मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Ajwain Leaves: ओव्याची पानं आरोग्यासाठी आहेत वरदान, या पद्धतीनं खाल्ल्यास मिळतील जबरदस्त फायदे

Ajwain Leaves: ओव्याची पानं आरोग्यासाठी आहेत वरदान, या पद्धतीनं खाल्ल्यास मिळतील जबरदस्त फायदे

ओव्याच्या पानांमध्ये (Ajwain Leaves) बॅक्टेरियाविरोधी आणि बुरशीविरोधी गुणधर्म असतात. यामध्ये प्रथिनं, स्निग्धांश, तंतुमय पदार्थ (फायबर), कर्बोदकं (कार्बोहायड्रेट्स) आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. तुळशीच्या पानांप्रमाणे तुम्ही ओव्याची पानंही कच्ची चघळू शकता

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर : ओव्याचा वापर अनेक खाद्यपदार्थांमध्ये केला जातो. पण ओवा खाण्याचे जेवढे फायदे आहेत, तेवढीच त्याची पानंही गुणकारी (Ajwain Leaves) असून अनेक आजारांपासून आपलं रक्षण करतात. ओव्याच्या पानांमध्ये (Ajwain Leaves) बॅक्टेरियाविरोधी आणि बुरशीविरोधी गुणधर्म असतात. यामध्ये प्रथिनं, स्निग्धांश, तंतुमय पदार्थ (फायबर), कर्बोदकं (कार्बोहायड्रेट्स) आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात.

तुळशीच्या पानांप्रमाणे तुम्ही ओव्याची पानंही कच्ची चघळू शकता किंवा चहा बनवून पिऊ शकता. ओव्याच्या पानांचा रस देखील तुम्हाला फायदेशीर ठरेल.

दुर्गंधी दूर करतात

तुम्ही श्वासाच्या दुर्गंधीमुळं त्रस्त असाल तर ओव्याच्या पानांचं सेवन केल्यानं तुमची समस्या दूर होईल. ओव्याची पानं माऊथ फ्रेशनर म्हणून काम करतात. ओव्याची २ ते ३ पानं रोज खावीत. यामुळे हिरड्या मजबूत होतील आणि ही पानं श्वासाची दुर्गंधी निर्माण करणारे हानिकारक बॅक्टेरियादेखील काढून टाकतील.

सर्दी आणि फ्लू पासून आराम

हिवाळ्यातील थंडीच्या समस्येतही ओव्याच्या पानांचं सेवन केल्यानं फायदा होईल. तुम्हाला सर्दीची समस्या असेल तर त्याच्या पानांपासून बनवलेला काढा प्या. त्यामुळं ऋतूबदलामुळं होणारे आजार बरे होण्यास मदत होते. ओव्याच्या पानांचा काढा बनवण्यासाठी 10 ते 12 पानं नीट धुवा आणि 1 ग्लास पाण्यात उकळा. पाणी तीन चतुर्थांश राहिले की गाळून घ्या. थंड होऊ द्या आणि त्यात मध घालून प्या. याशिवाय ओव्याच्या पानांचा रस काढून तोही मधासोबत खाता येतो. यामुळं सर्दी आणि खोकल्यामध्ये आराम मिळेल.

हे वाचा - Fruit with Meals: आयुर्वेदानुसार जेवणासोबत फळे का खायची नसतात, जाणून घ्या त्याचे कारण

पोटदुखी दूर होईल

पोटदुखीच्या समस्येतही ओव्याच्या पानांचं सेवन केल्यानं फायदा होईल. पोटदुखी आणि गॅसची समस्या असल्यास ओव्याची पानं चावून खावीत. याच्यामुळं भूक वाढण्यास मदत होते.

संधिवाताच्या समस्येत उपयुक्त

सांधेदुखीच्या रुग्णांसाठीही ओव्याच्या पानांचं सेवन फायदेशीर मानलं जातं. हिवाळ्यात याचं सेवन केल्यानं तुम्हाला अनेक फायदे मिळतील. ओव्याच्या पानांमध्ये दाह-विरोधी गुणधर्म असतात. यामुळं वेदना आणि सूज दूर होते. सांधेदुखीच्या समस्येत ओव्याची पानं बारीक करून प्रभावित भागावर लावा.

हे वाचा - Weight loss tips in budget : वजन कमी करण्याचा केलाय पक्का प्लॅन; मग या ‘लो बजेट’ गोष्टी येतील कामी

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते

ओव्याच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटीव्हायरल गुणधर्म असतात. यामुळं रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होईल. ओव्याच्या पानांमध्ये असलेलं थायमॉल धोकादायक जंतू आणि संक्रमण दूर ठेवतं. ओव्याची पानं चघळून, चावून किंवा पाण्यात उकळून खाल्ल्यामुळं रोगप्रतिकारशक्ती वाढेल.

(सूचना: या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:
top videos

    Tags: Food, Health, Health Tips, Lifestyle