मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /तुम्ही साखरेचा चेहऱ्यासाठी असा कधी वापर केला नसेल; Skin care products फिके पडतील

तुम्ही साखरेचा चेहऱ्यासाठी असा कधी वापर केला नसेल; Skin care products फिके पडतील

साखर जास्त खाणे फायदेशीर नसले तरी, त्वचेवर मात्र साखर लावून तुम्हाला एक नव्हे तर अनेक फायदे मिळू शकतात. चेहऱ्याच्या त्वचेसाठी साखरेचा कसा उपयोग होतो (how to use sugar to make skin glowing and tan free) याबाबत आपण जाणून घेऊया.

नवी दिल्ली, 07 एप्रिल : आरोग्याच्या दृष्टीने अनेक लोक साखर (sugar) खाणे टाळतात. कारण आपल्या रोजच्या आहारात साखर कमी खाल्ली पाहिजे, याबाबत आता जनजागृती झाल्याचे दिसत आहे. साखर जास्त खाणे फायदेशीर नसले तरी, त्वचेवर मात्र साखर लावून तुम्हाला एक नव्हे तर अनेक फायदे मिळू शकतात. चेहऱ्याच्या त्वचेसाठी साखरेचा कसा उपयोग होतो (how to use sugar to make skin glowing and tan free) याबाबत आपण जाणून घेऊया.

दही-साखर

त्वचेला चमकदार बनवण्यासाठी दही आणि साखर खूप चांगली भूमिका बजावते. यासाठी दोन चमचे दही दोन चमचे साखर मिसळून चेहऱ्यावर लावा. दोन मिनिटे तसेच राहू दिल्यानंतर पुढे जवळपास पाच मिनिटे हलक्या हाताने चेहऱ्यावर मालिश करा आणि त्यानंतर ते पाण्याने धुवून टाका. यामुळे तुमची त्वचा एक्सफोलिएट होईल तसेच त्वचेतील चमक वाढण्यास मदत होईल.

कॉफी-साखर

चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स दूर करण्यासाठी, कॉफीमध्ये साखर मिसळा आणि त्यात खोबरेल तेलाचे काही थेंब घालून पेस्ट बनवा. आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावून, त्वचेला हलक्या हाताने पाच-सात मिनिटे लावून घ्या आणि नंतर धुवा. यामुळे तुम्ही ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्सपासून मुक्त व्हाल. तसेच, तुमची मृत त्वचा देखील सहजपणे उतरेल आणि त्वचा देखील मॉइस्चराइज होईल.

हे वाचा - देशात 60% अकाली मृत्यूंचं कारण बनू शकतो चुकीचा आहार; NIN कडून धक्कादायक माहिती

लिंबू-साखर

त्वचेचे डाग नाहीसे करण्यासाठी तुम्ही साखर आणि लिंबू यांचे मिश्रण वापरू शकता. यासाठी दोन चमचे साखरेमध्ये चार चमचे लिंबाचा रस मिसळा. नंतर तो चेहऱ्यावर लावा आणि साखर विरघळेपर्यंत हलक्या हाताने मसाज करा. यानंतर चेहरा पाण्याने धुवा. यामुळे तुमची त्वचा तजेलदार होईल आणि ती चमकही येईल.

हे वाचा - keep liver healthy: लिवर आयुष्यभर राहील चांगली, या गोष्टींचा करा आहारात समावेश

बीट-साखर

बीटरूट आणि साखर तुमच्या ओठांवरून मृत त्वचा काढून त्यांना गुलाबी आणि मऊ बनवण्यास मदत करू शकते. यासाठी एक चमचा साखर दोन चमचे बीटाच्या रसात मिसळा. मग ते तुमच्या ओठांवर पाच मिनिटे हळूहळू घासत राहा, नंतर पाण्याने स्वच्छ करा.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:
top videos

    Tags: Lifestyle, Skin care, Sugar