मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळं तरुणांच्या चेहऱ्यावर येतात पिंपल्स, ही आहेत इतर कारणे

या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळं तरुणांच्या चेहऱ्यावर येतात पिंपल्स, ही आहेत इतर कारणे

तरुण मुला-मुलींच्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात. या वयात बहुतेकांना ही समस्या असते. यासाठी काही गोष्टींची काळजी घेतल्यास या समस्येपासून सुटका होऊ शकते.

तरुण मुला-मुलींच्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात. या वयात बहुतेकांना ही समस्या असते. यासाठी काही गोष्टींची काळजी घेतल्यास या समस्येपासून सुटका होऊ शकते.

तरुण मुला-मुलींच्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात. या वयात बहुतेकांना ही समस्या असते. यासाठी काही गोष्टींची काळजी घेतल्यास या समस्येपासून सुटका होऊ शकते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Lanja, India
  • Published by:  News18 Desk

मुंबई, 07 ऑक्टोबर : प्रत्येकालाच आपल्या चेहऱ्याची स्कीन सुंदर-चमकदार असावी, असे वाटत (Skin Care Tips) असते. चेहऱ्यावर येणारे डाग, पिंपल्स आपली पर्सनॅलिटी बिघडवू शकतात. चेहरा आकर्षक आणि स्मार्ट दिसण्यासाठी सर्वच लोक वेगवेगळ्या प्रकारची ब्युटी प्रॉडक्ट्स वापरतात. तरुण मुला-मुलींच्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात. या वयात बहुतेकांना ही समस्या असते. यासाठी काही गोष्टींची काळजी घेतल्यास या समस्येपासून सुटका होऊ शकते. तज्ज्ञांकडून जाणून घेऊया या समस्येचे कारण आणि प्रतिबंध याविषयी महत्त्वाच्या (Main Factors Cause Acne) गोष्टी.

तज्ञ काय म्हणतात?

रिव्हाइव्ह क्लिनिक (फरीदाबाद) येथील त्वचारोगतज्ञ डॉ. संदीप बब्बर सांगतात की, तरुण मुला-मुलींच्या चेहऱ्यावर पिंपल्स येण्याची अनेक कारणे असतात. सर्वात मोठे कारण म्हणजे कौटुंबिक इतिहास. जर एखाद्या व्यक्तीच्या पालकांना पिंपल्सची समस्या असेल तर त्यांना या समस्येचा धोका जास्त असतो. चुकीच्या खाण्याच्या सवयी देखील या त्रासाचे कारण बनतात. जास्त ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ जसे की जंक फूड, जास्त तळलेल्या गोष्टी, मैद्यापासून बनवलेले पदार्थ आणि दुग्धजन्य पदार्थांचे जास्त सेवन यामुळेदेखील ही समस्या उद्भवू शकते. यौवनकाळात आपल्या शरीरात अनेक हार्मोन्स तयार होतात आणि त्यामुळे पिंपल्स बाहेर पडतात. अतिरिक्त धूळ, माती आणि प्रदूषण हे देखील त्वचेसाठी धोकादायक आहेत.

व्हिटॅमिन एची कमतरता -

डॉ.संदीप बब्बर यांच्या मते, 11-12 वर्षे ते 25 वर्षे वयोगटातील तरुणांमध्ये पिंपल्सची समस्या दिसून येते. अनेक वेळा ‘अ’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे चेहऱ्यावर पिंपल्स येतात. त्याच्या उपचारात व्हिटॅमिन ए डेरिव्हेटिव्ह देखील वापरले जातात. अनेक वेळा बद्धकोष्ठता आणि हार्मोनल असंतुलनामुळे ही समस्या स्त्री-पुरुषांमध्येही उद्भवते.

हे वाचा -सोशल मीडियावर भावनेच्या आहारी जाणं पडेल महागात, तरुणांनी घ्यायला हवी ‘ही’ काळजी

मुरुमे घालवण्यासाठी -

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, पिंपल्सच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही चांगल्या फेसवॉशचा वापर करावा. जास्त तेल असलेल्या वस्तू चेहऱ्यावर लावू नयेत. सकस आहार घ्यावा, जंकफूड पदार्थ खाणे टाळावे. झिंक आणि लिंबूवर्गीय फळे असलेले पदार्थ खाल्ल्याने पिंपल्सचा त्रास कमी होऊ शकतो. याशिवाय भरपूर पाणी प्या आणि व्यायाम करा. पोट स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा. समस्या अधिकच वाढल्यास त्वचारोगतज्ज्ञांशी संपर्क साधा आणि योग्य उपचार करा. पिंपल्सवर घरी उपचार करण्याचा प्रयत्न करू नका नाहीतर चेहऱ्यावर कायमचे डाग राहतील.

First published:

Tags: Skin, Skin care