मुंबई, 15 डिसेंबर : केसगळती ही अनेकांसाठी अतिशय त्रासदायक गोष्ट असते. मात्र, वाढत्या वयानुसार आणि अलिकडे किशोरवयीन अवस्थेतही बहुतांश लोकांना केसगळतीला सामोरं जावं लागतं. मात्र, ही प्रक्रिया थांबवण्यासाठी आणि अगदी नवे केस उगवणं सुरू करण्यासाठीही अनेक नैसर्गिक उपचार उपलब्ध आहेत. अनेक तज्ञ आणि त्यांच्या अभ्यासातून समोर आलं आहे, की कॅफेन केसांच्या वाढीला चालना देतं.
केसांच्या मुळांना आणि स्काल्पला कॅफेन लावल्यानं केसगळती थांबू शकते आणि त्यातून केसवाढीलाही चालना मिळते असं तज्ञ सांगतात. पुरुषांचा टकलाच्या संदर्भात बोलायचं तर, जेव्हा सेक्स हार्मोन डिहायड्रोटेस्टेस्टेरॉन (DHT) केसांच्या मुळांना इजा पोचवतं तेव्हा हे घडतं. महिलांमध्ये DHT अतिरिक्त स्रवल्यास त्यांनाही हा त्रास होऊ शकतो.
केसांचे फॉलिकल्स हळूहळू कमकुवत होतात आणि परिणामी शेवटी त्याचं टकलात रूपांतर होतं. असं असलं तरी, संशोधनानुसार, कॉफीमधील कॅफेन केसांची वाढ आणि केसगळती प्रतिबंधासाठी उपयोगी ठरतं. Wiley online मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, हेअर फॉलिकल्सच्या प्रॉलिफरेशन अर्थात वाढीला कॅफेन कशी मदत करते यावर अजून चिकित्सात्मक प्रकाश टाकला गेला. अभ्यासात नोंदवलं गेलं, की अनुक्रमे कॅफेन आणि टेस्टस्टरॉन या दोन्हीचं हेअर ऑर्गन कल्चर मॉडेल अभ्यासासाठी वापरलं गेलं. दोन्हीपैकी कॅफेन यात अधिक प्रभावी असल्याचं समोर आलं. कॅफेनमुळं केसांची वाढ अधिक चांगली झाली.
हेअर फॉलिकल्सला कॅफेनच्या कल्चरमध्ये वाढीला चांगली चालना मिळाली होती. या अभ्यासात निष्कर्ष काढला गेला, की कॅफेन हे केसांच्या वाढीसाठी उत्प्रेरक म्हणून काम करतं आणि ऍलोपेशिया अर्थात टकलावर उपचार करताना याचा चांगला उपयोग होऊ शकतो.
स्किन फार्माकॉलॉजी आणि फिजिओलॉजीमध्ये प्रकाशित आणखी एका अभ्यासात मिनॉक्सीडील आणि कॅफेन या दोन द्रावणांचा वापर करून संशोधन सुरू केलं. संशोधकांनी ऍनाजेन प्रकारच्या केसांची टक्केवारी अभ्यासाच्या सुुरुवातीपासून ते पुढच्या सहा महिन्यांपर्यंत मोजली.
ऍनाजेन ही केसांच्या फॉलिकल्सची सक्रिय वाढीची अवस्था असते. या अवस्थेत केसांची मुळं वेगानं विभाजित होतात. सहा महिन्याच्या टप्प्यावर या संशोधकांनी मिनॉक्सीडील द्रावणाचा वापर केलेल्या कल्चरमध्ये 11.68 टक्के वाढ नोंदवली. हीच वाढ कॅफेनच्या कल्चरमध्ये 10.59 इतकी होती.
हे वाचा - पुरुष बाळांना स्तनपान करू शकत नाहीत, तरी त्यांच्या छातीवर स्तनाग्र का असतात?
यातून संशोधकांनी निष्कर्ष नोंदवला, की कॅफेनचं द्रावण हे मिनॉक्सीडीच्या द्रावणाहून अजिबात कनिष्ठ नाही. ऍलोपेशियाच्या उपचारांसाठी कॅफेनही तितकेच प्रभावी आहे. हे जाणून घेणंही महत्त्वाचं आहे, की मिनॉक्सीडील कुणीही वापरू शकतं. महिलांमधील टाकाळाच्या उपचारातही मिनॉक्सीडील कामाला येऊ शकतं. महिलांनी फिनास्टेराईड वापरू नये असंही NHSनं सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Research, Woman hair