मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

बापरे! दातात झालं असं खतरनाक इन्फेक्शन की जीवही गेला; 15 वर्षीय मुलीचा मृत्यू

बापरे! दातात झालं असं खतरनाक इन्फेक्शन की जीवही गेला; 15 वर्षीय मुलीचा मृत्यू

दातातील इन्फेक्शनमुळे मुलीचा मृत्यू (प्रतीकात्मक फोटो/सौजन्य - Canva)

दातातील इन्फेक्शनमुळे मुलीचा मृत्यू (प्रतीकात्मक फोटो/सौजन्य - Canva)

दातात इन्फेक्शन झाल्यानंतर तिचा एकेएक अवयव निकामी झाला आणि तिचा मृत्यू झाला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India
  • Published by:  Priya Lad

वॉशिंग्टन, 17 नोव्हेंबर : बऱ्याच लोकांना दातांच्या समस्या असतात. दातांमध्ये इन्फेक्शन होतं. पण एका मुलीसाठी दातातील असंच इन्फेक्शन जीवघेणं ठरलं. दातात असं खतरनाक इन्फेक्शन झालं की तिचा जीव गेला. दातातील इन्फेक्शनमुळे तिचा एकेएक अवयव निकामी झाला आणि तिचा मृत्यू झाला. मेक्सिकोतील हे धक्कादायक प्रकरण आहे.

15 वर्षांच्या या मुलीच्या दातात ब्लॅक फंगस झालं होतं. याला म्यूकोर्मिकोसिस असंही म्हटलं जातं. कोरोना काळात तुम्ही ब्लॅक फंगसबाबत बरंच ऐकलं असेल.  याला आधी ज़ाइगोमाइकोसिस असंही म्हटलं जात होतं. सामान्यपणे हवेतील फंगस श्वासमार्फत आधी सायनस किंवा फुफ्फुसांवर परिणाम करतात. पण या मुलीच्या दातात असं इन्फेक्शन झालं. तिथून ते तिच्या डोक्यात पसरलं. मुलीला मधुमेह केटोएसिडोसिस होता. ज्यामुळे तिची प्रकृती अधिक गंभीर झाली.

हे वाचा - बाप रे बाप! व्यक्तीच्या पोटातून निघाला चक्क 'फुटबॉल'; वेदनेकडे दुर्लक्ष करणं पडलं महागात

मुलीची आई करेन हिडाल्गो आणि आजी मारिया इसाबेल रोड्रिग्जने सांगितलं की ५ नोव्हेंबरला तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

डॉक्टरांनी तिच्या टाळूचा भाग हटवला होता. आजाराची गंभीरता पाहून डॉक्टर तिच्या चेहऱ्याचा काही भाग हटवण्याच्या आणि एक डोळा काढण्याच्या विचारात होते   चेहरा आणि डोळ्याचा भाग काढण्याची परवानगी डॉक्टरांनी तिच्या कुटुंबाकडे मागितली. सुरुवातीला तिची आई तयार नव्हती पण किती गुंतागुंत आहे आणि आता मुलीची प्रकृती इतकी गंभीर आहे की याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचं डॉक्टरांनी सांहितलं, तिला मधुमेह होता त्यामुळे सर्वकाही आणखी जटिल झालं होतं. फंगस पुढे पुढे पसरत जात होता. दातात संक्रमण होतं, इथूनच हा फंगस आला होता.

हे वाचा - आश्चर्य! तासाभरातच 'मृत' मुलगा पुन्हा जिवंत झाला; श्वास थांबल्यानंतरही डॉक्टरांनी केला 'चमत्कार'

पण तिच्या चेहरा आणि डोळ्याचा काही भाग काढण्याआधीच तिचे बरेच अवयव निकामी होऊ लागले. मल्टी ऑर्गन फेलिअरमुळे तिचा मृत्यू झाले. स्थानिक मीडियाच्या माहितीनुसार मधुमेह केटोएसिडोसिससह गुंतागुंत झाल्याने एलिसनचा मृत्यू झाला.

First published:

Tags: Health, Lifestyle, Viral, World news