माद्रिद, 05 फेब्रुवारी : संडे हो या मंडे रोज खाओ अंडे… अंडं आरोग्यासाठी चांगलं मानलं जातं. कित्येकांच्या घरातील सकाळचा नाश्ताच असतो. उकडलेलं अंडं, अंडा ब्रेड, ऑमलेट पाव, अंडापाव, असे ब्रेकफास्टसाठी अंड्यापासून कितीतरी पदार्थ बनवले जातात. तुम्हीही अंडं आवडीने खात असाल तर सावधान राहा. कारण अंड्यामुळे बरेच लोक आजारी पडले आहेत. काहींना तर रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली आहे. स्पेनच्या माद्रिदमधील ही घटना आहे. इथं अंडं खाल्ल्यानंतर अनेक जण आजारी पडले आहेत. त्यांच्या पोटात वेदना सुरू झाल्या, तापही आला. तपासणी केल्यानंतर त्यांना साल्मोनेला बॅक्टेरियाची लागण झाल्याचं समजलं. या सर्वांनी एका प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये एग टॉर्टिला हा पदार्थ खाल्ला होता. एग टॉर्टिला ही अंड्याची एक स्पॅनिश रेसिपी आहे. स्पेनमध्ये हा पदार्ख खूप खाल्ला जातो. तळलेले बटाटे, अंडं, कांदा असतो. माद्रिदमधील कासा दानी रेस्टॉरंट या पदार्थासाठी खूप प्रसिद्ध आहे. या रेस्टॉरंटने 2019 साली स्पॅनिश पोटॅटो टॉर्टिला चॅम्पियनशिपमध्ये बरेच पुरस्कार जिंकले आहेत. नेटफ्लिक्सची फूड सीरिज ‘समबडी फीड फिल’मध्येही दाखवण्यात आलं आहे. दरवर्षी जवळपास 100,000 टॉर्टिला सर्व्ह करतात. हे वाचा - ऐकावं ते नवल! चक्क समोशाने केली इंजिनीअरिंग; B.Tech डिग्रीवाला समोसा चर्चेत गेल्या आठवड्यात इथं कमीत कमी 59 लोकांनी टॉर्टिला खाल्लं. त्यानंतर त्यांना फूड पॉइझनिंग झालं. माद्रिदच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार 6 लोकांनी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यानंतर हे रेस्टॉरंट तात्पुरत्या कालावधीसाठी बंद करण्यात आलं आहे. आम्ही स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांसह आमचं किचन साल्मोनेला बॅक्टेरियामुक्त व्हावं आणि लवकरात लवकर पुन्हा खुलं व्हावं यासाठी प्रयत्न करत आहोत.
साल्मोनेला आऊटब्रेकनंतर माद्रिद आरोग्य विभाग कासा दानीसह इतर कोणत्या रेस्टॉरंटमध्ये टॉर्टिला कसं तयार केलं जातं, तिथं अंड्याचा उपयोग नियमांनुसारच होतो आहे की नाही, याची तपासणी करत आहे. अंडी शिजवण्यासाठी काय आहेत नियम? गेल्या तीन दशकांपासून स्पेनमध्ये हा नियम लागू आहे की ग्राहकांना दिली जाणारी अंडी पास्चुरीकृत असावीत. म्हणजे ताजी अंडी कमीत कमी 75 डिग्री सेल्सियस तापमानावर शिजवावीत. डिसेंबर 2022 या नियमांत थोडा बदल करण्यात आला. ज्यात अंडं शिजवण्याचं तापमान 70C किंवा त्यापेक्षा थोड्या अधिक तापमानवर 2 मिनिटं किंवा 63C तापमानावर 20 मिनिटं शिजवावं. अंड्याचा सफेद भाग जवळपास 62-65C वर आणि अंड्याचा बलक 65-70C तापमानावर सेट होतो. हे वाचा - पराठ्याच्या नावाने काहीही! VIDEO पाहून सांगा, आहे का असं काही खाण्याची तुमची तयारी? ही डिश बनवण्यात तरबेज असलेले माद्रिदच्या सिलकर रेस्टॉरंटचे मालक अल्फ्रेडा गार्सिया यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, आम्ही टॉर्टिलामध्ये एक थर्मामीटर टाकतो आणि 2 मिनिटासाठी 70 डिग्रीवर शिजवण्यासाठी ठेवतो. इतक्या तापमानावर सर्व बॅक्टेरियाही नष्ट होता. माद्रिदच्या सरकारने लोकांना सावध केलं आहे. प्रामुख्याने उष्ण कालावधी टॉर्टिलामध्ये साल्मोनेला बॅक्टेरियासाठी अनुकूल असतं. टॉर्टिला बनवण्यासाठी ताज्या अंड्यांचा वापर केला जातो, तेव्हा ही समस्या असते. टॉर्टिलाचा केंद्र सेट होत नाही आणि शिजलेल्या टॉर्टिलाला दोन तासांपेक्षा जास्त वेळ रूम टेम्परेचर ठेवलं जां.
माद्रिदच्या आरोग्य विभागाने टॉर्टिलामध्ये ताज्या अंड्याऐवजी पेस्टराइज्ड अंड्याचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. पण गार्सिया यांनी सांगितलं की त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये 90 टक्के ग्राह ताज्या अंड्यांचं टॉर्टिला आवडतं.