मराठी बातम्या /बातम्या /heatlh /Side Effects Of Ghee : कितीही गुणकारी असलं तरी सर्वांसाठी चांगलं नाही तूप; या लोकांसाठी आहे हानीकारक

Side Effects Of Ghee : कितीही गुणकारी असलं तरी सर्वांसाठी चांगलं नाही तूप; या लोकांसाठी आहे हानीकारक

तुपाचे इतके फायदे असूनही काही जणांना तूप खाण्याचा त्रास होऊ शकतो.

तुपाचे इतके फायदे असूनही काही जणांना तूप खाण्याचा त्रास होऊ शकतो.

तुपाचे इतके फायदे असूनही काही जणांना तूप खाण्याचा त्रास होऊ शकतो.

    मुंबई, 23 जुलै : भारतीय आहारपद्धतीत तुपाला (Ghee) विशेष महत्त्व आहे. आरोग्यासाठी उपयुक्त असणाऱ्या तुपात घालून आयुर्वेदातील अनेक औषधं घेतली जातात. शिरा, खिचडी, पुरणपोळी, वरण-भात, पराठे अशा अनेक पदार्थांबरोबर भरपूर तूप खायला आवडणारी अनेक मंडळी असतात. इतकंच काय आमरस बाधू नये म्हणून त्यातही तूप घालून खाण्याची पद्धत आहे. तुपाचे इतके फायदे असूनही काही जणांना तूप खाण्याचा त्रास होऊ शकतो. तूप खाणं कोणासाठी हितकारक असतं व कोणाला त्याचा त्रास (Side Effects Of Ghee) होऊ शकतो, याबाबत एनडीटीव्ही इंडियानं एक वृत्त दिलं आहे.

    आयुर्वेदात तूप खाण्याबाबत काही नियम सांगितले आहेत. दररोज जेवणात योग्य प्रमाणात तूप खाणं गरजेचं असल्याचं यात म्हटलंय. तूप इतकं आरोग्यकारक असूनही सरसकट सर्वांसाठी तूप खाणं योग्य ठरत नाही. तूप पचनासाठी जड असतं. काही जणांना रेचक म्हणून तूप खायला सांगितलं जातं. मात्र ज्यांना अपचनाची (Digestion Problem) समस्या आहे, त्यांच्या शरीरावर तुपाचं सेवन विपरित परिणाम करतं. तुम्हाला अपचनाची आणि पोटाची जुनाट समस्या असेल, तर तुपाचं सेवन जास्त करू नका. गरोदरपणात पोट फुगणं, अपचन अशा समस्या महिलांना जाणवतात. त्या काळात सर्दी किंवा पोट खराब झालं, तर तूप खाण्यावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला जातो.

    हे वाचा - तूप तसं पौष्टिक, मात्र 'या' पदार्थांसोबत खाल्लं तर आजारापासून राहाल दूर!

    आयुर्वेदानुसार तूप कफ वाढवणारा पदार्थ आहे. त्यामुळे सर्दी, खोकल्यामुळे ताप आला असेल, तर तूप खाणं योग्य ठरत नाही. पावसाळ्यात लगेच घसा धरतो व सर्दी होते. अशावेळी काही काळासाठी तुपाचं सेवन कमी करावं. तसंच यकृत आणि प्लिहासंबंधी (Liver And Spleen Diseases) काही आजार असतील, तर आहारातून तूप पूर्णपणे वर्ज्य करण्याचा सल्ला दिला जातो.

    तुपामुळे चरबी वाढत नाही हे खरं असलं तरी तुपाचं अतिरेकी सेवन केल्यानं वजन वाढून लठ्ठपणाचा त्रास होऊ शकतो. ज्यांना हृदयाशी संबंधित आजार आहेत, त्यांनीही तूप खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जास्त तूप खाल्ल्यामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते. परिणामी, हृदयावर ताण येऊ शकतो. विकतच्या तुपापेक्षा घरगुती तूप अधिक चांगलं असतं. मात्र तूप खाताना ते प्रमाणातच खाणं गरजेचं असतं.

    हे वाचा - Ghee Or Butter: लोणी की तूप? उत्तम आरोग्यासाठी कशाची करावी निवड?

    खरं तर तूप आहारात असावंच. त्यामुळे पचन नीट होतं. तूप त्वचेला उजाळा देण्यासाठी, मेंदूसाठी, स्मरणशक्तीसाठी, केसांच्या आरोग्यासाठी अगदी उत्तम असतं. तुपाला सुपरफूड म्हटलं गेलं आहे. कारण विविध पदार्थांसोबत याचं सेवन केलं असता, त्याचे चांगले परिणाम शरीरावर दिसले आहेत. मात्र काही अपवादात्मक परिस्थितीत तुपाचा शरीरावर वाईट परिणामही होऊ शकतो. अशा व्यक्तींनी आहारातील तुपाचा वापर कमी केल्यास ते आरोग्यदायी ठरेल.

    First published:

    Tags: Food, Ghee, Health, Lifestyle