मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /हा सोप्या ट्रिक्सचा करा वापर, अन् बघा कशी लागेल रात्री शांत झोप

हा सोप्या ट्रिक्सचा करा वापर, अन् बघा कशी लागेल रात्री शांत झोप

 चांगल्या आरोग्यासाठी (Health) जसा चांगला आहार (Diet) घेणं गरजेचं आहे तसंच रात्रीची चांगली झोपही गरजेची असते. या टिप्समुळे तुम्हाला चांगली झोप घेण्यासाठी होईल मदत.

चांगल्या आरोग्यासाठी (Health) जसा चांगला आहार (Diet) घेणं गरजेचं आहे तसंच रात्रीची चांगली झोपही गरजेची असते. या टिप्समुळे तुम्हाला चांगली झोप घेण्यासाठी होईल मदत.

चांगल्या आरोग्यासाठी (Health) जसा चांगला आहार (Diet) घेणं गरजेचं आहे तसंच रात्रीची चांगली झोपही गरजेची असते. या टिप्समुळे तुम्हाला चांगली झोप घेण्यासाठी होईल मदत.

नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर:  चांगल्या आरोग्यासाठी (Health) जसा चांगला आहार (Diet) घेणं गरजेचं आहे तसंच रात्रीची चांगली झोपही गरजेची असते. रात्री चांगली झोप झाली नाही तर मेंदूचं कार्य, शरीरातील हॉर्मोन्स आणि एकूणात माणसाच्या काम करण्याच्या क्षमतेवर विपरित परिणाम होतो असं अनेक संशोधनांतून (research) सिद्ध झालं आहे. चांगली झोप लागत नसेल तर स्थूलपणाही वाढतो त्यामुळे अनेक आजार होऊ शकतात. जर तुम्हाला रात्री छान, गाढ झोप लागली तर तुम्ही दिवसभरात अनावश्यक आहार घेणार नाही त्यामुळे तुमचं आरोग्यही चांगलं राहील. गेल्या काही दशकांपासून माणसाच्या झोपेच्या दर्जेदार झोपेच्या तासांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. जगभरात अनेकांना निद्रानाशाचा त्रास होतो आहे. तुम्हीही जर या त्रासाने ग्रस्त असाल तर आम्ही आज तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला चांगली झोप येऊ शकते.

हेल्थलाईनने दिलेल्या बातमीनुसार पुरेशी झोप होण्यासाठी विज्ञानाधारित काही उपाय करता येऊ शकतात. ज्यामुळे झोपेचा दर्जा आणि काळ या दोन्हीमध्ये सुधारणा होऊ शकते. इथे काही उपाय सांगितले आहेत ते तुम्हीही करून पाहू शकता.

हेही वाचा-  नवऱ्यांनो Wife's birthday नीट लक्षात ठेवा; चुकूनही विसरलात तर खावी लागेल जेलची हवा

 दिवसा पुरेशा उजेडात रहा

निसर्गाने तुमच्या शरीराला नैसर्गिक वेळापत्रक ठरवून दिलेलं असतं. त्यानुसार वेळ झाली की तुमचं शरीराचं जे नैसर्गिक घड्याळ आहे ते तुम्हाला सूचना देतं की आता झोपायला हवं किंवा आता उठायला हवं. दिवसभर प्रखर सूर्यप्रकाशात राहिलं तर शरीरातील घड्याळ संतुलित (Balanced Body Clock) राहतं. त्यामुळे या घड्याळाचा रिदम चांगला राहतो. सूर्यप्रकाशामुळे शरीरातील उर्जा वाढते. दिवसभर तुम्ही सूर्यप्रकाशात राहिलात तर रात्री शांत झोप येऊ शकते.

संध्याकाळी निळ्या प्रकाशात राहणं टाळा

रात्री मात्र प्रकाशाच्या संपर्कात राहण्याचा उलटा परिणाम होऊ शकतो. आपल्या शरीरातलं घड्याळ सूर्यप्रकाशाला संतुलित करू शकतं पण रात्रीच्या निळ्या प्रकाशाचं संतुलन करू शकत नाही. या प्रकाशामुळे शरीरात होणाऱ्या जैविक प्रक्रियांची लय बिघडते. त्यामुळे आपल्याला रात्री उशिरा झोप लागते. त्यामुळेच झोपेचं गणित बिघडतं. रात्री लाइटच्या एक्सपोजरमुळे मेलॅटोनिन हॉर्मोनचा (melatonin Harmon) स्राव कमी होतो. या हॉर्मोनमुळेच गाढ झोप लागते.

हेही वाचा-  ही मॉडेल भरते श्रीमंतांच्या पार्टीत रंग, लाखो रुपये घेऊन बनते ‘खास पाहुणी’

 स्मार्टफोन, कम्प्युटर स्क्रीनसमोर सतत काम केल्याने झोपेचं वाटोळं होतं.

आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर रात्री झोप चांगली लागावी असं तुम्हाला वाटत असेल तर संध्याकाळी कॅफिनचं सेवन टाळा. कॅफिनमुळे शरीरातील कार्यप्रक्रियेला चालना मिळते. जर आपण संध्याकाळी कॅफिन घेतलं तर ते 6 ते 8 तास सक्रिय राहतं त्यामुळे झोप लागत नाही. त्यामुळे संध्याकाळी किंवा झोपेच्या वेळेपूर्वी कॉफी पिऊ नये (Don’t Drink Coffee) कारण कॉफीमध्ये कॅफिन असतं.

जर रात्री शांत आणि गाढ झोप हवी असेल तर दिवसा झोपू नका. जर तुम्ही दिवसा झोपलात तर शरीराचं जे घड्याळ आहे ते गोंधळात पडतं. त्यामुळे त्या घड्याळाचं संतुलन बिघडतं आणि त्याला रात्री झोप येण्याची सवय मोडली जाते. त्यामुळे चांगल्या झोपेसाठी शरीराचं घड्याळ संतुलित ठेवणं प्रचंड गरजेचं आहे.

First published:

Tags: Health, Health Tips, Lifestyle