नवी दिल्ली, 21 ऑगस्ट : खराब जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे लोकांना लहान वयातच शुगरचा त्रास होत आहे. मधुमेह झाल्यानंतर शरीरातील रक्तातील साखरेची पातळी खूप वाढते. ती कमी करण्यासाठी लोक आधी मिठाई खाणे बंद करतात. अनेकजण फळे खाणेही सोडून देतात. फळे जीवनसत्त्वे, खनिजे आणि प्रथिने यांचा चांगला स्रोत आहेत. फळांचे सेवन पूर्णपणे बंद केल्यास शरीरातील अनेक पोषक तत्वांची कमतरता निर्माण होऊ शकते. त्यामुळे शुगरच्या रुग्णांनी ज्या फळांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त आहे, तीच फळे टाळावीत. काही फळे अशी आहेत, जी शुगर लेव्हल कमी करू शकतात, शिवाय त्यांच्यातील अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म साखरेच्या रुग्णांसाठी वरदान ठरू शकतात. मधुमेही रुग्ण बिनधास्त खाऊ शकतात अशा फळांबद्दल (Fruits For Sugar Patients) जाणून घेऊया. संत्री - एवरीडे हेल्थच्या माहितीनुसार संत्री मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहेत. हे एक सुपरफूड आहे. संत्र्यामध्ये भरपूर फायबर, व्हिटॅमिन सी, फोलेट आणि पोटॅशियम असते, जे साखरेची पातळी कमी करण्यास मदत करते. पीच - फायबर हे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. पीच हे असे एक फळ आहे, ज्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. 100 ग्रॅम पीचमध्ये 1.6 ग्रॅम फायबर असते. पीच हे पहाडी फळ आहे, जे विशिष्ट हंगामातच उपलब्ध असते. हे वाचा - डायबिटीजची लागण झाल्याचे कळल्याबरोबर आहारात करा असा बदल; वाढणार नाही शुगर नाशपाती (पिअर) Pear - नाशपाती हे मधुमेहींसाठी फायदेशीर फळ मानले जाते. यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते. नाशपातीमध्ये व्हिटॅमिन-के देखील असते. जे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. हे वाचा - ताण-तणाव, चिंता कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत ही 5 ड्रिंक्स; ट्राय करून बघा किवी - किवीमध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. एका किवीमध्ये 215 मिलीग्राम पोटॅशियम, 64 मिलीग्राम व्हिटॅमिन सी आणि 2 ग्रॅम फायबर असते. किवीमध्ये सुमारे 42 कॅलरीज आणि 10 ग्रॅम कार्बोहायड्रेट असतात. म्हणूनच याला पॉवरहाऊस फळ असेही म्हणतात. किवी हे असे फळ आहे जे वर्षभर उपलब्ध असते. किवीमध्ये अँटिऑक्सिडेंट असतात, जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.