लहानपणी शाळेतून सुट्टी मारण्यासाठी तुम्ही पण बहाणे केले असतील, नाही का. ताप येणं, डोकं दुखणं, पोट दुखणं अशी बरीच कारणं आणि ती खरी आहेत असं भासवण्यासाठीचे काही मजेशीर उपाय आपल्याला माहीत असतील. आता काळाच्या ओघात नवनवे आजार येत आहेत आणि मुलांची या बाबतीतली क्रिएटिव्हिटीदेखील वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप असला, तरी अनेक देशांनी शाळा (schools) सुरू केल्या आहेत. ज्या देशांनी शाळा सुरू केल्या आहेत, तेथील विद्यार्थी कोरोनाचा पॉझिटिव्ह रिपोर्ट (Coronavirus Positive Result) आणण्याच्या ट्रिक्स शिकले आहेत. त्यामुळे कोरोनाचा खोटा रिपोर्ट दाखवून अनेक विद्यार्थी शाळेतून सुट्टी घेत आहेत. टिकटॉक या व्हिडिओ नेटवर्किंग साइटवर (TikTok Viral Video) असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात कोरोना व्हायरस किटमध्ये पॉझिटिव्ह रिझल्ट (COVID-19 Test) आणण्याचा हॅक शेअर करण्यात आलाय. ही ट्रिक इतकी सोपी आणि स्वस्त आहे, की विद्यार्थी याचा वापर करून शाळेला दांडी मारत आहेत. फक्त एका फ्रूट ज्यूस बॉटलमुळे कोरोना टेस्ट किट (Covid lateral flow Test) पॉझिटिव्ह रिझल्ट दाखवत आहे. हे ही वाचा- New Normal: याठिकाणी क्वारंटाइन, आयसोलेशन रद्द! तापाप्रमाणेच कोरोनाशी देणार लढा सोशल मीडियावर हिट झालाय व्हिडिओ हा व्हिडियो @leanne_kenz नावाच्या टिकटॉक अकाउंटवरून (TikTok Video) शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 4 लाख लोकांनी पाहिला आहे. तसंच ‘कोविड टेस्टचा खोटा रिझल्ट (False COVID-19 Positive Result) आल्यानंतर मला थँक्यू म्हणाल’ अशी फोटो ओळ या व्हिडिओला देण्यात आली आहे. हा व्हिडिओ शाळकरी मुलांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाला आहे. एका सेकंडरी स्कूलने याबाबत खुलासा करत म्हटलंय की, मुलं या हॅकचा वापर करून कोविड पॉझिटिव्ह रिझल्ट दाखवून शाळेतून सुट्टी घेत आहेत. कसा येतो खोटा रिझल्ट? व्हिडिओमध्ये कोविड रॅपिड टेस्ट किटवर एक व्यक्ती फ्रूट शॉटच्या (Fruit Juice Hacks) बॉटलमधून ज्यूस टाकते. दुसरीकडे रिझल्ट विंडोमध्ये पॉझिटिव्ह साइनवर दोन रेषा दिसू लागतात. कोणतंही आम्लयुक्त ज्यूस टाकल्यानंतर अँटीबॉडी प्रोटीनला डिझॉल्व्ह करून खोटा रिपोर्ट दाखवते. ही ट्रिक विद्यार्थ्यांना खोटं बोलायला शिकवत आहे. टिकटॉक युजर्सनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. कारण हा व्हिडिओ खोटा डेटा दाखवण्यास प्रोत्साहित करत आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. शाळांनी RT-PCR टेस्ट केली बंधनकारक लिव्हरपूलमधील एका शाळेने या हॅकबद्दल मेल ऑनलाइनला माहिती दिली. त्यात त्यांनी म्हटलं आहे, की विद्यार्थी या ट्रिक्सचा गैरफायदा घेत आहेत. ऑरेंज ज्यूसचे काही थेंब कोविड टेस्ट किटवर टाकून पॉझिटिव्ह रिझल्ट दाखवून विद्यार्थी सुट्टी घेत आहेत. त्यामुळे शाळांनी आता RT-PCR चाचणी बंधनकारक केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.