नवी दिल्ली, 21 जुलै : आपला चेहरा (Face) हा आपली ओळख असतो. अंघोळ (Bath) न करता घराबाहेर जाण्याचा प्रकार आपण करू शकतो, पण तोंड न धुता बाहेर पडण्याचा विचारही आपण करत नाही. अगदी घरातल्या घरातही आपण दिवसातून तीन-चार वेळा तरी आपला चेहरा नीट आहे का हे पाहतोच. इतरांकडे पाहतानाही आपण सर्वात आधी त्या व्यक्तीचा चेहराच पाहतो. बरेचदा समोरच्या व्यक्तीचा चेहरा पाहून आपल्याला त्या व्यक्तीचा मूड कसा आहे किंवा तब्येत कशी आहे याचा अंदाज येतो.
या सर्व गोष्टींसोबतच स्वतःच्या चेहऱ्यावरील काही गोष्टीही आपल्याला आपल्या तब्येतीबाबत बऱ्याच गोष्टी सांगू शकतात. (Face reveal symptoms) ‘आज तक’ने आपल्या चेहऱ्यावरील अशा बदलांशी संबंधित एक वृत्त दिलं आहे, ज्यांकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. यातील सर्वात पहिला, आणि स्पष्ट जाणवणारा बदल म्हणजे, चेहरा पिवळा पडणे (Yellow face symptom). चेहरा आणि डोळे पिवळे पडणे हे कावीळ रोगाचं प्रमुख लक्षण आहे. काविळसोबतच व्हायरल इन्फेक्शन, लिव्हर, गॉल ब्लॅडर, पॅनक्रिया डिसऑर्डर आणि लिव्हर सिरॉसिस या गोष्टींमुळेही चेहरा पिवळा पडू शकतो.
तुमच्या चेहऱ्यावरील केस गळणं हादेखील गंभीर प्रकार आहे. भुवया किंवा पापण्यांचे केस वारंवार गळत असतील, तर एलोपेसिया एरिटा हा आजार तुम्हाला असू शकतो. त्यामुळे असा प्रकार दिसून आल्यास डॉक्टरांशी संपर्क साधणं आवश्यक आहे. (Facial hair fall) चेहऱ्यावरील केस जाण्याच्या उलट, चेहऱ्यावर जर कुठेही केस येत असतील; तरीही काळजी घेणं आवश्यक आहे. पुरुषांमध्ये ही बाब इतकी गंभीर नसली, तरी महिलांमध्ये हे पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोमचं (PCOS) लक्षण असू शकतं.
खोकल्यावर उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये गेली आणि कित्येक वर्षांनी समोर आलं सत्य, हृदय डावीकडे नाही तर...
डोळे सुजलेले दिसले की आपण बऱ्याच वेळा ‘झोप झाली नसावी’ हा कयास बांधतो. डोळ्यांच्या सुजण्याचे हे कारण असले, तरी याव्यतिरिक्त हॉर्मोनल बदल, मिठाचं अतिसेवन, उष्ण वातावरण, म्हातारपण, अलर्जी, मेकअपचा वापर किंवा डोळ्यात साबण जाणं अशा कित्येक गोष्टींमुळे डोळे सुजतात (Sore eyes). त्यामुळे अंदाज न बांधता, खरं कारण शोधून त्यावर उपाय करणं आवश्यक आहे. यासोबतच, पापण्या जड होणे याकडेही दुर्लक्ष करणं महागात पडू शकते. कारण असं होणं हा आय सॉकेटमध्ये समस्या असल्याचा संकेत आहे. अन्न गिळण्यास अडचण येणं, जास्त डोकं दुखणं किंवा एकाऐवजी दोन-दोन वस्तू दिसणं अशी लक्षणं आढळल्यास डॉक्टरांशी संपर्क साधणं आवश्यक आहे.
साधारणतः हिवाळ्यामध्ये ओठ कोरडे पडतात किंवा ओठ फुटतात मात्र केवळ हिवाळ्यामुळेच नाही, तर डीहायड्रेशनमुळे किंवा एखाद्या औषधाच्या दुष्परिणामामुळे किंवा अलर्जीमुळेही ओठ फुटण्याचे प्रकार घडू शकतात. पेट्रोलियम जेली, खोबऱ्याचं तेल किंवा बाम वापरुन तुम्ही ओठांना मॉइस्चराईझ करु शकता.
चुकूनही खरेदी करू नका माती न लागलेलं स्वच्छ आलं कारण...
चेहऱ्यावर पिंपल्स म्हणजेच बारीक फोड येणे ही सर्वांसाठीच मोठी समस्या असते. मात्र, कित्येक वेळा हे साधारण पिंपल्स नसतात, तर हर्पीस सिम्पलेक्स व्हायरसमुळे झालेल्या जखमाही असू शकतात. हा एक संसर्गजन्य आजार आहे. याचे विषाणू सामान्यतः निष्क्रिय राहतात. पण, तुम्ही आजारी असाल किंवा बराच ताण आला तर हे सक्रिय होतात आणि त्यामुळे चेहऱ्यावर जखमा झाल्याप्रमाणे पिंपल्स आणि चट्टे दिसून येतात. यासोबतच, कित्येक लोकांना चेहऱ्यावर हलके पांढरे चट्टे दिसून येतात. काही विशिष्ट औषधांच्या दुष्परिणामामुळे हे होते. तसेच, महिलांमध्ये प्रेगनन्सीदरम्यान असे चट्टे दिसून येतात.
संपूर्ण चेहऱ्यावर नाही, पण फक्त पापण्यांच्या कडेला छोटे पांढरे डाग किंवा गाठी दिसून येत असतील, तर वेळीच सावध होणं गरजेचं आहे. कारण हे हाय कोलेस्ट्रॉलचं लक्षण आहे. या गाठी दुखत नाहीत. हृदविकार होण्याचे वा असण्याचे संकेत हे डाग देतात. चेहऱ्यावर तीळ किंवा मस्स असणं ही साधारण बाब आहे. कित्येकांच्या चेहऱ्यावर जन्मापासूनच या गोष्टी असतात. पण, या तिळांचा किंवा मस्स्याचा आकार वा रंग बदलत असेल, किंवा मग याठिकाणी दुखत असेल; तर तुम्हाला त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. कारण, हे कर्करोगाचे एक लक्षण असू शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health