जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / Pomegranate Peels: डाळिंबाची सालही आहे बहुगुणी; इतक्या आरोग्य समस्यांवर उपयोगी

Pomegranate Peels: डाळिंबाची सालही आहे बहुगुणी; इतक्या आरोग्य समस्यांवर उपयोगी

डाळिंबाच्या सालीचे फायदे

डाळिंबाच्या सालीचे फायदे

डाळिंबापेक्षा डाळिंबाच्या सालीमध्ये जास्त प्रमाणात व्हिटॅमिन सी असते, ज्यामुळे शरीरातील जखमा भरून निघण्यास मदत होते. डाळिंबाची साल शरीराला डिटॉक्स करण्यासाठी देखील मदत करू शकते.

  • -MIN READ Lanja,Ratnagiri,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 02 सप्टेंबर : डाळिंब हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे, हे आपण सर्वजण आधीच जाणतो. भरपूर पोषक तत्वे असण्यासोबतच त्यात औषधी गुणधर्मही आहेत. पण, तुम्हाला कदाचित माहीत नसेल डाळिंबासोबतच डाळिंबाची पाने, सालीमध्ये देखील औषधी गुणधर्म असतात. त्याचा उपयोग केल्याने आपण निरोगी आणि हेल्दी जीवन जगू शकतो. डाळिंबापेक्षा डाळिंबाच्या सालीमध्ये जास्त प्रमाणात व्हिटॅमिन सी असते, ज्यामुळे शरीरातील जखमा भरून निघण्यास मदत होते. डाळिंबाची साल शरीराला डिटॉक्स करण्यासाठी देखील मदत करू शकते. आपल्या शरीराला अनेक गंभीर आजारांपासून वाचवण्यासोबतच त्वचा आणि केसांसाठीही साल फायदेशीर आहे. डाळिंबाच्या सालींमधूनही अनेक आरोग्यदायी फायदे मिळू शकतात, त्याविषयी जाणून (Benefits of pomegranate peels) घेऊया. व्हिटॅमिन सीचा स्रोत - स्टाइलक्रेस च्या माहितीनुसार, डाळिंबापेक्षा डाळिंबाच्या सालीमध्ये जास्त व्हिटॅमिन सी आढळते. शरीरातील जखमा भरून येण्यास त्यामुळे मदत होते आणि लोहाची कमतरता भरून निघते. यामुळे हाडे मजबूत होतात आणि संसर्ग टाळतात. शरीर डिटॉक्सिफाय करते - डाळिंबाच्या सालीमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात जे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकतात. ते तुमच्या शरीराला डिटॉक्सिफाय करते आणि ते निरोगी बनवते. हृदयविकार कमी करते - यामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात जे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात. याशिवाय अँटिऑक्सिडंट्स शरीरातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करतात, विषारी पदार्थ काढून टाकतात, ज्यामुळे हृदयाच्या समस्यांचा धोका टाळता येतो. हे वाचा -  लिव्हर दान केल्याने डॉक्टरने जे करू नको सांगितलं, त्यातच पठ्ठ्याने रेकॉर्ड केला खोकला आणि घसा खवखवणे - खोकला आणि घसा खवखवणे अनेकदा संसर्गामुळे होते. डाळिंबाच्या सालीमध्ये प्रतिजैविक गुणधर्म असतात जे तुमच्या शरीराला संसर्ग निर्माण करणाऱ्या बॅक्टेरियाशी लढण्यास मदत करतात. हे वाचा -  भाग्य आणि धनाचे प्रतिक असतं क्रिस्टल कमळ; आर्थिक तंगी होऊ नये म्हणून घरी ठेवतात त्वचेसाठी उपयुक्त - डाळिंबाच्या सालीमध्ये अनेक गुणधर्म आढळतात जे मुरुम, सुरकुत्या आणि पुरळ दूर करण्यास मदत करतात. त्याच्या अँटिऑक्सिडेंट गुणधर्मांमुळे सुरकुत्या कमी करण्यास मदत होऊ शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात