जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Health Tips : या वेळात स्प्राउट्स खाणे त्रासदायक ठरू शकते, जाणून घ्या योग्य पद्धत

Health Tips : या वेळात स्प्राउट्स खाणे त्रासदायक ठरू शकते, जाणून घ्या योग्य पद्धत

Health Tips : या वेळात स्प्राउट्स खाणे त्रासदायक ठरू शकते, जाणून घ्या योग्य पद्धत

कच्च्या स्प्राउट्समध्ये हानिकारक जीवाणू असतात. त्यामुळे अन्नातून विषबाधा होण्याची शक्यता वाढते. स्प्राउट्स खाल्ल्यानंतर 12-72 तासांनंतर अतिसार, पोटदुखी आणि उलट्या यासारखी अन्न विषबाधाची लक्षणे बहुतेक लोकांना दिसतात.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 06 डिसेंबर : अंकुरलेल्या धान्यांचा (स्प्राउट्स) आहारात समावेश करावा असे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. मूग, काळे हरभरे आणि शेंगा यांसारख्या धान्यांपासून स्प्राउट्स तयार होतात. हे खाल्ल्याने पचन सुधारण्यास तसेच रक्तातील साखरेची पातळी सुधारण्यास आणि हृदयविकारापासून संरक्षण करण्यास मदत होते. अंकुरलेले धान्यांचा आहारात समावेश केल्याने अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन डीसह अनेक पोषक घटकांचे प्रमाण वाढते, त्यामुळे शरीराला डिटॉक्स करण्यास मदत होते आणि ते आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर देखील आहे. पण, अनेक वेळा स्प्राउट्स खाल्ल्याने अन्नातून विषबाधा (Food Poisoning) सारख्या समस्याही दिसून येतात. जाणून घेऊया स्प्राउट्स खाण्याची योग्य (Winter Diet) पद्धत. कच्चे स्प्राउट्स खाणे टाळा कच्च्या स्प्राउट्समध्ये हानिकारक जीवाणू असतात. त्यामुळे अन्नातून विषबाधा होण्याची शक्यता वाढते. स्प्राउट्स खाल्ल्यानंतर 12-72 तासांनंतर अतिसार, पोटदुखी आणि उलट्या यासारखी अन्न विषबाधाची लक्षणे बहुतेक लोकांना दिसतात. यामुळे मोठी समस्या निर्माण होत नाही, परंतु मुले, गर्भवती महिला आणि वृद्धांच्या बाबतीत गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. हे वाचा -  Mental Health : काही केल्या मनातून नकारात्मक विचार जात नाहीयेत; या 5 उपायांनी त्यांना पळवून लावा स्प्राउट्स खाण्याची योग्य पद्धत बरेच लोक कच्चे स्प्राउट्स आरामात खाऊ शकतात, काहींना कोणताही त्रास होत नाही. परंतु, खबरदारी म्हणून तुम्ही एका पॅनमध्ये स्प्राउट्स थोडे तेल घालून गरम करू शकता. बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी थोडा वेळ गरम करून घ्या. तसेच मिठाच्या पाण्यात 5-10 मिनिटे उकळले तरी हरकत नाही. अशा प्रकारे स्प्राउट्स शिजवल्याने तुमच्या पचनसंस्थेला फायदा होईल आणि तुमची पचनसंस्था पोषक तत्वांच्या शोषणासाठी आणखी चांगली होईल. जर तुमची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल आणि कच्चे स्प्राउट्स खाल्ल्याने तुम्हाला कधीही त्रास झाला नसेल तर तुम्ही ते कच्चे खाऊ शकता. पण, जर तुम्हाला तुमच्या पोटाबाबत अनेकदा काळजी वाटत असेल, तर ते थोडे शिजवून खाणे चांगले. हे वाचा -  Tongue and health: जीभेवर दिसणारी ही लक्षणं वेळीच ओळखा; गंभीर आजारांचा धोका टळू शकेल तज्ज्ञांचे मत तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, शिजवलेल्या स्प्राउट्सच्या तुलनेत कच्चे स्प्राउट्स पचण्यास कठीण असतात. काही जणांचे शरीर बियाणे आणि शेंगांचे सर्व पोषक घटक त्यांच्या कच्च्या स्वरूपात शोषून घेऊ शकत नाही. त्यामुळे स्प्राउट्स थोडे शिजवून घेतल्यास त्यातील पोषकद्रव्ये शरीरात सहज शोषली जातात. (सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात