मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

त्वचेपासून ते केसांच्याही आरोग्यासाठी गुणकारी आहेत कडुनिंबाची पाने; जाणून घ्या या पद्धती

त्वचेपासून ते केसांच्याही आरोग्यासाठी गुणकारी आहेत कडुनिंबाची पाने; जाणून घ्या या पद्धती

कडुलिंबाची पानं -
एक लिटर पाण्यात कडुनिंबाची पाने उकळून हे पाणी आंघोळीच्या पाण्यात मिसळून रोज आंघोळ केल्यास घामोळे निघून जातील.

कडुलिंबाची पानं - एक लिटर पाण्यात कडुनिंबाची पाने उकळून हे पाणी आंघोळीच्या पाण्यात मिसळून रोज आंघोळ केल्यास घामोळे निघून जातील.

कडुलिंबाची पानं, देठापासून ते मुळांपर्यंत सर्व काही विविध समस्यांवर मात करण्यासाठी वापरलं जातं. कडुनिंबाचं तेलही बाजारात उपलब्ध आहे. त्वचेपासून ते केसांपर्यंत सर्व समस्या दूर करण्यासाठी ते उपयुक्त आहे. याबाबत जाणून घेऊया.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 22 डिसेंबर : हिवाळ्याच्या ऋतूचा आपल्या केसांवर आणि त्वचेवरही परिणाम होतो. या ऋतूत त्वचा कोरडी होते. केसांमध्येही कोरडेपणा (Hair Problem in Winter) वाढू लागतो. या समस्येवर मात करण्यासाठी हल्ली अनेक प्रकारची उत्पादनं बाजारात विकली जातात; परंतु, ती महाग असतात आणि त्यांचा प्रभावही फार काळ टिकत नाही.

अशा परिस्थितीत कडुनिंब तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. कडुनिंबाचं झाड तुम्हाला कुठेही सहज मिळेल. कडुनिंबात भरपूर औषधी घटक असतात. त्याची पानं, देठापासून ते मुळांपर्यंत सर्व काही विविध समस्यांवर मात करण्यासाठी वापरलं जातं. कडुनिंबाचं तेलही बाजारात उपलब्ध आहे. त्वचेपासून ते केसांपर्यंत सर्व समस्या दूर करण्यासाठी ते उपयुक्त आहे. जाणून घेऊ (Benefits of Neem) कडुनिंबाचे सर्व फायदे.

कमकुवत केस मजबूत करते

कडुनिंबाचे तेल दाह-विरोधी, प्रतिजैविक आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध आहे. हे केस गळणं थांबवतं आणि केस मजबूत करतं. जर तुमचे केस लवकर वाढत नसतील तर तुम्ही कडुनिंबाची पानं काही वेळ पाण्यात उकळून त्या पाण्यानं केस धुवावेत. आठवड्यातून एकदा असं केल्यानं केसांची वाढ चांगली होऊ लागते.

डोक्यातील कोंडा घालवतं

कडुनिंबात बुरशीविरोधी गुणधर्म असतात. ते केसांतील कोंड्याची समस्या दूर करतात. तसंच केसांच्या मुळांशी असणारी सूज, खाज, आग आणि बुरशीजन्य संसर्गही दूर करतात. या समस्यांवर मात करण्यासाठी केसांसाठी कडुनिंबाचं तेल वापरावं किंवा कडुनिंबाच्या पानं उकळलेल्या पाण्यानं केस धुवावेत. या दोन्ही उपायांनी आराम मिळेल.

उवांची समस्या दूर होते

लहान मुलांच्या केसांत उवा होतात, तेव्हा त्या काढणं खूप अवघड असतं. अशा वेळी कडुनिंबाचं तेल खूप फायदेशीर ठरू शकतं. कडुनिंबाच्या तेलामध्ये असलेले कीटकनाशक घटक उवांची वाढ आणि पुनरुत्पादन रोखण्यास मदत करतात. यामुळं काही तासांतच उवांच्या समस्येपासून सुटका मिळते.

हे वाचा - मुंबईची मुलगी आम्रपाली गान यांची ‘Only Fans’च्या CEO पदी नियुक्ती; संस्थापकांची घेतली जागा

त्वचा रोग बरे होतात

कडुनिंबाचे तेल त्वचेशी संबंधित सर्व समस्या दूर करण्यासाठी देखील प्रभावी आहे. कडुनिंबाची पानं उकळलेल्या पाण्यानं आंघोळ केल्यानं खाज, अ‌ॅलर्जी, एक्जिमा आदी समस्यांमध्ये आराम मिळतो. याशिवाय बाधित भागावर कडुनिंबाचे तेल लावल्यानं खूप आराम मिळतो.

मुरुमांपासून मुक्त व्हा

कडुनिंबाची पानं कुस्करून फेसपॅक म्हणून वापरल्यास त्वचेवरील मुरुमांची समस्या दूर होते. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ही पानं सुकवून पावडर बनवू शकता आणि पॅक म्हणून वापरू शकता.

हे वाचा - लग्नाच्या 24 व्या दिवशी सासरी आलेल्या जावयाची हत्या; दार उघडताच घातल्या गोळ्या

ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स

मुलतानी मातीमध्ये कडुनिंबाची पावडर मिसळल्यास ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्सची समस्या कायमची दूर होऊ शकते. हा फेस पॅक एक्सफोलिएटिंग एजंट म्हणून काम करतो आणि त्वचेवरील छिद्रं देखील साफ करतो.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Health, Health Tips