जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / बाळाला तापाचं औषध (पॅरासिटामॉल) देण्यापूर्वी या 8 गोष्टी नीट समजून घ्या

बाळाला तापाचं औषध (पॅरासिटामॉल) देण्यापूर्वी या 8 गोष्टी नीट समजून घ्या

बाळाला तापाचं औषध (पॅरासिटामॉल) देण्यापूर्वी या 8 गोष्टी नीट समजून घ्या

तुमच्याही घरात मुलं असतील तर पॅरासिटामॉलच्या गोळ्या किंवा सिरप देण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणं खूप गरजेचं आहे.

  • -MIN READ Lanja,Ratnagiri,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर : बदलत्या ऋतूमध्ये लहान मुलांना ताप येणं ही सामान्य बाब आहे. तापामुळे मुलांना अस्वस्थ होतं आणि ते वारंवार रडायला लागतात. ताप असलेल्या मुलांमध्ये चिडचिड, थकवा, भूक न लागणे, आळस, उलट्या आणि निर्जलीकरण यांसारखी लक्षणे दिसतात. अशा स्थितीत शरीराचे तापमान 100 अंश फॅरेनहाइटपेक्षा जास्त होऊ लागले तर पॅरासिटामॉल औषधे देणे चांगले. तुमच्याही घरात मुलं असतील तर पॅरासिटामॉलच्या गोळ्या किंवा सिरप देण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणं खूप गरजेचं आहे. मुलांना ताप आल्यावर लगेच औषध देण्याची गरज नाही. काही वेळा औषधांशिवाय तापावर उपचार केल्याने त्यांची प्रतिकारशक्ती मजबूत होते. पॅरासिटामॉल म्हणजे काय? NHS च्या माहितीनुसार, पॅरासिटामॉल हे एक औषध आहे जे डोकेदुखी, पोटदुखी आणि ताप दूर करते. पॅरासिटामॉल हे एक सामान्य औषध आहे, परंतु मुलांमध्ये ताप कमी करण्यासाठी त्याचा अतिवापर करू नये. असे केल्याने मुलांच्या आरोग्यालाही हानी पोहोचू शकते. पॅरासिटामॉल देण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा - डॉक्टरांचा सल्ला : मुलाला पॅरासिटामॉल देण्यापूर्वी डॉक्टरांचा नक्की सल्ला घ्या. असे केल्याने तुम्ही बाळाला वजन आणि वयानुसार योग्य प्रमाणात औषध देऊ शकाल. योग्य प्रमाणात द्या: डोस देऊनही ताप लवकर उतरत नसेल, तर बरेच लोक पॅरासिटामॉल जास्त प्रमाणात देऊ लागतात, असं करणं चुकीचं आहे. तपमान तपासा: जर तुम्ही बाळाला तोंडावाटे औषध देत असाल तर त्यापूर्वी एकदा नक्कीच ताप तपासा. तापमान 100 डिग्री फॅरेनहाइटपेक्षा जास्त असेल तरच पॅरासिटामॉल द्या. ओव्हरडोज टाळा: जर मूल दोन औषधे एकत्र घेत असेल, तर तुम्ही औषधांबद्दल डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कधीकधी खोकल्याच्या औषधात पॅरासिटामॉलचा डोस देखील असतो. अशा परिस्थितीत, मुलाला पॅरासिटामॉल देण्याचे प्रमाण जास्त होऊ शकते.

News18लोकमत
News18लोकमत

वजनानुसार डोस: पॅरासिटामॉलचा डोस मुलाच्या वजनावर अवलंबून असतो. जर तुमच्या मुलाचे वजन 5 किंवा त्यापेक्षा कमी असेल, तर पॅकेजिंगवर दिलेल्या सूचनांनुसार किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषध द्या. अनावश्यक वापर टाळा: पॅरासिटामॉलचा वापर केवळ तापासाठीच नाही तर वेदनांवरही केला जातो. जर मुलाला ताप असेल पण अस्वस्थता वाटत नसेल तर पॅरासिटामॉल देऊ नका. हे वाचा -  दूधाची चहा पिताय? थांबा…. ती शरीरासाठी फायद्याची की तोट्याची? आधी वाचा किती वेळ द्यावा: पॅरासिटामॉल देऊन 3 दिवसांनंतरही ताप कमी होत नसेल तर ताबडतोब डॉक्टरांना भेटा. मुलाला कदाचित संसर्गजन्य रोग झाला असेल, ज्यावर लवकर उपचार करणे आवश्यक आहे. चार तासांचे अंतर आवश्यक : 24 तासांत 4 पेक्षा जास्त वेळा पॅरासिटामॉल देणे योग्य नाही. मुलांना दिवसातून फक्त 4 वेळा पॅरासिटामॉल देणे सुरक्षित आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात