाद साधताना त्यांना भीती वाटते. काहींना तर लिफ्टमध्ये जाण्यासही भाती वाटते. आपण एकदा लिफ्टमध्ये गेलो तर बाहेरच नाही येऊ शकत, असा त्यांचा समज होतो. काही प्रकरणांमध्ये विक्षिप्तपणाच्या मर्यादा वेगळ्याच उंचीवर जाऊन पोहचतात. अशा व्यक्ती वारंवार साफसफाई सुरू करतात. व्यवस्थित ठेवलेल्या गोष्टी पुन्हा-पुन्हा सेट करतात. याशिवाय कोणीतरी त्यांना मारून टाकेल, अशी भीती नेहमीच त्यांच्या मनात असते. डिसऑर्डर झालेल्या लोकांना भूतकाळातील गोष्टींची तीव्र आठवण येते आणि त्यानंतर ते आणखी निराश होतात. वाचा : ओव्याची पानं आरोग्यासाठी आहेत वरदान, या पद्धतीनं खाल्ल्यास मिळतील जबरदस्त फायदे शारीरिक कारणांमुळेही होऊ शकतो डिसऑर्डर काही शारीरीक कारणांमुळंही एन्झायटी डिसऑर्डर होऊ शकतो. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीला थायरॉईडची समस्या, दमा, डायबेटिस किंवा हृदयविकार असेल तर अशा व्यक्तीला एखादा डिसऑर्डर होऊ शकतो. डिप्रेशननं त्रस्त असलेले लोकही त्याला बळी पडू शकतात. याशिवाय एखाद्या गोष्टीचं व्यसन असणदेखील एक कारण ठरू शकतं. काही डिसऑर्डर व्यक्तिमत्त्वाशी (personality disorder) संबंधित असतात. अशा डिसऑर्डरमध्ये व्यक्तीचा असा समज होतो की, एखादी गोष्ट फक्त तीच पूर्ण करू शकते. इतर कुणीही ती गोष्ट पूर्ण करू शकत नाही.
    First published:

    Tags: Health, Health Tips, Stress

    पुढील बातम्या