मुंबई, 07 एप्रिल : चहामध्ये आलं घालून तुम्ही अनेकवेळा प्यायला असाल. पण, आल्याचा मुरंब्बा कधी खाल्ला आहे का? आल्याचा मुरंब्बा आरोग्यासाठीही खूप चांगला आहे. आलं खाल्ल्यानं सर्दी-खोकल्यात आराम मिळतो आणि शरीरातील सूजही कमी होते. त्याचबरोबर आलं आहारात घेतल्यानं सांधेदुखीही कमी होते. आल्याचा मुरंब्बा खाण्याचेही आरोग्याला खास फायदे आहेत. आल्याचा मुरंब्बा औषधी गुणांनी भरपूर असल्यानं याचे सेवन केल्याने अनेक आजार बरे होतात. आल्यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, लोह, व्हिटॅमिन सी, फॉलिक ऍसिड, मँगनीज, व्हिटॅमिन बी3 आणि कोलीन आढळतात, ते शरीर निरोगी ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. जाणून घेऊया आल्याचा मुरंब्बा खाण्याचे काय फायदे (Benefits Of Ginger Murabba) आहेत.
आल्याचा मुरंब्बा खाण्याचे फायदे
सर्दी-खोकल्यात आराम मिळेल
सर्दी-खोकला झाल्यास आल्याच्या चहा व्यतिरिक्त आल्याचा मुरंब्बाही आपण खाऊ शकतो. सर्दी-खोकल्यात शरीरासाठी खूप फायदेशीर मानला जातो. खरंतर आल्याचा गुणधर्म गरम असतो. त्यामुळे आल्याचा मुरंब्बा खाल्ल्यास सर्दी-खोकल्याची समस्या बर्याच प्रमाणात कमी होते.
बद्धकोष्ठतेचा त्रास
आल्याचा मुरंब्बा खाल्ल्याने बद्धकोष्ठता होत नाही. आलं पोटासाठी खूप फायदेशीर मानलं जातं. आल्याचा मुरंब्बा खाल्ल्यास बद्धकोष्ठतेसोबतच पोटात गॅस तयार होण्याची समस्याही होत नाही. तसेच पोटात सूज किंवा जडपणा जाणवत असेल तर ते देखील कमी होतं.
हे वाचा - उन्हाळ्यातही केस राहतील सॉफ्ट-शायनी; घरीच असा बनवा कोथिंबीर आणि मधाचा हेअर पॅक
मासिक पाळीच्या वेदनांमध्ये आराम मिळेल
ज्या महिलांना मासिक पाळी दरम्यान पोटदुखीची त्रास होतो, त्यांच्यासाठी आल्याचा मुरंबा खाणे खूप फायदेशीर ठरू शकते. वास्तविक, आल्याचा मुरंबा खाल्ल्याने मासिक पाळीच्या वेळी पोटदुखीपासून बऱ्याच अंशी आराम मिळतो.
कफ होत नाही
अनेकांना वर्षभर कफ येण्याचा त्रास होतो. आल्याचा मुरंब्बा खाल्ल्याने कफ कमी होतो. तसेच जर एखाद्याला घसादुखीचा त्रास असेल तर तोही आल्याचा मुरंबा खाल्ल्यानं कमी होतो.
हे वाचा - World Health Day 2022: दीर्घायुष्य निरोगी राहण्यासाठी आजपासूनच करा हे 7 संकल्प
दम्याच्या रुग्णांसाठी फायदेशीर
आल्याचा मुरंब्बा खाणे अस्थमाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. खरं तर, दम्याच्या रुग्णांच्या छातीत कफ येतो, त्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होतो. आल्याचा मुरंब्बा खात असाल तर त्यामुळे खूप आराम मिळतो.
(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips, Lifestyle