मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

Types Of Blood Pressure : फक्त लो-हाय बीपी नाही, ब्लड प्रेशरचे बरेच प्रकार; कोणता रक्तदाब असतो डेंजर पाहा

Types Of Blood Pressure : फक्त लो-हाय बीपी नाही, ब्लड प्रेशरचे बरेच प्रकार; कोणता रक्तदाब असतो डेंजर पाहा

रक्तदाबाच्या आजाराचा आपल्या आरोग्यावर घातक परिणाम होत असल्यानं वेळीच तो नियंत्रणात राहण्यासाठी उपचार करणे गरजेचे असते. यासाठी नियमितपणे रक्तदाब तपासत राहणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे रक्तदाब कोणत्या प्रकारचा आहे, हे जाणून घेणेही महत्त्वाचे असते.

रक्तदाबाच्या आजाराचा आपल्या आरोग्यावर घातक परिणाम होत असल्यानं वेळीच तो नियंत्रणात राहण्यासाठी उपचार करणे गरजेचे असते. यासाठी नियमितपणे रक्तदाब तपासत राहणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे रक्तदाब कोणत्या प्रकारचा आहे, हे जाणून घेणेही महत्त्वाचे असते.

रक्तदाबाच्या आजाराचा आपल्या आरोग्यावर घातक परिणाम होत असल्यानं वेळीच तो नियंत्रणात राहण्यासाठी उपचार करणे गरजेचे असते. यासाठी नियमितपणे रक्तदाब तपासत राहणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे रक्तदाब कोणत्या प्रकारचा आहे, हे जाणून घेणेही महत्त्वाचे असते.

पुढे वाचा ...

मुंबई, 28 जुलै : रक्तदाबाचा (Blood Pressure)आजार हा सायलेंट किलर (Silent Killer) म्हणून ओळखला जातो. कारण याची लक्षणं दिसत नसल्यानं त्यानं कधी आपल्या शरीरात शिरकाव केला आहे ते कळत नाही. अचानक काही मोठा आजार झाल्यानंतर रक्तदाब असल्याचे लक्षात येते. अनेकदा अशावेळी खूप उशीर झालेला असतो. आजकालच्या धावपळीच्या, ताणतणावाच्या जीवनशैलीमुळे वयाच्या तिशीतच रक्तदाबाचा विकार होण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. यातही उच्च रक्तदाब असण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. रक्तदाबाच्या आजाराचा आपल्या आरोग्यावर घातक परिणाम होत असल्यानं वेळीच तो नियंत्रणात राहण्यासाठी उपचार करणे गरजेचे असते. यासाठी नियमितपणे रक्तदाब तपासत राहणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे रक्तदाब कोणत्या प्रकारचा आहे, हे जाणून घेणेही महत्त्वाचे असते. कारण त्यानुसारच उपचार पद्धती ठरवली जाते. आज आपण रक्तदाबाचे प्रकार (Types of Blood Pressure)जाणून घेऊ या...

एखाद्या व्यक्तीला रक्तदाबाचा आजार आहे असं म्हटलं की हाय ब्लडप्रेशर म्हणजेच उच्च रक्तदाब (High Blood Pressure)की लो ब्लडप्रेशर कमी रक्तदाब (Low Blood Pressure)असं विचारलं जातं. बहुतांश वेळा उच्च रक्तदाब असल्याचं उत्तर मिळतं. कमी रक्तदाब असण्याचे प्रमाण तुलनेत कमी आहे. मात्र कोणत्याही प्रकारचा रक्तदाब असला तरी त्याचे परिणाम हे धोकादायकच असतात. त्यामुळे त्यावर उपचार घेऊन तो नियंत्रणात ठेवणं म्हणजेच सामान्य पातळीवर ठेवणं आवश्यक आहे. सामान्य: 120/80 mmHg रक्तदाब सामान्य मानला जातो. रक्तदाब सांगणाऱ्या दोन आकड्यांमध्ये एक आकडा हा सर्वोच्च दाब असतानाचा आणि एक सर्वात कमी दाब असतानाचा असतो. हृदय आकुंचन पावल्यानंतर पहिला (सिस्टोलिक दाब-Systolic Pressure) मोजला जातो आणि तो सर्वोच्च असतो. हृदय आकुंचित होण्यापूर्वी दुसरा (डायस्टोलिक दाब- Diastolic Pressure) दाब मोजला जातो तो सर्वात कमी असतो. मात्र नेहमी उच्च रक्तदाब आणि कमी रक्तदाब असे शद्ब ऐकत असल्यानं सर्वसामान्यपणे उच्च आणि कमी रक्तदाब असे दोनच प्रकार आहेत असा समज होऊ शकतो. मात्र तसे नाही. रक्तदाबाचे वेगवेगळ्या प्रकारांमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे.

Sinusitis Problem : साधी सर्दी की सायनसचा त्रास? साइनोसायटिस झालाय हे कसं ओळखावं?

उच्च रक्तदाबाचे साधा आणि अनुषंगिक अशा दोन गटातही वर्गीकरण केले जाते.

साधा उच्च रक्तदाब : आजकाल वयाच्या तिशीतच रक्तदाब तेही उच्च रक्तदाब आढळून येत आहे. उच्च रक्तदाबाचे धोके अधिक असतात. मात्र उच्च रक्तदाबाचा आजार जडण्यासाठी काही विशेष कारणे असल्याचे आढळलेले नाही. मनुष्याचा स्वभाव, व्यक्तिमत्त्व, मानसिकता, खाण्यापिण्याच्या सवयी, अनुवंशिकता, राहणीमान, व्यवसाय आणि जीवनशैली या गोष्टी यासाठी कारणीभूत असल्याचे मानले जाते. मात्र अमुक एक कारणच यामागे आहे, असं ठामपणे सांगता येत नाही. जवळजवळ 90 ते 95 टक्के लोकांमध्ये हा साधा उच्च रक्तदाब असल्याचे दिसून येते. म्हणजे या लोकामध्ये रक्तदाबाची पातळी सामान्यत: 120/80 mmHgपेक्षा जास्त असते.

अनुषंगिक उच्च रक्तदाब : उच्च रक्तदाबाचा हा आणखी एक प्रकार आहे. हा रक्तदाब इतर शारीरिक दोषांच्या अनुषंगाने निर्माण होतो. पाच ते दहा टक्के लोकांमध्ये हा अनुषंगिक उच्च रक्तदाब आढळून येतो. त्यात मुख्यत्वेकरून किडनीचे आजार, शरीरातील ग्रंथीचे आजार, गर्भारपणात वाढलेला रक्तदाब, महाधमनीचं आकुंचन यांचा समावेश होतो.

एलिव्हेटेड रक्तदाब (Elevated Blood Pressure) : जेव्हा रक्तदाब मोजताना सिस्टोलिक दाब सातत्याने 120 ते 129 आणि डायस्टोलिक दाब 80 पेक्षा कमी असतो, तेव्हा त्याला एलिव्हेटेड उच्च रक्तदाब म्हणून ओळखले जाते. असा रक्तदाब असणाऱ्या लोकांना हृदयविकार, स्ट्रोक आदी आजारांचा धोका जास्त असतो. त्यामुळे त्यांना नेहमी रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी योग्य ते औषधोपचार घेणं आवश्यक असते.

Carrot Health Benefits : तुम्हाला माहिती नसतील असे गाजर खाण्याचे फायदे; फक्त डोळेच नाही संपूर्ण आरोग्यासाठी उपयुक्त

उच्च रक्तदाब प्रथम श्रेणी (High Blood Pressure I) : नियमितपणे वरचेवर रक्तदाब मोजला तरी सिस्टोलिक दाब 130 ते 139 आणि डायस्टोलिक दाब 80 ते 89 पर्यंत असेल तर त्याला उच्च रक्तदाबाची प्रथम श्रेणी म्हटलं जातं. यामध्ये हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका अधिक असतो. हा धोका कमी करण्यासाठी डॉक्टर रक्तदाब नियंत्रणात ठेवणारी काही औषधे देतात तसंच जीवनशैलीत काही बदल करण्यास सांगतात. या दोन्ही गोष्टींकडे लक्ष देणे महत्त्वाचे असते.

उच्च रक्तदाब द्वितीय श्रेणी (High Blood pressure II) : रक्तदाब सतत 140/90 मिमी एचजी किंवा त्याहून अधिक असेल तर तो अधिक धोकादायक असतो. त्याकडे अधिक काळजीपूर्वक लक्ष देणे महत्त्वाचे असते. यासाठी औषधे आणि जीवनशैलीतील बदल या दोन्ही बाबी काटेकोरपणे पाळणे गरजेचे असते. अन्यथा गंभीर आजार उद्भवू शकतात आणि जीवावरही बेतू शकते.

क्रायसिस उच्च रक्तदाब (Crisys High Blood pressure) : रक्तदाब अचानक 180/120 मिमी एचजीपेक्षा जास्त झाल्यास ती अत्यंत गंभीर स्थिती असते, अशावेळी आपत्कालीन वैद्यकीय उपचारांची गरज असते. त्यामुळे धाप लागणे, छाती दुखणे, पाठदुखी, सुन्नपणा, थकवा, दृष्टी धूसर होणे, बोलणे अस्पष्ट किंवा अडखळत बोलणे अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधणे महत्त्वाचे असते.

कमी रक्तदाब (Low Blood pressure) असेल तर तुलनेने धोका कमी असतो, तरीही काळजी घेणे आवश्यक असते. जेव्हा रक्तदाब 120/80 पासून 90/60 पर्यंत कमी होतो तेव्हा त्याला लो ब्लडप्रेशर म्हणजेच कमी रक्तदाब म्हटले जाते. कोणत्याही कारणाशिवाय वारंवार चक्कर येणे, अथवा नेहमी अशक्तपणा जाणवणे हे कमी रक्तदाबाचे संकेत असू शकतात. कमी रक्तदाब झाल्यानंतर आपल्या शरीरातील रक्ताचा प्रवाह सामान्य स्वरूपापेक्षा अतिशय कमी होतो. याला हायपोटेन्शन असे म्हणतात. यामुळेही हृदयविकाराचा धोका वाढतो. त्यामुळे वेळीच उपाय करणे आवश्यक असते. यासाठी काही घरगुती उपायही प्रभावी ठरतात.

First published:

Tags: Health Tips, Lifestyle