मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

Diabetes Prevention : डायबिटीज होऊ नये म्हणून काय करावं? मधुमेह टाळण्यासाठी हे आहेत उपाय

Diabetes Prevention : डायबिटीज होऊ नये म्हणून काय करावं? मधुमेह टाळण्यासाठी हे आहेत उपाय

डायबिटीजचं निदान झाल्यानंतर तो नियंत्रणात ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न संबंधित रुग्णाला करावे लागतात. सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे (Lifestyle) पोषक आहार, योग्य व्यायामाचा अभाव, वाढलेले ताण-तणाव आदी गोष्टी डायबिटीज होण्यास पूरक ठरतात.

डायबिटीजचं निदान झाल्यानंतर तो नियंत्रणात ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न संबंधित रुग्णाला करावे लागतात. सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे (Lifestyle) पोषक आहार, योग्य व्यायामाचा अभाव, वाढलेले ताण-तणाव आदी गोष्टी डायबिटीज होण्यास पूरक ठरतात.

डायबिटीजचं निदान झाल्यानंतर तो नियंत्रणात ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न संबंधित रुग्णाला करावे लागतात. सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे (Lifestyle) पोषक आहार, योग्य व्यायामाचा अभाव, वाढलेले ताण-तणाव आदी गोष्टी डायबिटीज होण्यास पूरक ठरतात.

पुढे वाचा ...

मुंबई, 28 जुलै : डायबिटीज (Diabetes) अर्थात मधुमेह हा शब्द जरी ऐकला तरी लोकं घाबरून जातात. अर्थात त्याला कारणही तसंच आहे. डायबिटीज हा अत्यंत दुर्धर आजार समजला जातो. डायबिटीजचं निदान झाल्यानंतर तो नियंत्रणात ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न संबंधित रुग्णाला करावे लागतात. सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे (Lifestyle) पोषक आहार, योग्य व्यायामाचा अभाव, वाढलेले ताण-तणाव आदी गोष्टी डायबिटीज होण्यास पूरक ठरतात. काही रुग्णांमध्ये डायबिटीज होण्यामागे अनुवंशिकता हे देखील कारण दिसून येते. जगभरात आज अब्जावधी लोक डायबिटीजग्रस्त आहेत.

दिवसेंदिवस ही संख्या वाढताना दिसून येत आहे. खरंतर प्रत्येक व्यक्तीला डायबिटीज हा आजार टाळता येऊ शकतो. मात्र त्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज असते. दैनंदिन जीवनशैलीत काही योग्य आणि सकारात्मक बदल केल्यास डायबेटिस नक्कीच टाळता येऊ शकतो. डायबिटीज टाळण्यासाठी काय करावं, याविषयीची माहिती जाणून घेऊया...

Everyday Habits: या 6 सवयींमुळे वय वाढण्याची क्रिया होते जलद, आताच बदला!

डायबिटीजचे प्रामुख्यानं तीन प्रकार असतात. त्यात डायबिटीज टाइप-1 (Diabetes Type-1), डायबिटीज टाइप -2 (Diabetes Type-2) आणि गर्भधारणा कालावधीतील डायबिटीज (Gestational Diabetes). डायबिटीजमध्ये ब्लड शुगर (Blood Sugar) नियंत्रणात ठेवणं आवश्यक असतं. काही रुग्णांमध्ये अगदी सुरवातीच्या टप्प्यात डायबिटीजची लक्षणं दिसून येतात. अशा रुग्णांची ब्लड शुगर लेव्हल प्रमाणापेक्षा अधिक असते. परंतु, ती मर्यादेपेक्षा अधिक नसल्यानं अशा रुग्णांना प्री-डायबेटिक (Pre-Diabetic) असं म्हणतात. डायबिटीज रुग्णांमधील हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण या टप्प्यावर पोषक आहार, व्यायाम आदी गोष्टींचा समावेश दैनंदिन जीवनशैलीत केल्यास आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास या आजारावर वेळीच नियंत्रण ठेवणं शक्य होतं. `सीडीसी`नं दिलेल्या माहितीनुसार केवळ अमेरिकेत 88 दशलक्ष प्रौढ व्यक्ती या प्री-डायबेटिक आहेत. म्हणजेच 3 पैकी 1 व्यक्तीमध्ये ही लक्षणे दिसून येतात. परंतु, याबाबतची माहिती त्यांना नसते. त्यामुळे पहिल्या टप्प्यात योग्य काळजी घेतल्यास डायबिटीज नियंत्रणात ठेवता येतो. डायबेटिसमध्ये रुग्ण एक सोपी ब्लड शुगर टेस्ट करुन रक्तातील ग्लुकोजची पातळी जाणून घेऊ शकतो. ही टेस्ट उपाशीपोटी, नाश्त्यानंतर, लंचनंतर, डिनरनंतर आणि त्रास जाणवल्यास अशा वेगवेगळ्या वेळी करावी लागते. तसेच एचबीए1सी (HBA1C) या टेस्टच्या माध्यमातून रक्त्तातील साखरेचं प्रमाण जाणून घेता येतं. परंतु, अशा प्रकारच्या टेस्टतज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानं आणि त्यांच्या देखरेखीखाली कराव्यात.

Prevention is better than cure अशी एक म्हण प्रचलित आहे. यानुसार तुम्ही तुमच्या जीवनशैलीत काही बदल केल्यास भविष्यात डायबिटीजमुळे होणाऱ्या मज्जातंतु, मूत्रपिंड, हृदयविकारासारख्या आरोग्यविषयीच्या गंभीर गोष्टी टाळणं शक्य होतं. डायबिटीज होऊ नये किंवा झाल्यास तो नियंत्रणात राहावा यासाठी दररोज व्यायाम करणं, योग्य आहार घेणं, धूम्रपान आणि मद्यपान टाळणं आवश्यक आहे. तसेच डायबिटीज टाळण्यासाठी काही लॉंग टर्म (Long Term) आणि शॉर्ट टर्म गोल्स (Short Term Goals) सेट करणं आवश्यक आहे.

Sinusitis Problem : साधी सर्दी की सायनसचा त्रास? साइनोसायटिस झालाय हे कसं ओळखावं?

या उपाययोजनांच्या माध्यमातून डायबिटीज टाळता येतो किंवा नियंत्रणात ठेवता येतो...

- साखरयुक्त पेय टाळा (Avoid sugary Drinks) : खूप गोड किंवा साखरयुक्त प्रिझर्व्हेटिव्ह पेयांमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो. जे लोक दररोज किंवा सातत्यानं साखरयुक्त पेय पितात, त्यांना डायबिटीज टाइप-2 होण्याची शक्यता जे लोक असं पेय पित नाहीत त्यांच्या तुलनेत 80 टक्क्यांनी अधिक असते, असं एका अभ्यासातून स्पष्ट झालं आहे. त्यामुळे साखरयुक्त पेय पिण्याऐवजी, ताज्या फळांचा ज्युस, नारळपाणी आदी पेयांवर भर द्यावा.

- दैनंदिन आहारात भाजीपाल्याचा समावेश करा : भाजीपाल्यात व्हिटॅमिन, मिनिरल्स आणि कार्बोहायड्रेटस आणि फायबर असतं. त्यामुळे दैनंदिन आहारात टोमॅटो, मिरपूड, ताजी फळं, फळभाज्या, ब्रोकोली, कोबी, सोयाबीन, मसूर, गव्हाचा ब्रेड, पास्ता आदींचा समावेश करावा.

- हेल्दी फॅटसचा (Healthy Fats) आहारात समावेश करा : स्निग्ध पदार्थांमध्ये कॅलरीज जास्त असतात. त्यामुळे आहारात या पदार्थांचं प्रमाण नगण्य असावं. वजन कमी करण्यासाठी तसेच नियंत्रणासाठी आहारात अनसॅच्युरेटेड पदार्थांचा समावेश असावा. हे पदार्थ हेल्दी फॅटस म्हणूनही ओळखले जातात. त्यामुळे अन्न पदार्थ तयार करण्यासाठी ऑलिव्ह ऑईल, सूर्यफूल, करडई, सरकी आणि कॅनोला तेल वापरणं श्रेयस्कर ठरतं. तसेच बदाम, शेंगदाणे, भोपळ्याच्या बिया तसेच फॅटी फिशचाही आहारात समावेश करावा. दुग्धजन्य पदार्थ आणि मांस यांचा आहारात मर्यादित प्रमाणात समावेश असावा.

- वजन नियंत्रणात ठेवा (Loss Extra Weight) : वजन कमी केल्यानं डायबिटीजचा धोका कमी होतो. योग्य व्यायाम आणि आहारात बदल केल्यानं 7 टक्के वजन कमी झाल्यानंतर लोकांना डायबिटीज होण्याचा धोका सुमारे 60 टक्क्यांनी कमी झाल्याचं एका संशोधनातून स्पष्ट झालं आहे. जे लोक प्री-डायबेटिक आहेत त्यांनी भविष्यातील डायबिटीजचा धोका कमी करण्यासाठी 7 ते 10 टक्के वजन कमी करावं, अशी शिफारस अमेरिकी डायबिटीज असोसिएशननं केली आहे. त्यामुळे डायबिटीजचा धोका टाळण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली वजन नियंत्रणासाठी प्रयत्न करावेत.

- शारीरिकदृष्ट्या सक्रिय रहावे (Be More Physically Active) : ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यासाठी डायबिटीज रुग्णांनी किंवा डायबिटीज होऊ नये यासाठी दिवसभर शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहावे. यासाठी अरोबिक एक्सरसाईज, रेसिस्टंट एक्सरसाईज आदी व्यायाम प्रकारांवर भर द्यावा. जर तुमचं कामकाज बैठं असेल तर प्रत्येक अर्ध्या तासानं कामातून ब्रेक घेत हालचाली करण्यावर भर द्यावा.

- याशिवाय डायबिटीज टाळण्यासाठी कोलेस्ट्रेरॉल, ट्रिंग्लीसिरायईडस, ब्लड प्रेशर पातळीकडं लक्ष द्यावं. तसेच दररोज पुरेशी झोप घ्यावी. ताण-तणावापासून दूर राहावं. छंद जोपासावेत.

- `द अमेरिकी डायबेटिस असोसिएशन`ने केलेल्या शिफारशीनुसार, 45 किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या सर्व प्रौढ व्यक्तींनी डायबिटीज टाइप-2 साठी निदान चाचण्यांसह नियमित तपासणी करावी. या उपाययोजनांनी तुम्ही डायबिटीजला दूर ठेवू शकता आणि तुमचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते.

First published:

Tags: Diabetes, Health Tips, Lifestyle