सावधान! कोरोना बरा झाल्यानंतरही दिसत असतील ‘ही’ लक्षणं तर लगेच गाठा रुग्णालय; अन्यथा...

सावधान! कोरोना बरा झाल्यानंतरही दिसत असतील ‘ही’ लक्षणं तर लगेच गाठा रुग्णालय; अन्यथा...

पटना AIIMS रुग्णालयांमध्ये पोस्ट कोव्हिड (Post Covid) लक्षणांवर संशोधन केलं जातंय. रक्त पुरवठ्यावर परिणाम, मुंग्या येणे, डोकदुखी सारखे त्रास होत आहेत.

  • Share this:

दिल्ली, 28 जून : अजूनही कोरोनाचं (Corona) संकट संपलेलं नाही. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची (Third Wave of Corona) भीती सगळ्यांच्याच मनात आहे तर, कोरोनाची दुसरी लाट आत्ता कुठे ओसरत आहे.  त्यातच आता डेल्टा प्लस व्हेरियंटचा (Delta Plus Variant) उद्रेक होत आहे. या परिस्थितीत देशभरामध्ये आणखीन नवीन समस्या निर्माण झाली आहे. कोरोना मधून बऱ्या झालेल्या रुग्णांमध्ये नवीन आजार डोकं वर काढतं असल्यामुळे डॉक्टरांच्या समोर अडचणी वाढलेल्या आहेत. याला पोस्ट कोव्हिड (Post Covid) लक्षणं म्हटलं जात आहे.

कोरोना बरा झाला तरी त्याचा परिणाम जास्त काळ शरीरावर राहतो. त्यामुळे विविध अवयवांवरही परिणाम दिसतो. कोरोनामध्ये शरीरात ऑक्सिजन कमी झाल्याने रुग्णाचा मृत्यू ओढावतो. कोरोना बरा झाला तरी शरीरात रक्त पुरवठ्यावर परिणाम होतोय. कोरोनाने शरीरात रक्तात ऑक्सिजन लेव्हल खाली येते. ती भरून काढायला शरीराला जास्त वेळ लागत असावा असं मानलं जात आहे.

(भय इथलं संपत नाही! कोरोनासारखे आणखी 30 भयंकर व्हायरस; भविष्यातही महासाथीचं सावट)

पटना AIIMS रुग्णालयांमध्ये पोस्ट कोव्हिड (Post Covid) लक्षणांवर संशोधन केलं जातंय. पटना मधील AIIMS रुग्णालयांमध्ये दुसऱ्या लाटेमध्ये बऱ्या झालेल्या कोरोना रुग्णांवर अभ्यास केला जातोय. इथल्या डॉक्टरांच्या मते पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेमध्ये बऱ्या झालेल्या कोरोना रुणांमध्ये पोस्ट कोव्हिडची लक्षणं दिसून येतात. या रुग्णांमध्ये विविध प्रकारचे त्रास दिसतात. त्यातही शरीरात रक्त पुरवठ्यावर परिणाम होत असल्याचं लक्षात आलं  आहे.

(फ्रूट ज्यूसच्या माध्यमातून विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह, सुट्टी घेण्याचा जुगाड)

पटना AIIMS च्या ट्रॉमा एमर्जन्सी विभागाचे HOD डॉक्टर अनिल कुमार यांच्या मते कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये डोकेदुखी, तोंड सुकणं आणि नसांमध्ये योग्य प्रकारे रक्त पुरवठा न होणं अशी लक्षणे दिसून येतात. यामुळेच पोस्ट कोव्हिड रुग्णांमध्ये हाताला मुंग्या येणे, हाताची हालचाल करताना त्रास होणे हे त्रास दिसत आहेत.

(''तुम्हीही घाबरू नका, माझ्या आईनं कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले'')

पोस्ट कोव्हिडची लक्षण

कोरोनामधून बरं झालेल्या रुग्णांना थकवा जाणवत राहतो.

खोकला आणि छातीमध्ये कफ होण्याची समस्याही बरेच दिवस राहते.

कोरोना झाल्यावर भूक कमी लागण्याचा त्रास होतो. तो त्रास कोरोना बरा झाल्यावरही बरेच दिवस राहतो.

मानसिक ताण जाणवतो, सतत आळस वाटत राहतो.

हातापायांना मुंग्या आल्यामुळे हालचाल करता येत नाही.

रक्त गोठण्याची समस्या झाल्यामुळे नसांमध्ये रक्त पुरवठा होत नाही.

Published by: News18 Desk
First published: June 28, 2021, 8:23 PM IST

ताज्या बातम्या