बॅंकाॅक, 17 फेब्रुवारी : व्हॅलेंटाईन डे (Valentine Day) च्या निमित्ताने काही रोमांचक गोष्टी करण्याची संधी प्रेमींना मिळते. परंतु, अशीच रोमांचक गोष्ट करण्याच्या नादात थायलंडमधील (Thailand) एका तरुणाला रुग्णालयातील अतिदक्षता विभागात भरती व्हावे लागले. या तरुणाने आपल्या जोडीदारास प्रभावित करण्यासाठी स्वतःच्या जननेंद्रियाला (Penis) अंगठी (Ring) घातली. हे कृत्य या तरुणाच्या चांगलेच अंगलट आले. यामुळे त्याच्या गुप्तांगाला तीव्र वेदना होऊ लागल्या. असे असूनही त्याने वैद्यकिय उपचार न घेता दोन दिवस याच स्थितीत काढले. अखेरिस या तरुणाला वेदनामुक्त करण्यासाठी आणि पेनिसवरील अंगठी काढण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांना औद्योगिक वापरासाठी असलेल्या ग्रेड बोल्ट कटरचा वापर करावा लागला. या तरुणाने आपत्कालीन सेवकांना सांगितले, की ही घटना बॅंकाॅकमध्ये (Bangkok) घडली. व्हॅलेंटाईन डे निमित्ताने जोडीदाराला इम्प्रेस करण्यासाठी मी डीवायआय ही पुरुषांचे जननेंद्रिय वाढवण्याची पद्धत वापरली. ही वापरण्यासाठी मी खूप उत्सुक होतो. ही अशा प्रकारची टाॅईज कपल्सकडून नेहमीच वापरली जातात. पण हे टाॅईज कसे काढून टाकावे, याबाबत या तरुणाला माहिती नव्हती. या अशा प्लेसाठी त्याने सिलिकाॅन किंवा अन्य सुरक्षित आणि ताणता येण्याजोग्या साहित्यापासून बनवलेली अंगठी खरेदी करण्याऐवजी त्याने 3 सेमी रुंद (1.2 इंच) स्टिल नट मिळवण्याचा प्रयत्न केला. ल्युब्रिकंट म्हणून बेबी आईलचा वापर करत त्याने शुक्रवारी ही अंगठी गुप्तांगावर घातली. मात्र दुसऱ्या दिवशी पेनिसला सूज आली असून ल्युब्रिकंटचा वापर करुनही ती अंगठी निघत नसल्याचे त्या तरुणाच्या लक्षात आले. अखेरीस त्याने रविवारी संध्याकाळी आपत्कालीन सेवेशी संपर्क साधला. संपूर्ण दोन दिवस ती अंगठी सूज आलेल्या गुप्तांगावरच होती. ही स्थिती पाहून मी खूप घाबरलो. जननेंद्रियावरील सूज पाहून ते फुटेल की काय किंवा ते काढून टाकावे लागेल की काय अशा विचारांनी अस्वस्थ झाल्याचे त्या तरुणाने सांगितले. आम्ही ही अशी विलक्षण घटना पहिल्यांदाच पाहिल्याचं एका वैद्यकीय सेवकाने सांगितलं. बोटात अंगठी अडकल्याची घटना सामान्य म्हणता येईल, पण या घटनेत अंगठी जननेंद्रियावर अडकल्याने आम्ही आश्चर्यचकित झालो आहोत, असंही ते म्हणाले. या केसमध्ये नट काढून टाकणे ही समस्या नव्हती तर तो काढून टाकण्याच्या प्रक्रियेमुळे त्या तरुणाला होणारा त्रास आणि वेदनेबाबत आम्हाला भिती होती. तरुणास रुग्णालयात दाखल केल्यानंतर प्रथम एक थीन मेटल शीट नट आणि इंद्रियामध्ये प्रोटेक्शन म्हणून टाकण्यात आली. त्यानंतर वैद्यकिय पथकाने अंगठी कापण्यासाठी स्पिनिंग स्टिल कटरचा वापर केला. सुमारे 60 मिनिटांच्या प्रयत्नांनंतर या तरुणाची वेदनेतून सुटका झाली. इन्फेक्शन होऊ नये आणि सूज उतरावी यासाठी त्याला क्रिम आणि अॅन्टीबायोटिकच्या गोळ्या देण्यात आल्या. या सर्व प्रकारामुळे तरुणाला डेटवर (Date) मात्र जाता आले नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.