Home /News /heatlh /

तुम्ही मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम करता? जाणून घ्या त्याचे दुष्परिणाम

तुम्ही मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम करता? जाणून घ्या त्याचे दुष्परिणाम

मायक्रोवेवमध्ये जेवण आणि दूध गरम केल्यामुळे शरीरातले रेड ब्लड सेल्स कमी व्हायला लागतात.

मायक्रोवेवमध्ये जेवण आणि दूध गरम केल्यामुळे शरीरातले रेड ब्लड सेल्स कमी व्हायला लागतात.

मायक्रोवेव्हसारखे कमालीचे उपकरण आपल्या मदतीला असताना अन्न झटपट गरम होते, वेळ वाचतो आणि गॅसची ही बचत होते.

    नवी दिल्ली, 26 ऑगस्ट : चुली, स्टोव्हचा जमाना आता गेला. त्याऐवजी गॅस शेगड्या, मायक्रोवेव्ह ओव्हन (Microwave) अशी साधनं आपल्या स्वयंपाकघरात येऊ लागली आहेत. अन्न गरम करण्यासाठी बहुतेक स्वयंपाकघरांमध्ये मायक्रोवेव्हचा वापर करण्याचे प्रमाण वाढले आहे. अगदी काही मिनिटांच्या आतच चहासकट कुठलाही पदार्थ मायक्रोवेव्हमध्ये पटकन गरम होऊ शकतो. शिवाय गरम होत असलेल्या अन्नावर लक्ष ठेवावं लागत नाही. मायक्रोवेव्हमध्ये वेळ सेट केली की मायक्रोवेव्ह आपले काम पूर्ण करून आपोआप बंदही होऊन जातो. अगदी भाज्या तयार करण्यापासून ते पॉपकॉर्नपर्यंत सर्व काही मायक्रोवेव्हमध्ये अगदी काही मिनिटांत तयार होतं. पण मायक्रोवेव्हचा सातत्याने वापर करणं हे किती धोकादायक होऊ शकतं, हे आपल्याला माहिती आहे का? मायक्रोवेव्हमध्ये स्वयंपाक करण्याचे अनेक दुष्परिणाम आहेत. झी न्यूजने याबाबतचं वृत्त दिलं आहे. आरोग्याबरोबर चेहऱ्यासाठीही आहेत लवंग तेलाचे फायदे; या पद्धतीने वापरल्यास डाग, पुरळ, सुरकुत्या होतील कमी मायक्रोवेव्हमध्ये स्वयंपाक करण्याचे अनेक दुष्परिणाम (Side Effects) आहेत. तज्ज्ञांच्या मते, मायक्रोवेव्हमध्ये आपण जे अन्न गरम करतो, त्या अन्नातील पौष्टिक तत्वे (Nutrition) कमी होतात. हे अन्न खाल्ल्यामुळे तुमच्या त्वचेवरही (Skin) परिणाम होतो, आणि चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या दिसू लागतात. अन्नामध्ये पौष्टिकता नसेल, तर आपली त्वचा देखील खराब होऊ लागते. कोरोना महामारीच्या काळात प्रतिकारशक्तीचे महत्त्व सर्वांनाच कळाले. आपली प्रतिकारशक्ती (Immunity)वाढावी, यासाठी प्रत्येकानेच प्रयत्न केले. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अनेकांनी घरगुती उपाय केले, औषधे घेतली. पण तुम्हाला हे माहिती आहे का? आपली प्रतिकारशक्ती ही मायक्रोवेव्हमध्ये गरम केलेलं अन्न खाल्ल्यामुळे कमी होऊ शकते. मायक्रोवेव्हमध्ये तयार केलेलं अन्न हे तुमच्या प्रतिकारशक्तीवर परिणाम करतं. यामुळे तुमची प्रतिकारशक्ती आणि रोगांसोबत लढण्याची क्षमता कमी होते. मायक्रोवेव्हमध्ये शिजवेलेले अन्न पदार्थ हे पाचनक्रियेवरही (Digestion) वाईट परिणाम करतात. अभिनेत्री भाग्यश्रीसाठी मटार आहेत ‘प्रोटीन रत्न', या कारणामुळे तुम्ही देखील रोज खा हे हिरवे दाणे हे पदार्थ खाल्ल्याने कर्करोग होण्याचा (Cancer) धोका वाढतो. यामुळे कर्करोगाच्या पेशींची संख्या वाढते. आपल्या स्मरणशक्तीवर सुद्धा हे अन्न खाल्ल्यामुळे परिणाम होतो. मायक्रोवेव्हमध्ये तयार झालेलं अन्न नियमितपणे खाल्ल्याने विस्मरणाचा (Memory Loss) धोका असतो. हे अन्न मानवी शरीरातील हॉर्मोन्सवरही (Hormones) परिणाम करते. मायक्रोवेव्हसारखे कमालीचे उपकरण आपल्या मदतीला असताना अन्न झटपट गरम होते, वेळ वाचतो आणि गॅसची ही बचत होते. पण मायक्रोवेव्हचा वापर हा कमीत कमी आणि गरजेपुरता करावा. जेणेकरून आपल्याला पुढील धोके टाळता येतील.
    First published:

    Tags: Food

    पुढील बातम्या