मराठी बातम्या /बातम्या /heatlh /Weight Gain: वजन वाढवणं अवघड काम नाही, आहारात नियमित या 5 गोष्टी घेऊन व्हा धष्टपुष्ट

Weight Gain: वजन वाढवणं अवघड काम नाही, आहारात नियमित या 5 गोष्टी घेऊन व्हा धष्टपुष्ट

अनेकजण वजन वाढवण्यासाठी जिममध्ये जातात आणि बाजारात उपलब्ध प्रोटीन सप्लीमेंट वापरतात. मात्र, ही कृत्रिम प्रथिने आपल्या यकृत, मूत्रपिंड आणि शरीराच्या अनेक भागांसाठी हानिकार आहेत.

अनेकजण वजन वाढवण्यासाठी जिममध्ये जातात आणि बाजारात उपलब्ध प्रोटीन सप्लीमेंट वापरतात. मात्र, ही कृत्रिम प्रथिने आपल्या यकृत, मूत्रपिंड आणि शरीराच्या अनेक भागांसाठी हानिकार आहेत.

अनेकजण वजन वाढवण्यासाठी जिममध्ये जातात आणि बाजारात उपलब्ध प्रोटीन सप्लीमेंट वापरतात. मात्र, ही कृत्रिम प्रथिने आपल्या यकृत, मूत्रपिंड आणि शरीराच्या अनेक भागांसाठी हानिकार आहेत.

नवी दिल्ली, 12 एप्रिल : अलिकडे अनेकजण वजन वाढवण्यासाठी जिममध्ये जातात आणि बाजारात उपलब्ध प्रोटीन सप्लीमेंट वापरतात. मात्र, ही कृत्रिम प्रथिने आपल्या यकृत, मूत्रपिंड आणि शरीराच्या अनेक भागांसाठी हानिकार आहेत. त्याशिवाय नैसर्गिक गोष्टींची मदत घेऊन त्यांचा आपल्या दैनंदिन आहारात समावेश केला तर त्याचा चांगला फायदा होतो. यामध्ये जास्त प्रथिने असतील आणि तुम्ही याचा वजन वाढवण्यासाठी सहज आणि कोणत्याही साईड इफेक्टशिवाय उपयोग करू शकता. पाहुयात अशा (Best Foods For Weight Gain Naturally) गोष्टींबाबत..

या गोष्टींचे सेवन केल्याने वजन वाढते

1. चण्यासोबत खजूर खाणे

हा एक साधा आणि अतिशय फायदेशीर निरोगी आहार आहे. त्याचे नियमित सेवन करून आपण स्वतःला निरोगी बनवू शकतो. वजन वाढवण्याच्या हेतूनं जर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी हरभरा आणि खजूर खाल्ले तर तुमचे वजन काही दिवसात वाढू लागेल.

2. अंडी

अंड्यांमध्ये प्रथिने आणि कॅलरीज जास्त असतात. वजन वाढवणे, शरीराची दुर्बलता घालवण्यासाठी हा आहार फायदेशीर आहे. 2 अंडी उकडून रोज खाल्ल्यास तुमचे वजन वाढू शकते. वजन वाढवण्यासाठी अंडी हा आहारातील उपयोगी घटक आहे.

3. दूध आणि केळी

केळीमध्ये भरपूर कॅलरीज असतात, ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. दुधात मिसळून खाल्ल्यावर ते प्रथिने पूरक म्हणून काम करताच. तुम्ही केळीचा शेक बनवून पिऊ शकता. याचा वजन वाढीसाठी फायदा होतो.

हे वाचा - साखरेचा चेहऱ्यासाठी असा कधी वापर केला नसेल; Skin care products फिके पडतील

4. मनुका

जर तुम्ही रोज मूठभर मनुके खाल्ले तर तुमचे वजन वाढू शकते. मनुका आणि अंजीर रात्रभर भिजवा आणि सकाळी खा, तुमचे वजन नक्कीच वाढेल.

हे वाचा - पोटाच्या अनेक विकारांवर जालीम आहे आल्याचा मुरंब्बा! जाणून घ्या सर्व फायदे

5. दूध आणि बदाम

तुम्ही रात्री 3 ते 4 बदाम पाण्यात भिजवा आणि दुसऱ्या दिवशी बदाम बारीक करून ते एक ग्लास दुधात मिसळून प्या. वजन वाढवण्यासाठी तुम्ही हे रोज करू शकता. त्याचा परिणाम तुम्हाला काही दिवसात दिसू लागेल.

(सूचना: या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची कोणतीही हमी देत नाही. हे उपाय लागू करण्यापूर्वी कृपया संबंधित तज्ञांशी संपर्क साधा.)

First published:

Tags: Lifestyle, Weight, Weight gain