हैदराबाद, 17 नोव्हेंबर : आपल्यापैकी बरेच लोक शरीराच्या वेदनांकडे दुर्लक्ष करतात. सामान्य आहे समजून किंवा काही घरगुती उपचार करून तात्पुरता आराम मिळवतात. अशाच वेदनांकडे दुर्लक्ष करणं एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलं आहे. या व्यक्तीच्या पोटातून चक्क फुटबॉलच निघाला आहे. डॉक्टरही हैराण झाले. तामिळना़डूच्या हैदराबादमधील हे प्रकरण आहे.
हैदराबादच्या कडप्पामध्ये राहणारी 53 वर्षांची ही व्यक्ती. या व्यक्तीच्या पोटात वेदना होत होत्या. पण सुरुवातीला त्याकडे तिने दुर्लक्ष केलं. पण जसं वेदना असलेल्या भागावर सूज येऊ लागली तशी तिने डॉक्टरांकडे धाव घेतली. रुग्णालयात या व्यक्तीच्या तपासण्या करण्यात आल्या तेव्हा पोटात बऱ्याच जखमा दिसल्या. त्याचा पोटात चक्क फुटबॉलसारखं काहीतरी दिसलं. एशियन इन्स्टीट्यूट ऑफ नेफ्रोलॉजी अँड यूरोलॉजीमध्ये या व्यक्तीवर सर्जरी करण्यात आली.
हे वाचा - आश्चर्य! तासाभरातच 'मृत' मुलगा पुन्हा जिवंत झाला; श्वास थांबल्यानंतरही डॉक्टरांनी केला 'चमत्कार'
तेव्हा डॉक्टरांनी त्याच्या पोटातून जे बाहेर काढलं त्याचा आकार पाहून तेसुद्धा शॉक झाले. फुटबॉलच्या आकाराचा हा किडनी ट्युमर होता. या व्यक्तीवर उपचार करणारे डॉ मल्लिकार्जुन सी म्हणाले, "ट्युमरचा आकारच पाहता आम्ही रोबोटिकऐवजी ओपन सर्जरीचा निर्णय घेतला बऱ्याच प्रयत्नानंतर ट्युमर यशस्वीरित्या काढण्यात आला. सर्जरीनंतर आम्ही ट्युमरचा आकार पाहिला तर तो फुटबॉलच्या आकाराइतका होता. या ट्युमरचं वजन तब्बल 10 किलो होतं"
डॉ. तैफ बेंदिगेरी आणि डॉ. राजेश रेड्डी यांनी सांगितलं की, "या रुग्णाच्या पोटाला सूज होती. आश्चर्य म्हणजे वेदना होत असूनही या व्यक्तीने लक्ष दिलं नाही. कॅन्सरग्रस्त डावी किडनी काढण्यात आली. सुदैवाने ट्युमर शरीराच्या इतर अवयवामध्ये पसरला नव्हता"
हे वाचा - Shocking! मित्रांची मस्ती जीवावर बेतली; खेळाखेळात 17 वर्षांच्या मुलाचा मृत्यू
इंडिया डॉट कॉमच्या वृत्तानुसार तेलुगू राज्यातील पहिली आणि देशातील ही अशी दुसरी घटना आहे, अशी माहिती रुग्णालयाने दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.